नागपूरचा इतिहास २३ जुलै २०२६
नागपूरकर भोसले
सिताबर्डीची लढाई
मराठयांचे इंग्रजविरूद्ध तिसरे अभियानाचे अंर्तगत २६ नोव्हेबंर इ.स. १८१७ रोजी नागपूरात सिताबर्डीची लढाई झाली.
सिताबर्डीचे लढाईत सेनापती मनभट्ट उपाध्याय यांचे नेतृत्वात नागपूरकर भोसंल्याचे ३००० पायदळ व २७०० घोडदळाने ऐकूण ५७०० दळाने भाग घेतला.
इंग्रज इतिहासकर व लेखकांच्यामते सिताबर्डीचे लढाईत १८००० मराठी लष्कराने भाग घेतला .पण हे असत्य आहे.कारण नागपूरकर भोसंले याचेंकडे एकूण १८००० लष्कर असून लढाईच्या वेळी नागपूरात३० तोफांचा तोफखाना व ३००० पायदळ २७०० घोडदळ ५७००मिळून लष्कर होते. बाकीचे लष्कर राज्यात इतरस्त्र तैनात होते.
सिताबर्डीचे लढाईत ४६५० इंग्रजी लष्कराने भाग घेतला.२० गोरे अधिकारी १३५०नागपूरातील गोरी फौज व कामठीचे छावणीतील२मद्रासी बटालियन मिळून स्थानिक पायदळाचे २००० शिपायी आणी कंपनी प्रमुख जेनकिन्सचे रक्षकदळाचे २ कंपन्या मिळून १० पलटणींचे ५०० शिपायी व ३ घोडदळं मिळून ७५० स्थानिक स्वार तसेच ५० तोफखान्याची तुकडी व ४ हलक्या तोफा या लष्करात सामिल होत्या.
जेनकिन्सने गोरे लष्कर नागपूरात आणण्याकरता २५ तारखेला जालन्याकडे तिन स्वार पाठविले तसेच२६ तारखेला तोफखाना व फौज गोळा करून सिताबर्डीचे मोठया टेकडीवर हलवून लढाईचा पवित्रा घेतला. इंग्रजां नी लढाईचा पवित्रा घेतलेला पाहून नागपूरकर भोंसल्याचे लष्कराने वेढा दिला असता लढाईस सुरवात केली.
सिताबर्डीच्या लढाईत सेनापती मनभट्ट उपाध्याय यानी उत्कृष्ट कामगिरी बजावली. गोरे अधिकारी प्रत्यक्ष लढाई भाग न घेता लांबूनच फौजांना निर्देश देत होते व लढाण्याकरता स्थानिक भाडोत्री शिपायांना पूढे करीत होते.ते पाहून सेनापती मनभट्ट उपाध्याय व त्यांचे दळाने गोरया अधिकारयाना निशाना बनविले.त्यामूळे शिपायांची हिमंतखचली व इंग्रजांनी लवकर माघार घेतली. इंग्रजांचा सेनाप्रमुख लाईट चार गोळया लागून गंभिर जखमी झाला.इंग्रजांचे ४६५० लष्करापैकी ७५० घोडदळ व त्यांचे३ गोरे अधिकारी न लढता मैदान सोडून गेले.अश्याप्रकारे सिताबर्डीचे लढाईत गोरया फौजेचे १३५० पैकी १३ अधिकारी ठार झाले व २ गंभिर जखमि झाले तसेच ११९ गोरे शिपायी ठार झाले. पलटणींचे ५०० पैकी ६ गोरे अधिकारी ठार झाले व ४३ गोरे जखमि झाले .स्थानिक मद्रासि २००० पायदळाचे ३३३ शिपायी मारले गेले.अनेक जखमी झालेत८सिताबर्डीचे लढाईत इंग्रजांचे १९ गोरे अधिकारी व ४५२ लष्कर मारले गेले.२ अधिकारी व अनेक शिपायी जखमी झाले. नागपूर लष्कराचे सुमारे १०० सैनिक पडले अथवा घायाळ झाले.लढाईनंतर कंपनीचे उरलेसुरले लष्कर व ठाणे मराठयांचे वेढात अडकून पडले. ध्यान्याची पोती वाया गेल्याने इंग्रजांची रसद संपली.तोफां नागपूरकर भोसंल्यानी हस्तगत केल्या होत्या.तेव्हा जेनकिन्सने माघार घेऊन नागपूर दरबारी वकिल पाठविला.