देवगढ राज्याची स्थापना गोंडवंशिय जमिनदार जटबा याने इ.स. 1590 च्या सुमारास केली. तेव्हा जटबा राजाचे लष्करात 200 घोडदळ ,5000 पायदळ होते व अनेक हत्ती होते !
पूढे इ.स. 1634 मध्ये कोकशहा देवगढच्या गादीवर बसला. नंतर मोगल सुल्तान शहा जहानचा फौजदार खान दौरान याने देवगढ राज्यावर हमला केला. तेव्हा राजा कोकशहाने खानदौरान यास नजराणा देवून मोगलांशी तह केला आणी मोगंलाना चार वर्षात तिन लक्ष रूपये खंडणी देण्याचे मान्य केले.
राजा कोक शहा नंतर इ.स. 1647 मध्ये पुत्र केसरी शहा देवगढच्या गादीवर
बसला. मग मोगलांचे फौजदार शहानवाझखान यांने पुन्हा देवगढवर हमाला केला. तेव्हा मोगलांशी तह करून 1 लक्ष खंडणी देण्याचे मान्य केले. इ.स. 1660 मध्ये केसरी शहाचे निधन झाले
नंतर जेष्ठ पुत्र महिपत शहा देवगढ च्या गादीवर बसला. मग मोगल औरंगजेबने देवगढ राज्यावर वक्रदृष्टी टाकली . तेव्हा मोगल लष्कराने बु-हाणपूरात छावणी केली होती या अफाट मोगल फौजेचा प्रतिकार करणे घातकी ठरणार होते तेव्हा राजा महिपत शहाने इ.स. 1686 मध्ये औरंगजेबाची भेट घेतली आणी तहात मोगलांचे वर्चस्व स्विकारून तिन लक्ष वार्षिक खंडणी देण्याचे मान्य. औरंगजेब तहास मान्यता देण्याकरता राजा महिपत शहा मुस्लमान होण्याची अट घातली.
औरंगजेब हा धर्मांध आणी क्रुर होता. तसेच खंडणीकरता हमले मोगल फौजा फौजा राज्याला फार उपद्रव करती राजा महिपतशहाने रयतेच्या संरक्षणाकरता आणी राज्यरक्षण करता जड अतंःकरणाने धर्मातराची अट मान्य केली.
तेव्हा औरंगजेब आंनदुन ओरडल, ‘‘ मग आजपासून तु राजा बख्त बुलंद शहा म्हणजे नशीवान राजा!‘‘
देवगढ राज्यात बैतुल व छिन्नवाडा हे प्रांत होते इ.स. 1699 मध्ये लष्करी मदतीकरता गढ मंडलाचे राजा नरिंद शहाकडून राजा बख्त बुलंदशहाला सिवनी डोगंरताल ,व घनसैर हे गढ मंडला राज्याचे प्रांत प्राप्त झाले.
नंतर इ.स. 1700 मध्ये राजा बख्त बुलंद शहा स्वतंत्र होवून राज्य करू लागला. पुर्वी पश्चिम विर्दभ हा स्वराज्यात विर्दभ प्रांत म्हणून सामिल होता इ.स. 1689 मध्ये होता मोगलांनी बळकाविलेला स्वराज्याचा विर्दभ प्रांत हा सेना साहेब सुभा पुरसोजीराजे यांनी जिंकुन घेतला होता. पण पुर्व विर्दभ मोगंलाच्या व-हाड सुभ्यात सामिल होता . राजा बख्त बुलंद शहाने मराठयांच्या मदतीने 4 हजार घोडदळ आणी 12 हजार पायदळ जुळवून आणी इ.स. 1702 मध्ये मोगलांच्या व-हाड सुभाचे सुभेदार अलिमर्दानखान याचा पराभव करून व-हाड सुभा जिंकून घेतला. नंतर मोगलांचा खजाना लुटला! मोगलांच्या पराभवाची व खजाना लुटीची खबर ऐकून औरंगजेबाने नुसता थैयथयाट केला
‘‘तो बख्त बुलंद नुसन निगुन बख्त म्हण्जे कम नशिबी आहे ‘‘