Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

नागपूरचा इतिहास – ६

राधा जोशी जुलै 10, 2026 1 minute read
0
gumohor-water

नागपूरचा इतिहास                                      10 जुलै 2026

गोंडवन                  देवगढ राज्य

नागपूर नगर

इ.स. 1699 मध्ये  लष्करी मदतीकरता  गढ मंडलाचे राजा नरिंद शहाकडून राजा बख्त बुलंदशहाला  सिवनी डोगंरताल व घनसैर हे गढ मंडला राज्याचे  प्रांत प्राप्त झाले.   

राजा बख्त बुलंद शहाने त्याचे नातेवाईक  रामसिंह यास  या प्रांताचे प्रमुख नेमले. राजा रामसिंह याने छपरा सिवनी येथे मुख्यालय करून  किल्ला बांधला. नंतर देवगढ लष्कराच्या   राजाखान पठानच्या पठानी तुकडीने सिवनी प्रांत  घेतला.  

देवगढचे राजा बख्त बुलंद शहा यांनी इ.स. 1701 मध्ये मोगलांचा व-हाड सुभा जिंकुन घेतला. या सुभ्यात पश्चिम  विर्दभाचे रामटेक ,  नागपूर ,भंडारा , उमरेड हे प्रांत असून  रामगिरी अथवा रामगड ,अंबागड  सोनगडी  प्रतापगड पवनगड हे गड होते. नंतर राजा बख्त बुलंद शहा यांनी देवगढ येथे भव्य गड बांधला आणी नवे नागपूरनगर वसविले.

     इ.स. 1701  मोगलांचा व-हाड सुभा   जिंकून  घेतल्यानंतर देवगढचे   राजा बख्त बुलंद शहाने इ.स. 1702  नागपूर नगर वसविले असे  इंग्रज अधिकारी   जेनकिन्स तसेच  इतिहासकार  य.म काळे यांचे मते  योग्य नाही कारण इतिहासकार  डॅाक्टर भालचंद्र अंधारे  यांनी  इ.स. 1709 पुर्वी नागपूरनगर अस्तित्वात होते असे  असे देवगढचे गोंडराजे  या त्यांचे पुस्तक  खालिलप्रमाणे सिध्द केले

1 अकबरनामात उल्लेख केल्याप्रमाणे इ.स. 1563 पुर्वी देवगढ राज्य अस्तित्वात असून इ.स. 1564 पावेतो गढ-मंडला राज्याच्या अधिन होते. नंतर इ.स. 1578 मध्ये  तुकोबा नामक देवगढच्या राजा यांने इ.स. 1578 मध्ये नागपूरच्या  जोशी घराण्यास सनंद दिली.

2 देवगढच्या जटबा राजांने 8 फेब्रुवारी  इ.स.1612 रोजी नागपूरच्या जोशी घराण्यास   सनंद दिली होती

3 नंतर  राजा कोकशहा याने 4  शुध्द श्रावण समन 1691 म्हणजेच  19 जुलै  इ.स. 1634 रोजी नागपूरच्या जोशी घराण्याची संनद कायम करून मुंकुद जोशी आणी नाग जोशी यांना  दान पत्र. त्यामूळे राजा बख्त बुलंद शहाने नागपूर

 

 नदीवर्धनपूर चा वाकाटक राजा धर्म महाराज रूद्रसेन -1 यांची माता हि मध्य देशाच्या पद्मावतीचे नागवंशिय राजा भवनाग यांची कन्या होती तिने इ.स. 335 ते  इ.स. 360 प्राचिन नागपूरनगर वसविले असावे. 

 इ.स. 1600 मध्ये मोगलांनी पश्चिम  विर्दभ बळकावून तेथे व-हाड सुभा केला .  नंतर मोगलांनी या प्रदेशात  अराज्यक माजविल्यांने प्राचिन नागपूर नगराचा -हास त्याजागी  होवून लहान लहान  वसाहती झाल्या होत्या.

राजा बख्त बुलंद शहाने इ.स. 1702 मध्ये यथाशक्ती  नागपूरनगराचे पुर्ननिर्माण करून तेथे भुईकोट बांधला. राजा बख्त बुलंद शहा यांनी नवे  नागपूर वसविले व त्यामूळे    प्राचिन नागपूरनगर पुन्हा नावारूपास आले! 

इ.स. 1709 मध्ये निधन झाले राजा बख्त बुलंद शहाचे. नंतर पुत्र चांद सुल्तान देवगढच्या गादीवर बसला. तेव्हा  नागपूर येथे देवगढ राज्याचा लष्करी तळ होता.

राजा चांद सुल्तान यांनी लष्करा करता नागपूरनगरा बाहेर   तलाव खोदला. पूढे हा तलाव शुक्रवार तळे म्हणून प्रसिध्दिस पावला!

 

लेखक

  • राधा जोशी
    राधा जोशी

Post navigation

Previous: स्वप्न
Next: तंबोरा एक जिवलग……४
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.