#सुरपाखरू# ३०दिवसात३० #जुलै२०२६
Gen Z, miss used Bomb की वरदान!
तन में ज्वाला,
मन में ध्येय,
लक्ष्य न कोई दूर।
युवा वही जो कर्मठ सदा,
हौसलों से भरपूर॥
संत कबीरांनी युवा पिढी वरील प्रमाणे वर्णित केलेली. आहे पण आता जरा चित्र वेगळेच दिसतय. तुम्ही पण बघतच असाल ना Gen Z ही कुठेतरी भडकटलेली दिसते आहे. आणि कुठे कुठे ती एक Bomb झालेली दिसते. आहे जर कुठे कुठे रचनात्मक कार्यामध्ये मग्न आहे
'Gen Z' हा शब्द कुठून आलाय पण माहिती आहे का? तुम्हाला २०८५ पूर्वीची पिढी 'Generation X' नावाने ओळखली जायची, हीच पुढे 'Gen X' झाली २००० नंतर “Gen Y” झाली. मज्जा आहे ना. प्रत्येक काळी त्या त्या काळचे विचारवंत वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण केलेले आहे. पण “Gen Z” बद्दल अनेक विश्लेषक विरोधाभासक मत आहेत. कोणी म्हणतात हे सकारात्मक आहेत, तर कोणी म्हणतंय हे भरकटलेले आहेत. कोणी म्हणते बिनधास्त आहे, तर कोणी म्हणतंय घाबरटही आहे.
आता ते इतके हुशार आहेत की खूप सार्या कंपन्यांनी त्यांना मोठ्या मोठ्या जागांवर नियुक्ती सुद्धा केलेले आहे. तसे संजय राव, झील गांधी, कुणाल शहा आणि असे खूप. आपण आता खूप सार्या स्टार्टअप कंपन्यांमध्ये पुढाकार घेतलेल्या वैज्ञानिक किंवा व्यावसायिक आपल्याला Gen Z वा Zen X मधून मिळतात आहेत. सामाजिक संवेदनशीलता सुद्धा यांच्यामध्ये आढळतेच, आणि ती त्यांच्या कृतींमध्ये सुद्धा दिसतो.
ही खूप सुंदर बाजू आहेच, पण काही ठिकाणी त्याचे कुरुप रूप सुद्धा समोर येते आणि हे भयावह आहे.
कधी हे भर पडून गेलेले सैरभैर झालेले असतात. काय करावे हे त्यांना सुचतच नाही. आणि मग कोणीतरी एक प्रभावित व्यक्ती, त्यांच्या प्रभावाचा दुरुपयोग करून त्यांना सैरभैर करून सोडतो. जसे मागे काही दिवसात एक आंदोलन सुरू आहे. आणि मागच्या काही वर्षांमध्ये सुद्धा प्रत्येक आंदोलन याच पिढीला हाताशी घेऊन काही लोक करतात. हे(Gen Z) लोक वेगवेगळ्या विषयांच्या प्रभावाखाली येतात, कारण ते आतापर्यंत कोरे पाटी असतात. त्यावर जाती, धर्म, आरक्षण, सरकारी परीक्षा हे मुद्दे इतक्या सहज रितीने नकारात्मक पद्धतीने बिंबविले जातात. ते त्यांना खरंच वाटायला लागतं आजूबाजूला जे घडतं ते मुळात त्याच्याचमुळे घडत आहे हे त्यांना ठाम पटवलं जातं. आणि मग निरर्थक एखाद्या आंदोलनाला सुरुवात होते. मग काही वेळानी वेगळ वळण घेऊन हिंसात्मक होतं. या आंदोलकांवर होणारा खर्च याचाही विचार होत नाही, आणि भरडलेली सामान्य जनता ही त्यांना नगण्य वाटते. कित्येकांचे आयुष्य जाणता अजाणता या आंदोलनात केलेल्या चुकीमुळे पणाला लागतं.
थोडक्यात संवेदनशील असतात. आई-वडिलांची काळजी सुद्धा घेतात. याच्या विरुद्ध Gen X होते.
सर्व सामाजिक माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या प्रत्येक विषयावरती लक्ष ठेवून सक्रिय प्रतिसाद देत असतात,तसाच आताही अपेक्षित आहे.