नागपूरचा इतिहास १९ जुलै २०२६
नागपूरकर भोसले महाराज रघुजीराजे दुसरे
महाराज रघुजीराजे दुसरे यांचे कारकिर्दीत नागपूर राज्याने उत्कर्षाचे शिखर गाठले! त्यांचे कार्यकाळात नागपूरकर भोसले यांची सत्ता उत्तरेस नर्मदेच्यापलीकडे बुंदेलखंडापासून दक्षिणेत पुर्व सागर किनारयार पर्यन्त आणी पश्चिमेस सहयाद्रीचे बालाघाट रांगा पासून ते पूर्वेस सुर्वणरेखा नदी पावेतो तसेच दक्षिणपश्चिमेस गोदावरीपासून उत्तरपुर्वेस गंगानदी पावेतो स्थापित झाली होती. नागपूरराज्यात २० मजबूत किल्ले असून नागपूर राज्यचे राजस्व एक कोटीं होते.महाराज रघुजीराजे-२ हे वास्तुशास्त्र विशारद व वनस्पती शास्त्राचे जाणकार होते.त्यांना उत्तम सौंदर्यदृष्टी लाभली होती.महाराज रघुजीराजे-२ यांनी त्यांचे कारकिर्दीत नागपूरनगरात राजवाडा तसेच अनेक देखण्या वास्तु बागा सरोवर पाय-यांच्या कोरिव विहरी व अप्रतिम नक्षीकाम असलेल्या मंदिरं निमार्ण केले. त्याकरता महाराज रघुजीराजे-२ यांनी निष्णात शिल्पकार रंगकर्मि मुर्तीकार काष्ठकार कारागिर यांना नागपूरात आणून वसविले होते.
संत्रनगरी नागपूर
महाराज रघुजीराजे.२ यांचे मूळेच नागपूरनगरास संत्रनगरीचा दर्जा प्राप्त झाला! भारतभरातून सर्वेत्तम प्रजातीचे संत्राची झाडे आणून तुळशीबागेच्या रोपवाटीका लावली नंतर महाराज रघुजीराजे.२ यांनीसंत्र लागवडीस योग्य ते हवामान जमिन पाणी पुरठा यांसर्व विचारात घेऊन वरदा नदीच्या खोरयात नागपूर प्रांताच्या काटोल वरूड मोर्शी वैगरे परगण्यात येथे लागवड केली व संत्र बागा निर्माण केल्या.
महाराज रघुजीराजे दुसरे यांनी इ.स. १७८० ते इ.स. १८१६ पावेतो राज्य केले.नंतर २२ मार्च इ.स.१८१६ रोजी त्यांचे निधन झाले. महाराज रघुजीराजे-२ व महाराणी गजराबाई यांना बानुबाई हि कन्या व पुरसोजीराव हा पुत्र होता. दुसरया राणीसाहेब पार्वतीबाई शिर्के यांना अपत्य नव्हते. तिसरे राणीसाहेब बाकाबाई असुन त्यानां साळुबाई हि कन्या होती