Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

नागपूरचा इतिहास – १६

राधा जोशी जुलै 16, 2026 1 minute read
0
gumohor-water

नागपूर राज्याचा उत्कर्ष.          16 July 2026 

महाराज रघुजीराजे दुसरे यांचे कारकिर्दीत नागपूर राज्याने उत्कर्षाचे शिखर गाठले! त्यांचे कार्यकाळात नागपूरकर भोसले यांची सत्ता उत्तरेस नर्मदेच्यापलीकडे बुंदेलखंडापासून दक्षिणेत  पुर्व सागर किनारयार पर्यन्त आणी  पश्चिमेस सहयाद्रीचे बालाघाट रांगा पासून ते पूर्वेस सुर्वणरेखा नदी पावेतो तसेच दक्षिणपश्चिमेस गोदावरीपासून  उत्तरपुर्वेस गंगानदी पावेतो स्थापित झाली होती. नागपूरराज्यात २० मजबूत किल्ले असून नागपूर राज्यचे राजस्व एक कोटीं होते.महाराज रघुजीराजे–२ हे वास्तुशास्त्र विशारद व वनस्पती शास्त्राचे जाणकार होते.त्यांना उत्तम सौंदर्यदृष्टी लाभली होती.महाराज रघुजीराजे–२ यांनी त्यांचे कारकिर्दीत  नागपूरनगरात राजवाडा तसेच  अनेक देखण्या वास्तु  बागा  सरोवर पाय–यांच्या कोरिव विहरी  व अप्रतिम नक्षीकाम असलेल्या मंदिरं निमार्ण केले. त्याकरता  महाराज रघुजीराजे-२ यांनी निष्णात शिल्पकार रंगकर्मि मुर्तीकार काष्ठकार कारागिर यांना नागपूरात आणून वसविले होते.

१ नागपूरचा राजवाडा  

नागपूरच्या राजवाडयांचे बांधण्यास इ.स.१७८० मध्ये सुरवात होऊन इ.स.१७९०मध्ये राजवाडा बांधून पुर्ण झाला. राजवाडा परिसराचे बांधकाम पुर्ण झाल्या नंतर महाराज रघुजीराजांनी पाथरवट गंवडी सुतार रंगकर्मी कारागिर यांचा सत्कार केला.तेव्हा महाराज रघुजीराजांनी बांधकाम प्रमुख  पाथरवट प्रमुख  काष्ठकार  प्रमुख  रंगकर्मी व प्रमुख कारागिर या पाच आसामींना प्रत्येकि एक सोन्याची कडे व अडिचशे चांदीचे नाणे बक्षिस दिले! नंतर १४ मे रोजी  शष्टीला वास्तु शांत झाली व त्रयोदशीला गृहप्रवेश केला. शनीवार वाडयापेक्षा अधिक भव्य आणी देखणा होता आरसेमहाल म्हणजेच खाजगी महाल अथवा शयनकक्ष

२ जल सिंचन प्रणाली 

महाराज रघुजीराजे.२ यांनी नागपूरनगराकरता  जल सिंचन प्रणाली विकसित केली! नागपूरनगरात पुर्वी पिण्याकरता व घरगुती कामांकरता विहिरींच्या पाण्याचा उपयोग होत असे. पण विहिंरीचे पाणी अवश्यकते पेक्षा अधिक क्षारयुक्त होते. तेव्हा पिण्यास योग्य पाणी तसेच घरगुती कामाकरता पाणी पुरविठा करण्याकरता  महाराज रघुजीराजे.२ यांनी जल सिंचन प्रणाली निमार्ण  केली 

अंबाझारी तलाव

जल सिंचन प्रणालीकरता त्यांनी आधी बंदिस्त नागपूरनगराचे दक्षिण-पश्चिमेस नागनदीवर बांध घालून अंबाझारी तलाव निमार्ण केला. अंबाझारी तलाव हा २३७  ऐकरात पसरला असून दगडी बांधारयाची उंची सुमारे ६ मिटर असून रूंदी सुमारे १८ मिटर आहे. अबांझरी तलावाच्या या  बांधारयात जलव्दार  आहेत. अबांझरी तलावाच्या अधिक पाण्याचा निचरा जलव्दारांव्दारा ३८ मिटर लांबीच्या नहराने होत असे. अंबाझरी तलावतून नागपूरनगरास पाणी पुरवठा करण्याकरता ६.४ किलो मिटर नळी किंवा  पाईप लाईन निमार्ण केली होती  ६.४ किलो मिटर लांबीच्या ९ इंच व्यासच्या दगडी पाईप लाईने नागपूरनगरास पाणी पुरवठा होत असे. पाईप लाईन चा प्रत्येक दगडी पाईप हा सुमारे १ मिटर लाबं असून या पाईपचा  पाईपाचे आतला व्यास ६० से मि रूंद  होता.  हे पाईप ऐकमेकास फिट  होत असून नेरूच्या प्लास्टरने  जोडले होते!  तुटभुट होऊ नये म्हणून  हि पाईप लाईन तिन बाजूने दगडी  भिंतीनी झाकली होती मात्र  ठराविक अतंरावर पहाणी करण्याकरता लहान लहान चैाकोनी दगडी पहाणी टाके बांधले  होते. प्रत्येक पहाणी टाक्यात पाण्याचा प्रवाह नियंत्रीत करण्याकरता  लाकडी फळी बसवलेली होती लाकडी फळी वर किवां खाली करून लाकडी फळीचे मदतीने पाईप लाईनीत पाण्याचा प्रवाह नियंत्रीत करता येत असे.

दगडी पाईप लाईनचे पाणी नगरात ठिकठिकाणी दगडी टाक्यात  जमवून नंतर खापरीपाईपने घर वाडे यांना  पुरविले जात असे. खापरी पाईपातील पाण्याचा प्रवाह लाकडी फळीचे मदतीने नियंत्रीत केला जात असे खापरी पाईपांनी पुरविलेले पाणी घराच्या अंगणातील भुमिगत दगडी टाक्यामध्ये साठविले जात असे.मात्र फुलबागा व साफसफाईकरता विहीरचे पाण्याचा उपयोग करण्याची रयतेस ताकिद  होती. 

लेखक

  • राधा जोशी
    राधा जोशी

Post navigation

Previous: महाकवी
Next: आजीची डायरी – एक आठवणीतला वारसा
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.