रविवारची सकाळ राहुल ने नेहमीप्रमाणे सकाळचा नाश्ता बनवलाय, आणि सगळेजण ते खाता खाता बोलत बसलेले. नेहमीप्रमाणेचे हस्ते खेळते वातावरण होते. आणि एकाएकी त्याला थोडेसे गंभीर करत, बाबांनी बोलण्याचा प्रयत्न केला.
तत्पूर्वी, कित्येक दिवसापासून राहुलचे आई-वडील राहुलच्या मनामध्ये काही घालमेल सुरू आहे, किंवा गोंधळ सुरू आहे हे त्यांना कळत होते. पण त्यांना कदाचित गालमेलची पार्श्वभूमी माहिती असावी. म्हणून त्यांनी त्याला वेळ देण्यातच योग्य समजले होते. काळाप्रमाणे हे घालमेल कमी होईल, आणि तो शांत होईल असा त्यांचा विचार होता. पण तसे झाले नाही म्हणून त्यांनी आज त्याच्याशी या विषयावर बोलण्याचा निर्णय पहिलेच घेतलेला होता
वडिलांनी राहुलला म्हटले बेटा तुझा गोंधळ घालमेल आम्ही समजतोय, पण त्यातून तुलाच बाहेर यावे लागेल. कारण व्यवसाय करायचा म्हटलं, तर भांडवल हे लागणारच. त्याचे धोके सुद्धा आपणास बघावयास लागणार. आपण सामान्य कौटुंबिक आहोत, स्वतःचे घर सोडून असे काय मोठे भांडवल आपल्याकडे नाही. त्यामुळे तुझ्या मनात असलेला व्यवसाय करण्याचा विचार सोडून दे. तुझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एखाद्या ठिकाणी छानशी नोकरी कर.
मधल्या काळात त्याने विमा कंपनीचे सल्लागार म्हणून काम करत असतानाचे अनुभव व्यवसाय करण्यासाठी खूप जास्त सकारात्मक नव्हते. असे त्याचे म्हणणे होते. पण काही लोक त्याला सकारात्मक अनुभव सुद्धा सांगत होते. म्हणून त्याची ही नेहमीची द्विधा मनस्थिती चालूच राहिले.
पुन्हा तोच प्रश्न व्यवसाय की नोकरी?
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६