नागपूरचा इतिहास 6 जुलै 2026
गोंडवन
वैनगंगा नदी च्या खोरयातिल अरण्यमयी प्रदेशात गोंड जनजातीचा निवास असल्याने या प्रदेशास गोंडवन असे म्हणत असत. वरदायिनी नदी व सातपुडापर्वतराजीच्या बालाघाट रांग यांचे दरम्यानच्या प्रदेशाचा गोंडवन मध्ये प्रामुख्याने अंर्तभाव होता.
13व्या शतकाच्या सुरवरतील गोंडवन प्रदेशात चार गोंडवंशिय राज्य उदयास आले. खेलडा,देवगढ ,गढ-मंडला आणी चंद्रपूर ही ति चार राज्य होती
खेडला राज्य
मुकुंदराज स्वामी यांचे विवेकसिंधु या ग्रंथात खेडला राज्याचा उल्लेख आढळतो.13 व्या
शतकाच्या अखेर जयतपाल नामक राजा खेडलाहून राज्य करीत होता.पश्चिम विदर्भाच्या उत्तरेस नर्मदा नदी आणी दक्षिणेत मेळघाट रांग यांचे दरम्यान ताप्ती नदी च्या खोरयात खेडला राज्य असून या राज्यात मुलतापी , बैतुल , दरणी वैगरे ठिकाणं होती. खेडला राज्याच्या उत्तरेस होशंगशहा नामक घुसखोर मुलूख होता आणी पश्चिमेस फिरोज बहामनी याने बळकाविलेला मुलूख होता.
राजा नरसिंह राय हा खेडलाचा पराक्रमी राजा होता. त्याने इ.स. 1397 मध्ये फिरोजशहाने बळकाविलेला माहूर पावेतो सर्व पश्चिम विर्दभ प्रांत जिंकून घेतला. पूढे इ.स. 1433 मध्ये घुसखोर होशंगशहाने खानदेशच्या अहमद शहाच्या मदतीने खेडलावर हमला केला. तेव्हा राजा नरसिंहस राय यांनी जोरदार प्रतिकार केला. पण लढाईत पराक्रमी राजा नरसिंह राय मारले गेला. नंतर खेडला किल्ला बळकाविला आणी अहमद शहाने पश्चिम विर्दभ घेतला. मात्र इ.स. 1497 मध्ये मोहमद शहा बहामीनेने खेडला .किल्ला घेताला. पूढे इ.स. 1596 मध्ये मोगलांनी खेडला राज्य बळकाविले.
क्रमशः