नागपूरचा इतिहास २६ जुलै २०२६
नागपूरकर भोसले सांस्कृतीक वारसा
१ तान्हा पोळा
तान्हा पोळयाचे साजरीकरण हि विदर्भाची खासियत!महाराज रघुजीराजे.२यांनी तान्हा पोळयाचे उत्सवास सुरवात केली.महाराज रघुजींरांजे यांना बालगोपांळाप्रती विशेष लगाव होता.आपल्या लहान्ग्या प्रजाजनांकरता त्यांनी खास तान्हया पोळयाचे उत्सवाचा इ.स.१७८४चे सुमारासप्रारंभ केला.बैल पोळयाचे दुसरे दिवशी बाशिंग व हारतुरयांनी सजविलेल्या लाकडी नंदी बैलांचा राजवाडयाचें प्रागंणात पोळा भरविण्यात आला.प्रथम राज उपाध्यायांनी बाळंराजे पुरंसोजींराजांचे भल्यामोठया नंदीचे पुजन केले.नंतर प्रांगणात जमलेल्या सर्वहि नंदींचे पुजन करून बोजारा देण्यात आला.खिरापत वाटल्या मिरवणूक निघाली नतंर पोळा फुटला मग बैल पोळयाप्रमाणे घरोंघरी जावून खिरापत व बोजारा मिळविण्यात बालगोपांळानां भारीच गंमत वाटली!आज हि तान्हया पोळयाचा उत्सव विदर्भात थाटात साजरा केला जातो. वंशागत चालत आलेल्या लाकडी नंदी बैलांची रंग-रंगोटी करून नातु वा पंतु तान्हया पोळयात उत्सहाने सहभागी होत असतात.वंशागत लाकडी नंदी वाटयाला न आल्यास प्रथम पोळयास आजी आजोबांनी नातवंडाना लाकडी नंदी भेट देण्याची प्रथा प्रचलित आहे. विदर्भाच्या शाळा ,बालमंदिर, संस्कारवर्ग, सहनिवास व उपनगरातून तान्हा पोळा अजुन ही साजरा केला जातो.
नागपूरकर भोसले सांस्कृतीक वारसा
२वसंत पंचमी
माघ महिन्याच्या शुद्ध पंचमीला वसंत ऋतुच्या आगमनाप्रित्यर्थ वसंत पंचमीचा उत्सव नागपूरनगरात शुक्रवार तळयाच्या पाळीवरच्या विठोबा मंदिर व तेलंगखेडीच्या शिव मंदिर तसेच सक्करदराचे लक्ष्मी नारायण मंदिर सक्करदरा वसंत पंचमीचा उत्सव मोठया थाडात साजरा केला जात असे.मातोश्री चिमांबाई व आईसाहेब कमळाजाबाई यांचे हस्ते विठोबा मंदिरात विव्दान ब्राम्हणाचे सन्मानपुर्वक पुजन होत असे व सायंकाळी कथा किर्तन असे. तेलंगखेडी शिव मंदिरात व्यकोंजीराजे यांचे हस्ते विव्दान ब्राम्हणाचे पुजन होवून तेलंगखेडी बागेत भोजन व नंतर कलावंतीणी चा नाचाकार्यक्रम होते असे. येथे तिन दिवस जत्रा भरत असे. जत्रेत शकंरपट कुस्तीचा फड तमाश असे कार्यक्र्रम होत असत
नागपूरचा इतिहास २८ जुलै २०२६
नागपूरकर भोसले
गाविलगड
गाविलगड चा बेलाग दुर्ग सातपुडा पर्वतराजीतवसला आहे. तिसरया शतकाच्या सुरवातीला अहीर राजवशंने अल्पकाळ विदर्भात राज्य स्थापले होते.तेव्हा विदर्भ प्रांतात अहिरांनी दुर्ग निमार्ण करून गाविलगड हे नाव दिले होते. गाविलगड इ.स.११८९ मध्ये यदुवशंचे राज्यात सामिल होता.पूढे इ.स. १३९८ खेलडाचे राजा,महाराज नरसिंह राय यानी विदर्भ प्रांतावर वर्चस्व केले व गाविलगड नव्याने निमार्ण केला पण इ.स १४९७चे सुमारास अहमद शहा या बहामनी सरदराने गाविलगड बळकावला व तेथे मजिद बांधली नावे बदलली अरबी लिखाण वैगरे करून त्यास यवनी किल्ल्याचे रूप देण्याचा प्रयास केला.नंतर इ.स.१५९७ सुमारास मोगलांनी गाविलगड बळकावला.मात्र इ.स.१७४९मध्ये थोरल्या रघुजीराजांनी मोगल किल्लेदाराचा पराभव करून गाविलगड घेतला होता.