बहुतेक आता या शीर्षकाला तसा काही अर्थ नाही उरला. असो कॅफे चे सर्व समान आले ते ते त्या त्या जागी लागले. त्या आधी वेळा सुद्धा ठरविल्या गेल्या. सायंकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत कारण सरकारचे तसे नियमच आहेत. त्या आधी सर्व मेनू रोज ठेवायचा की रोज वेगवेळा मेनू ठेवायचा. असे केले तर मग एखाद्या वेळी आलेल्या ग्राहकाला विशिष्ट पदार्थ नाही मिळाले तर ग्राहक तुटेल अशी भीती पण रोज एवढे पदार्थ ठेवणे शक्य नाही कारण नाही संपले तर ते वाया जाईल वा शिळे होईल (ताजे राहणार नाही). जी आपल्या ” tag line” रोज ताजे आणि चवदार. मग असे ठरले की काही मेनू जे रोज ताजे ताजे लगेच करून वाढता/देता येईल, आणि बाकी जे पाहिले बनून ठेवायचे असतात ते ठराविक दिवशी मिळतील असे फलक पाहिलेच ठेऊन ठेवायचे, आणि दुसरा फलक आज चे खास आणि उद्या काय राहणार खास.
वर्तमानपत्रात पत्रक, आजूबाजूच्या ठिकाणी फलक लावले जेणे करून लोकांना माहिती मिळेल.
औपचारिक तारीख सुद्धा ठरली उद्घाटन करण्याची. खूप मोठी जागा नसल्याने कार्यक्रम खूप कमी लोकांबरोबर पार पडला. दुसऱ्या दिवशी पासून सर्वांसाठी सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली.
हळूहळू कॅफे जोरात चालू लागलं, छान “brackeven point” ला पोहले. आता पूर्णपणे फायदेशीर व्यवसाय झाला. दरम्यान राधा सुद्धा थोडी मोठी झाली. शाळेला जायला लागली. तर आता मधल्या वेळी काय करावे हा प्रश्न राहुल आणि कनिष्का ला पडायला लागला. त्यातून एक नवीन भन्नाट कल्पना यायला लागली
पुन्हा एकदा प्रश्न राहिलाच नाही…….
आत्ता बस व्यवसाय व्यवसाय……..!!!
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६