Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

वाढदिवस

सायली कराडे जुलै 14, 2026 1 minute read
0
200168.jpg
सावनीचा आज वाढदिवस होता. खरं तर वाढदिवस साजरा करण्यापलीकडे तिचं वय होतं. तरीसुद्धा तिचं कुटुंब आणि मित्रपरिवार हौशीने तिचा प्रत्येक वाढदिवस साजरा करत असतात, तसा तो त्यांनी आज ही केला. पण ती मात्र भूतकाळात रमली होती. लहानपणी साजरा झालेला प्रत्येक वाढदिवस तिच्या स्मृतीपटलावर उमटत होता व पुढे जात होता.
आर्थिक परिस्थिती चांगली नसताना देखील तिच्या आईवडिलांनी हौशीने व आनंदाने साजरे केलेले कित्येक वाढदिवस एका क्षणात तिच्या मनात गर्दी करू लागले. प्रत्येक वाढदिवशी नवीन ड्रेस घेता येवो न येवो, तिच्या आईने स्वतः शिवलेला ड्रेस नक्की असायचा आणि तोच नेहमी भाव खाऊन जायचा. एकदा तर रात्रभर जागून नवीन फॅशन चा ड्रेस शिवताना आई ने इस्त्री वर टिकल्या गरम करून ड्रेस ला लावल्या, आणि हाताला चटके सुद्धा लाऊन घेतले. त्यानंतर तिच्यासाठी तो लाखमोलाचा ड्रेस झाला होता. तिच्यासाठी आई ड्रेस डिझायनर अन् आईसाठी ती मॉडेल च होती म्हणा ना! 
तशाच तिच्या मैत्रिणी. एकदा आई बाबा तिच्याच एका वाढदिवसाच्या गोष्टी करत बसले होते. वाढदिवस घरच्या घरीच साजरा करण्याचं ठरत होतं. तेव्हा तिच्या ५-६ वर्षांच्या मैत्रिणीने आई बाबांचं बोलणं ऐकलं. तिला वाटलं हे काही सावनीचा वाढदिवस साजरा करणार नाही आणि म्हणून ती परिसरातल्या सर्व लहान मुलांना वाढदिवसाचं आमंत्रण देऊन मोकळी झाली. वेळेवर काहीच तयारी नसल्याने जाम फजिती झाली तिच्या आई बाबांची. मग आई ने वेळेवर केलेल्या चकल्या आणि सकाळी केलेले चिरवंट सर्वांना खाऊ घातले.
तसे काही वेळा तिचा वाढदिवस धूमधडाक्यात सुद्धा साजरा झाला पण त्यातही तिला फक्त तिच्या आईने तिच्या पायाजवळ वाकून पायात तोरड्या घालून दिल्याचा क्षण जास्त आठवतो.
वर्षागणिक तिचे मोठमोठे वाढदिवस साजरे होऊ लागलेत. पण 'Bobby Pins' या गोष्टीतल्या आईला जसं भविष्यात मिळालेल्या मोठमोठ्या भेटवस्तूंच्या तुलनेत मुलीने लहानपणी खाऊच्या पैशातून आणून दिलेल्या bobby pins सर्वोत्तम भेटवस्तू वाटतात तसंच तिला सुद्धा आजही तिच्या आई बाबांनी जीवाचा आटापिटा करून तिच्या आनंदासाठी साजरे केलेले तिचे वाढदिवस अमूल्य वाटतात आणि ती मनातल्या मनात त्या अविस्मरणीय क्षणांना कुरवाळत राहते.
#सूरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६ 

लेखक

  • सायली कराडे
    सायली कराडे

Post navigation

Previous: कंटाळा! कंटाळा!! कंटाळा!!! 
Next: एक मोकळा /उनाड दिवस
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.