Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 1 minute read
0
gumohor-water

जानेवारी २०२६ आणि आता हा जुलै २०२६ चा ३० दिवसात ३० पार पडला आहे. दोन्ही वेळेस या उत्सवात सहभागी होऊन काहीतरी लिखाण करू शकलो याचे समाधान आहे. यावेळेस अनुभव, निरीक्षण आणि आठवणी यावर लिखाणाचा प्रयत्न केला. तसेच काहीतरी वेगळे लिहावे जे आतापर्यंत लिहिले नव्हते, तसा सुद्धा एक प्रयत्न केला.

यावर्षीच्या या दुसऱ्या उपक्रमाच्या कालावधीत घरच्या काही कार्यात आणि ऑफिसमधेही फार व्यस्तता असल्याने आणि मी फार काही लिहू शकेल की  नाही असा विश्वास नसल्याने  या जुलै च्या लेखन उत्सवात  सहभागी होऊ शकणार नाही याची मला खात्री होती. असे असूनही सहभागी झालो आणि संकल्प पूर्ण झाला हे माझ्यासाठी एक आश्चर्य आहे. त्यामुळे, वेळ नसतो तो काढावा लागतो यावरही विश्वास बसला. त्यापेक्षाही आपण लिहू शकतो यावरही पुन्हा विश्वास बसला.

साहजिकच याचे श्रेय तुषार दादांना तर जातेच. त्याचप्रमाणे सुभाष सरांना सुद्धा श्रेय जाते. कारण मी जुलै चा विषय जेव्हा सुभाष सरांशी बोललो तेव्हा त्यांनी म्हटले,

अरे असे नको करू, सुचतात विषय.. लिही की..

लिहिण्याची अशी काही वेळ ठरलेली नव्हती. तरी ज्या दिवशीचे लेख त्यादिवशीच किंवा त्याचा काही भाग आधीच्या दिवशी लिहायचे हे ठरले असतांना, पुढे काही दिवसांनी एका लेखाचा बॅकलॉग निर्माण होऊन सुद्धा आपले टार्गेट पूर्ण झाल्याचे समाधान आणि आनंद आहे. बरेचदा तर सकाळपासून तर रात्रीपर्यंत काहीच लिहायला सुचायचे नाही. बरोबर १० वाजले की  एखादा विषय मनात यायचा आणि भराभर लिहून काढायचे, असे व्हायचे.

बऱ्याच लेखकांचे लेख वाचण्यात आले आणि बऱ्याच जणांचे अजून वाचलेले नाहीत. आता ०१ ऑगस्ट पासून सुरपाखरू कुटुंबातील प्रत्येक लेखक बंधू भगिनींचे लेख वाचायचे हा निश्चय आहे. कारण इथे लिहिणारे एकाहून एक धुरंधर आहेत आणि प्रत्येकाच्या लेखनातून खूप काही शिकण्यासारखे असल्याने फोरमवर, संकेतस्थळावर जाऊन, ते वाचून त्यावर प्रतिक्रिया सुद्धा द्यायची हे निश्चित केलेले आहे.

आपण सर्व जण आपापल्या लेखांची इ -बुक पी.डी एफ. तर करूच. पण फोरम नावाचा जो प्रकार फारच छान आहे जिथे आपण प्रत्येकाचा लेख वाचून त्यावर व्यक्त होऊ शकतो.

तर बंधू भगिनींनो आता वाचण्याच्या आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे स्तंभलेखनाच्या सुद्धा तयारीला लागूया.

आणि हो… दिवाळी अंक पण आहेच की यावर्षीपासून..

चला तर मग पुढील तयारीला लागु या ..

सर्वांचे खूप अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा..

लेखक

  • वैभव शिरखेडकर

    वैभव शिरखेडकर, नागपूर
    नागपूरला खासगी क्षेत्रात नौकरी. विविध विषयांवरचे पुस्तके वाचनाची आणि हिंदी, मराठी कविता लिखाणाची आवड. नागपूर विश्वविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी.

Post navigation

Previous: जुनी पाने
Next: समारोह
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.