Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

चोर

विजय देशमुख जुलै 7, 2026 1 minute read
0
gumohor-water

चोर म्हटलं की थोडी भीतीच वाटते. काय चोरून नेईल आणि केव्हा नेईल, याचा काही नेम नसतो. काही ठिकाणी तर चक्क एटीएम चोरीला जातात; कुठे पैसे, कुठे सोनं, तर कुठे लॅपटॉप, टीव्ही किंवा हाताला लागेल ती वस्तू. अंगणात एखादी वस्तू निष्काळजीपणे ठेवली, तर ती दुसऱ्या दिवशी तिथे असेलच याची खात्री देता येत नाही.

पण आमच्या कॉलनीत मात्र तसं कधी घडत नाही. बाहेर ठेवलेल्या अनेक वस्तू महिनोनमहिने तशाच पडून असतात. म्हणूनच काही दिवसांपूर्वी घडलेली एक घटना माझ्यासाठी खरोखरच आश्चर्याची होती.

चार दिवसांपूर्वी मी घराजवळ, अगदी कुंपणालगत, कडुलिंबाचं एक बरंच मोठं रोप लावलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला पाणी घालायला गेलो. पाईप सुरू केला आणि बघतो तर काय—कडुलिंबाचं रोप गायब!

क्षणभर मला वाटलं, कदाचित एखाद्या जनावराने ते खाल्लं असेल. पण कडुलिंब कोणता प्राणी खातो? मग वाटलं, रोप उडून तर गेलं नसेल? पण त्याच्या शेजारी लावलेलं छोटंसं कडुलिंबाचं रोप मात्र जागच्या जागी होतं. म्हणजे हे कुणीतरी मुद्दाम उपटून नेलं होतं. तरीही विश्वास बसत नव्हता.

दोन दिवसांनी मी तुळशीचं एक रोप लावलं. संध्याकाळी अगदी उत्साहात आमचा छोटेखानी वृक्षारोपण सोहळा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास पाणी घालायला गेलो, तर तुळशीचं रोपही गायब!

आजकाल तुळशीची रोपंसुद्धा चोरीला जाऊ लागली आहेत, हे पाहून खरंच आश्चर्य वाटलं.

याच संदर्भात मागच्या वर्षीची एक घटना आठवली. आमच्या परिसरातील एका वृक्षप्रेमीने मुख्य रस्त्याच्या दुभाजकावर अनेक तुळशीची रोपं लावली होती. दुर्दैवाने चार-पाच दिवसांतच ती सगळी गायब झाली. योगायोग असा की काही दिवसांत तुळशीविवाहही होता!

शेवटी त्यांनी एक फलक लावला—

“तुळशीचं रोप चोरी करून नेऊ नका. हवं असेल तर माझ्या दुकानात मोफत उपलब्ध आहे.”

दुर्दैव म्हणजे, रोप घ्यायला दुकानात कोणीच गेलं नाही!

आता यंदाही ते पुन्हा तुळशीची रोपं लावण्याचा प्रयोग करत आहेत. बघूया, यावेळी तरी चोरांना तुळशीकडून थोडी सुबुद्धी मिळते का!

#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६

लेखक

  • विजय देशमुख

    वर्धा येथे भौतिकशास्त्राचा (Physics) प्राध्यापक म्हणून काम करतो. मी तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन पद्धतीने भौतिकशास्त्र शिकवतो. यासोबतच मी एक लेखक, मासिक संपादक, कवी आणि ब्लॉगर सुद्धा आहे. मी एक प्रेरक वक्ता (Motivational Speaker) आणि नाविन्यपूर्ण शिक्षक आहे. सध्या मी भौतिकशास्त्रामध्ये 'एआय' (AI - कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे.

Post navigation

Previous: “बाळ” जन्मला रे भौ “बाळ” जन्मला
Next: नंतर म्हणजे कधी ? भाग २
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.