Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

तिथला चाफा

मेघा देशपांडे जुलै 6, 2026
0
gumohor-water
तिथला चाफा

रस्त्यावरूनी जाता जाता काल दुपारी तुला पाहिले
अर्धे फुलले, सुकले अर्धे काय असावे तुला बाधले ?

शुष्क डहाळ्या आतील बाजू , हिरवे अंगण जिथे नांदते
शुभ्र टपोऱ्या उघडीत पेट्या धूळ धुरातून इथुनी हसते

मुळापासची हलवत माती, मायाभरले हात माखती
जसे वाढले तसे वाढते या इकडे कोणी ना बघती

दोन्हीकडली उंची जितकी वेलांटीचा गोल साजिरा
स्वच्छ देखणे इथले हसणे भग्न प्रतीक्षित तिथे सापळा

खरखर करुनी कुणी कधी का तिथला होता सडा झाडला ?
वा कोणी ना म्हटली गाणी व्यवधानी का इतका रमला ?

जीवन आणिक वायू दोघा बाजूंनाही एक मिळाले
जगणे तिथले केवळ जगणे इकडुन का मग सौख्य नांदले ?

आता ठरले प्रेमभराने त्या भागाशी बोलत जावे
भरल्या घरट्यानेही इथल्या त्या भागाशी गूज करावे

त्यानेही सांगावे सहजी काय हरवले कोणी नेले ?
या बाजूने वा सांगावे कुठे नेमके काय बिनसले ?

आणि एकदा तिन्हीसांजेला रस्त्याने या येणे झाले
फांदीवरूनी फडफड करुनी तिथून वरती काय उडाले ?

विद्ध होउनी हसला चाफा दावीत घरटे तिथले उरले
तिथे बहरले असता होते श्रद्धेकारण खाली पडले

काडी काडी ध्वस्त वेगळी श्वास कोवळे तुटले होते
उरला पक्षी तेव्हापासुन वाळीत अर्धे पडले होते !

लेखक

  • मेघा देशपांडे

Post navigation

Previous: श्रीमदभागवत चिंतन – ६ धुंधुकारीची मुक्ती
Next: राग
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.