नागपूरचा इतिहास २५ जुलै २०२६
नागपूरकर भोसले
पोलिस खाते
महाराज रघुजीराजे तिसरे यांनी सुमारे इ.स.१८३०मध्ये नगरकोतवालीचा निमार्ण करून पोलिस खात्याची स्थापना केली.नंतर नागपूरराज्याचे आठ प्रमुख प्रांतावर सुभेदार नेमले.सुभेदारांचे हाताखाली कामाविसदार असत.कमाविसदाराचे मदतीला पोलिस खात्याचे ४ जेमादार असत.सुभेदार हे नागपूनगरात स्थायिक असत व कमाविसदार प्रांताचे राजधानीत राहत असत. जेमादार हे प्रांताच्या पोलिस खात्याचे प्रमुख असून त्यांचे हाताखाली प्रत्येक परगण्यात बुरकुनदिस नेमले असत.कमाविसदार सर्व फौजदारी व दिवाणी गुन्हयांची दखल घेऊन पक्षकार व तक्रारदारांना जेमादारकडे पाठवत असत. परगण्याचे पोलिस खात्याचे बुरकुनदिसला गुन्हां दाखल करण्याचा व फौजदारी किंवा दिवानी खटला चालवण्याची स्वतंत्र अधिकार नव्हता.त्यांस प्रत्येक गुन्हयाची नोद जेमादाराकडे करावी लागत असे. तेव्हा पोलिस खात्यात ३९१३ शिपायी