Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

२०४७ कडे करूया वाटचाल

मोहन जोशी जुलै 25, 2026
0
gumohor-water

माझ्याच बरोबरीच्या मित्राने , एकदा मला त्याची किमान जीवनमर्यादा सांगितली , तो म्हणाला, आपल्याला २०४७ चा भारत पाहूनच जायचे आहे. आणि मलाही ते पटले . आपल्या देशाला स्वातंत्र मिळून २०४७ ला शंभर वर्षे पूर्ण होतील,आणि ह्या अमृत महोत्सवाचे अमृत प्राशन करण्याचे स्वप्न , आपण सहज पाहू शकतो,असे मला वाटते . आपल्या पिठीचे आजचे वय लक्षात घेता , आपल्या स्वतः ला अजून फक्त २१ वर्षे सुदृढ , शशक्त आणि निरोगी ठेवायचे आहे,आणि श्री गणेशाच्या कृपेने, ते सहज शक्य आहे,ते कसे साध्य करायचे , ते आता आपण पाहूया.

१ ) चालते फिरते रहा: २०४७ चा भारत पहायचा असेल , तर आपल्याला फिरते व्हावे लागेल, अन्यथा मोबाईलमधेच पहावा लागेल . रोज नियमाने जितके जमेल तितके चालत रहा, घरातील दैनंदिन कामे स्वतः पायी चालून करा, जिन्याच्या पायऱ्या चढा आणि उतरा, मनसोक्त प्रवासाला जा आणि नियमित व्यायाम आणि योगासने करा .

२ ) समतोल आहार घ्या : २०४७ ला सशक्तपणे उभे राहायचे असेल तर समतोल आहार घ्या. ताजी हंगामी फळे,सलाद,हिरव्या भाज्या,सुका मेवा, दूध,  दही , मोड आलेली कडधान्ये ,उसळी ,वा अन्य खाद्य पदार्थे आणि पेय आपापल्या आवडीनुरूप यथाशक्ती घेत रहा 

३ ) मानसिक आरोग्य सांभाळा : मानसिक आरोग्य टिकवायचे असेल तर नको ते वाद घालणे टाळा,सर्वांशी विचारपूर्वक संवाद करा, योग्य ठिकाणी मौन बाळगणे शिका, योगासोबतच प्राणायाम, योगनिद्रा घ्या. 

४ ) छंद जोपासा: दिर्घ आयुष्यासाठी छंद जोपासणे खूप गरजेचे असते. मनात असूनही करता न आलेले छंद आता पूर्णत्वाला न्या. नवनवीन शिकायला वयाचे बंधन नसावे, हे लक्षात ठेवा 

५ ) कुटुंबासोबत घट्ट संबंध ठेवा : आपले कुटुंबच आपल्याला दिर्घ आयुष्यात सोबत देणार आहे. आपण एकटेही राहू शकतो ,असा बालहट्ट धरू नका. मानव हा सामाजिक प्राणी आहे आणि तो त्याच्या समूहातच सुरक्षित असतो,हे सत्य ध्यानात ठेवा 

६ ) मित्रांच्या थव्यात रहा : मित्र हेच दीर्घ आयुष्याची खरी संजीवनी आहेत . आपले कुटुंब आणि आपले नातलग जेथे कमी पडतात,  तेथे आपले मित्र कामाला येतात . मैत्री ही कधीही ऑनलाइन नसावी, व्यक्तिगत भेटीगाठीतील ऊब जागृत असू द्या .

७ )संपत्तीचे नियोजन करा : आपल्या संपत्तीचे नियोजन जबाबदारीपूर्ण पद्धतीने करा. घरातील आणि परिवारातील व्यक्तीला न कळविता ऑनलाइन आमिषे पाहून त्याला बळी पडू नका. आपला जोडीदाराला नेहमी विश्वासात घेऊनच योग्य तो निर्णय घ्या. आपल्या सर्व संपत्ती किव्हा संसाधनांची योग्य अशी लिखित नोंद ठेवा , त्यांचे वाटप करायची घाई करु नका, जे वाटप करायचे ते इच्छापत्रानुसार करा.

ह्या सर्व बाबी जर पटल्या असतील तर , तुमचे भारताच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे तिकीट नक्की झाले आहे , असे समजा . तेव्हा आपण भेटून म्हणू या “ जय हिंद ,जय भारत  “ भेटायचे ना मग नक्की. !!!!

लेखक

  • मोहन जोशी

Post navigation

Previous: संत तुकाराम
Next: ययाती देवयानी आख्यान
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.