लग्न पक्के झाले, म्हणून एक छोटेखानी साक्षगंधाचा विधी आटोपला गेला. आणि साक्षागंधातच लग्नाचा मुहूर्त ही काढण्यात आला.
मधल्या वेळात अधून मधून राहुल आणि कनिष्का भेटण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला लागलेत. प्रेमाच्या गोष्टी, एका वेगळ्याच जगात/ ढगात सवार होते दोघेही. पण कधी कधी पुढील आयुष्य बद्दल पण बोलणे व्हायचे. राहुलने सहज विचारले एकदा कनिष्काला तू एवढे सगळे शिकवणी बेकरी, मिठाई आणि ट्रफल्सचे वर्ग केलेले आहेत ते आवड म्हणून की सहज, किंवा अजून काही त्या मागचे विचार? कनिष्कका तिचे स्वप्न जे आतापर्यंत तिने कोणालाही सांगितले नव्हते, ते राहुलला सांगितले. घरूनच असा एक व्यवसाय करण्याची इच्छा ही प्रगट केली. पण तिने सोबत हेही म्हटले त्याची किंवा त्यांच्या आई-वडिलांची इच्छा असेल तरच. बघा विचार एकमेकांना कसे जुळले गेलेत. किंवा दोघेही एकमेकांना कसे मिळालेत. राहुलची सुप्त इच्छा पुन्हा त्याच्या मनात गारमेल करत उठली. पण आत्ता तो त्याच्यावरती काही न बोलता तू करू शकतेस असे म्हटले.
यथा अवधी वैदिक पद्धतीने लग्न पार पडले. कनिष्का राहुलच्या घरी स्वतःला सामावून घेण्याचा प्रयत्न करताना सर्वांचे मन जपत यशस्वी ही झाली.
तीही तिच्या स्वप्नातल्या व्यवसायाबद्दल राहुलची अधून मधून बोलत असे. आणि तोच क्षण पुन्हा राहुलला विचार करण्यास भाग पडत असेल. तसे नोकरीत चांगले यश मिळेलच, ती पण एक सुप्त इच्छा कधी कधी डोक काढत असे.
नोकरी की व्यवसाय?
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६