||नोकरी या व्यवसाय||
भाग चार
कनिष्काची भेट
राहुलच्या कामाचा व्याप वाढलेला आहे. वार्षिक मूल्यांकनची वेळ आली आणि राहुलचे मेहनत रंगली आणि त्याला पदोन्नती सुद्धा मिळाली. त्याच स्वरूपात त्याच्या मासिक पगारामध्ये वाढ सुद्धा झाली.
आता राहुलच्या लग्नाचे वारे वाहू लागले प्रत्येक जण त्याच्या त्याच्या परीने स्थळे सुचवणे सुरू केले
दरम्यानच बाबांच्या मित्रांनी त्यांच्या अनुमतीने, मुलीला बघण्याचा कार्यक्रम ठरविला. तनिष्का एक हुशार आणि चुनचुनित मुलगी होती तिला स्वयंपाकाची आवड होती त्याच अनुसरून काही बेकरी, चॉकलेटची मिठाइ, traffles शिकण्याचे वेगवेगळे वर्ग केलेले होते. आणि त्यात तिची आवड ही होती. आणि तिला तिचा असा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता.
आई बाबा आणि राहुल मित्रांच्या घरी गेलेत औपचारिक रित्या बघण्याचा कार्यक्रम पार पडला. मुळातच राहुल आणि कनिष्का एकमेकांना ओळखत होतेच, त्यामुळे लग्न पक्कच आहे अशी सर्वांची समजूत झाली.
पण राहुल ला कळलं की तिला ही स्वतःचा व्यवसाय करायचा होता. पुन्हा मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दडलेली इच्छा जागी झाली.
व्यवसाय की नोकरी?
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६