भाग :1
राहुल एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. जसे मध्यमवर्गीय कुटुंबाच्या मुलांचे संगोपन, आणि जडणघडण होते त्याच पद्धतीने त्याचेही झाले हवे ते शिक्षण पूर्ण करून एक साजेशी नोकरी करावी, हे लहानपणापासूनच मनात बिंबवल्या गेलेलं असतं. पण Gen Y थोडा हटकून विचार करतात. आणि त्याच विवंचनेत राहुलही होता. “नोकरी” करावी की कुठला “व्यवसाय” सुरू करावा. व्यवसाय सुरू करण्यासाठी, कमीत कमी भांडवलात आपण काय काय करू शकतो, या सगळ्यांवरती अभ्यासही त्याचा सुरूच होता. दुसरीकडे मनलहानपणापासूनचे धडे विसरलेलं नव्हतं, त्यामुळे राहुल नेहमी गोंधळात असायचा. अभ्यास करत असताना, त्याचे डोके नोकरी आणि व्यवसाय याचे फायदे तोटे, संभाव्य धोके कशात आहे. यात गुंतलेले असायचे राहुल मनमिळावू आणि बोलका असल्यामुळे खूप सार्या छोट्या-मोठ्या व्यवसाय करणाऱ्या लोकांशी संवाद साधून, त्यांच्या व्यवसायाबद्दल बारकावे जाणून घेत असे. आणि वडील नोकरी करत असल्यामुळे नोकरीचे नफेतोटे त्याच्या डोळ्यासमोरच होते
पदवीधर होऊन अधिक शिक्षण घेण्याचे ठरविले. आणि घरच्यांनी तशी संमती सुद्धा दिली. CET दिली, आणि एका चांगल्या महाविद्यालयात MBA फायनान्स ला दाखला घेतला. सोबतच त्याने एका खाजगी विमा कंपनी मध्ये सल्लागार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यासाठी लागणारी परीक्षाही त्याने दिली, आणि उत्तीर्णही झाला. सल्लागार म्हणून कामही सुरू झाले. बोलका असल्यामुळे छोट्या बड्या लोकांमध्ये सहाजिकच सकारात्मक विचारांचे देवाण-घेवाणही सुरू होती. त्यात विषय एकच असायचा 'नोकरी करावी की व्यवसाय'.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६