नोकरीतल्या कामातले गुंतागुंत ही वाढत चाललेली होती, आणि ती अधिकच जटील होत गेली. हळूहळू ते त्याच्या मनावरचे दडपण व्हायला लागले. पूर्वी जे काम अत्यंत आवडीने करत होता, तेच काम आता त्याला ओझे वाटायला लागले. मध्येच कुठेतरी तद्री लागून तो राधाच्या दुनियेत हरवून जात असे. आणि भानावर येऊन तो ऑफिसमध्ये आहे हे त्याच्या लक्षात येताच, तो निराश होत असे. या सगळ्यांमुळे त्याच्या तब्येतीवरही परिणाम व्हायला लागला.
एका रविवारी नेहमीप्रमाणेच त्यांनी स्वतःच्या हस्तानी न्याहारी केली. सर्वजण बसून खेळीमेळीच्या वातावरणात मजा मस्ती चालू होते. आणि राहुल एकदम थोडा दुःखी, थोडा गोंधळलेला, गांभीर्याने बोलायला लागला. त्याने प्रस्ताव ठेवला की कनिष्का आणि तो स्वतः एक व्यवसाय सुरू करू इच्छितो. आणि त्यासाठी नोकरीवरून त्यागपत्र देण्याचा विचार करतो आहे. इकडे कनिष्काला आश्चर्याच वाटले. आणि आई-वडिलांना एकदम मोठा धक्का, खेळीमेळीचे वातावरण एकदम बदलून गंभीर स्वरूपाचे झाले नेहमीप्रमाणेच वडिलांनी विरोध दर्शविला, सगळे काय व्यवस्थित सुरू असताना हे काय मध्येच सुचतं रे तुला! असे म्हणून समजही काढली.
कनिष्का राहुलला होणारा त्रास बघत होती. अनुभवातही होती म्हणून तिने त्याच्या निर्णयाला आपली सहमती दर्शविली. आणि तिच्या आवडत्या व्यवसायात पदार्पण करण्यासाठी आतुरही झाली.
हे सर्व बघून राहुल ने घरी सांगितले की तो त्यागपत्र देणार आहे. आणि त्याने त्याचा हा निर्णय व्यवस्थापक वर्गाला कळविला. त्यांनाही आश्चर्याचा धक्काच होता हा, त्यांनी याला वेगवेगळे आमिष दिले. पण राहुल निर्णयावरती कायम होता. अधिकारिक त्यागपत्र दिले. आणि नवीन पदधारक व्यक्ती रुजू होत पर्यंत तो कामकाज बघणार असे व्यवस्थापक वर्गाला सांगितले.
शेवटी त्याच्या मनाची घालमेल संपली आणि आता व्यवसाय ओके झाले.
व्यवसाय! व्यवसाय!!
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६