म्हणुनच ते महाभारत होते का? आता तुम्ही बघा कोणाच्या मनात होते कोण्या काळी केलेली द्रौपदीची उपासना आणि त्यातून मिळालेलं वरदान याच जन्मी / काळात मिळेल.
आंबा,अंबालिका, अंबिका ह्याचे अपहरण याच काळात होईल, आंबा तपस्या करून पुनर्जन्म घेऊन ह्याच काळात वापस येईल, तात भीष्म पितामह १०० वर्षाचे १ पाप ओझं वाहत याच जन्मी येऊन फेडतील. रामायणातील सूर्य पुत्र, इंद्र पुत्र सुग्रीव आणि बाली, याच जन्मी कर्ण आणि अर्जुन म्हणून एकमेका समोर येतील. जे की भगवान श्री हरी विष्णू ने देवेंद्र आणि सूर्य देवाला पुढच्या वेळी न्याय देऊ असे आश्वासन दिले होते. याच जन्मी कर्णाला श्री परशुराम गुरु म्हणून मिळाले पण त्यांच्या शापाने कर्ण सर्व विद्या विसरून गेला त्याच्या सर्वात महत्वाच्या युद्धात. पूर्ण महाभारताच्या रणभूमीवर अश्वत्थामा नावाचा एक हत्ती पण सामील होता. धृतराष्ट्र हे अंध आहे म्हणून मोठे असून सुद्धा त्याचा छोटा भाऊ पांडू ला राजा केले गेले. आणि ह्याच गोष्टीचा फायदा त्या शकुनी मामा ला मिळत गेला. ज्याच्या जवळ त्यांच्या वडिलांच्या हाडाचे जादूई फासे होते. ह्याच काळात बार्बरीक स्वतःचे शीर श्री कृष्णा च्या चरणी ठेवतो. विवस्त्र दुर्योधन पहिले श्री कृष्ण यांना भेटतो आणि मांडी भोवती वस्त्र घालून आई गांधारी समोर जातो.
आणि असे किती तरी……
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६