पौष मास त्यात कृष्ण चतुर्थी तिथी
धूलयुक्त त्यात वात शीत हे किती
कोण प्रहरी आज हाच दिन रेंगाळला
“बाळ” जन्मला रे भौ “बाळ” जन्मला
मातोश्री आज हळू उघडी लोचने
दिपून जाय माय स्वत: पुत्रदर्शने
“ऊठ आता दिन ये शिरी” स्वर उमटला
“बाळ” जन्मला ग सखे “बाळ” जन्मला
सराफ गृही येई आज सौख्यपर्वणी
मित्र सर्व पार्टी हेतू जमले अंगणी
बर्थडे विशेस चा नाद तोच धुंद कोंदला
“बाळ” जन्मला रे भौ “बाळ” जन्मला
ॲक्सेस होता नोटीफिकेशन एफबी च्या मुळे
आज आहे होय वाटत असे रिमाइंडर मुळे
बोंबलूनही मी ही त्यात ठासून बोलला
“बाळ” जन्मला रे भौ “बाळ” जन्मला
वार्ता ही सुखद जशी पोचली इथे
विश करण्या मित्र सर्व धावती तिथे
विद्यार्थ्यांचा संच एक गात चालला
“बाळ” जन्मला रे भौ “बाळ” जन्मला
पुष्पगुच्छ आणा कुणी कुणी पेनसेट
चेक कॅश किंवा आम्ही आणू चॉकलेट
शुभेच्छांचा पाउस मात्र आता वाढला
“बाळ” जन्मला रे भौ “बाळ” जन्मला
मित्र सगळे कधी नव्हे ते आज भेटले
प्लॅन करू म्हणत सर्व उभे ठाकले
डोसा, वडा, जिलबी वर ताव मारला
“बाळ” जन्मला रे भौ “बाळ” जन्मला
शेजारी पाजारी आश्चर्ये चित्र पाहती
कधी नव्हे ते धिंगाणा इथे कोण घालती?
सर्वांच्या कलकलाटा कारण कशाला?
“बाळ” जन्मला रे भौ “बाळ” जन्मला
बुडून जाय घर हे सर्व ही ही हा हा नी
नकला, खेळ, चिडवण्यात मग्न होऊनी
शत शतके करू असेच ह्याच शपथेला
“बाळ” जन्मला रे भौ “बाळ” जन्मला
ह्या वर्षी नाही जमत प्रत्यक्ष भेटीला
स्मरून आज गतवर्षी च्या धिंगाण्याला
इथूनच करी स्वीकार ह्या शुभेच्छेला
“बाळ” जन्मला रे भौ “बाळ” जन्मला