Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

कंटाळा! कंटाळा!! कंटाळा!!! 

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 14, 2026
0
gumohor-water
ना इच्छा जेवणाची, ना फिरण्याची गोडी,
कंटाळ्याने मारली आहे मनावती उडी.
पंखा फिरतोय डोक्यावर, 
वेळ जात नाही,
काहीतरी करावेसे वाटते, 
पण काही सुचत नाही.
कधी वाटतं मस्तपैकी चादर घेऊन झोपावे,
तर कधी वाटतं या जगापासून दूर कुठे तरी पळावे.
पण हा कंटाळाही शेवटी आपलाच एक भाग आहे,
दोन मिनिटे शांत बसून, 
स्वतःला समजवण्याची हीच एक छान संधी आहे.
असे कुठल्यातरी कवीने कविता सुद्धा केलेली आहे या कंटाळावरती.
कुठून येत असेल हा कंटाळा, वरून खालून, आकाशातून, कुठून येतो नेमका पक्के असे सांगता येणार नाही. एखादं वैज्ञानिक कारण, पण मानसीक किंवा शारीरिक काही कारण असू दे पण कंटाळा येतो खरं.
आजपर्यंत कोणीही कंटाळा आला शब्दात बांधून त्याची व्याख्या करू शकला नाही.
असो मला पण दोन दिवस सर्व गोष्टींचा कंटाळा आलेला होता. का ते माहित नाही; पण नुसते खाणे आणि झोपणे, कशा कशात मन लागायचं नाही. लेख लिहिण्यासाठी मनात विषय सुचत होते, शब्द रचनाही जमत होत्या. पण लेखणी हातात घेतली, तर मनाची एवढी घालमेल की, ज्या शब्दरचना सुचलेल्या होत्या त्या सगळ्या विरून गेल्यात. पुन्हा कागद कोरच आणि लेखणी तशीच मेजर पडलेली. आणि मी पुन्हा पलंगावर लोळत बसलेलो कंटाळाने, एवढे प्रेमाने त्याच्या मिठीच्या विळख्यात जखडून ठेवले होते.
जसे आपल्या मराठी भाषेत प्रत्येक शब्दाला विविध अर्थ असतात. तसेच जसे वैदर्भीय कंटाळा म्हणजे जीवावर आलेली, किंवा कुठलीही गोष्ट न करण्याची मनस्थिती हेच. दक्षिण महाराष्ट्रात गेला तर, कंटाळा हा शब्द शारीरिक थकव्यासाठी वापरला जातो. असो, मुळात हात चर्चेचा विषय नव्हता.
कंटाळा दूर करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत सुद्धा असते कोणी चहा कॉफी घेऊनच कंटाळा बाजूला सारून फ्रेश होतो. कोणी एखाद्या ठिकाणी छोटीसी ट्रिप करून येतो. तर कोणी त्याला आवडणारे एखाद्या गायकाचे गाणे ऐकत बसतो. तर कोणी कुठले से पुस्तक वाचत बसतो. तर कोणी माझ्यासारखा कंटाळा आला दोन दोन दिवस देऊनही त्याला झोपून दूर करतो प्रत्येकाची आपापली आपापली तऱ्हा.
तुमचा काही कंटाळ्याचा असा काही अनुभव असेल तर नक्की सांगा.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६

लेखक

  • सुभाषचंद्र टेकडपांडे

Post navigation

Previous: किस्से…. कसेच्या कसे….. भाग १
Next: वाढदिवस
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.