Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

मला खटकलेली अमेरिकन जीवनपद्धती

मोहन जोशी जुलै 20, 2026 1 minute read
0
gumohor-water

अमेरिकाला सध्या २५० वर्षे झाली आहेत , जर आपण आपल्या भारतीय परंपरा आणि सभ्यतेशी तुलना केली तर , अमेरिका हा देश आता बाळस धरतो आहे , असे म्हणावे लागेल . तरीही येथील गगनचुंबी इमारती, अवाढव्य महामार्ग , शिस्तप्रिय वाहतूक , हिरवीगार वनराई आणि विस्मित करणारी स्वच्छ हवा , जगात सर्वांना भुरळ घालते. येथे उन्हाळ्यात अगदी रात्रीचे आठ वाजले तरी , बाहेर लख्ख प्रकाश असतो. येथे प्रत्येक गोष्ट अफाट आणि मोठेपणाची जाणीव करून देत असते, देशच इतका मोठा, की देशा अंतर्गत दोन शहरात टाइमझोन म्हणून ४ – ६ तासांच अंतर असते , त्यामुळे येथे देशांतर्गत प्रवास करताना आपल्याला ह्याचीही जाणीव ठेवावी लागते .माझ्या अमेरिकेच्या आनंदयात्रेचा मूळ उद्देश , अमेरिका समजणे नसून, मला फक्त माझ्या कुटुंबासोबतच, शंभर प्रतिशत सोबत , रहायचे होते , त्यामुळे येथे सर्व ठिकाणी आम्ही सहकुटुंब  सहपरिवार फिरत येथील जीवनपद्धती पाहत होतो. 

तरीही येथील वास्तव्यात मला अमेरिकेबाबतच्या काही गोष्टी खूपच खटकत होत्या , ज्या आपल्याला आपल्या देशाच्या तुलनेत अगदीच विरुद्ध आणि विपरीत वाटतात. 

एकतर येथील उजव्या हाताने भरधाव वेगाने होणारी वाहतूक , ज्यामुळे आपल्याला आपल्या गाडीवर आता कोणीतरी समोरून धडकणार , असे काहीसे नेहमी वाटत राहते. येथे रस्त्यावर दुचाकी वाहने अगदीच नगण्य दिसतात, हाईवे वर तर त्यांना बंदीच असते. येथे विजेची बटणेही उलटी असतात, खाली केली की बंद आणि वर केली की सुरू होतात .येथे गगनचुंबी इमारती सोडून बाकी सर्व घरे पूर्णतः लाकडी असतात, शिवाय येथील खिडक्यांवर लोखंडी ग्रील वा जाळी नसून फक्त काच असते. येथे सर्व खोल्यांमध्ये दिवसरात्र ए सी सुरू असतो , आणि सगळ्या खिडक्या सदैव बंद असतात. येथे भिंतींवर आपल्यासारखे ट्यूबलाइट नसतात, सगळीकडे टेबललेंप्स असतात. येथे रस्त्यावर फ्लेक्स, बॅनर किव्हा बोर्ड काहीही लावलेले नसतात , शिवाय येथे कोणाला पत्ता विचारायची सोय नसते,फक्त सगळीकडे “गूगल बाबा “ असतो. येथे रस्त्यावर सुद्धा चालतांना , डावी बाजूने नसून , उजव्याच बाजूने चालावे लागते. येथे कोणीही रोड खोदून जमिनीत विजेची केबल्स टाकत नाही, सर्व केबल्स लाकडी पोलवर वरवर बांधलेले असतात , अगदी सिग्नल चे केबल सुद्धा. येथे विनाड्राइवर टैक्सी असतात,रस्त्यावर अगदी भुतासारख्या फिरणाऱ्या . येथे घरपोच सामान आणून देणारे विनामाणूस रोबोट असतात ,ते सुद्धा रस्त्याच्या बाजूने फुटपाथवर उगीचच एकटेच भटकत असतात. येथे घराबाहेर वा बालकनीत सहसा माणसे दिसतच नाहीत, पण लाडावलेली लठ्ठ , पण , न भुंकणारी पाळीव कुत्री आणि मांजरे दिसतात. येथे ह्या प्राण्यांनी रस्त्यावर केलेली विष्टा स्वतः उचलून , त्याची विल्हेवाट ठरलेल्या ठिकाणी स्वतःलाच करावी लागते. येथे ह्या प्राण्यांसाठी मोठमोठी दुकाने, दवाखाने आणि वसतिगृहे असतात. येथील भाषा सुद्धा आपल्यासारखी ब्रिटिश इंग्रजी नसून , अमेरिकन इंग्रजी असते. अशाप्रकारे प्रत्येक गोष्टींमध्ये, “ मेरी मुर्गी की एक ही टांग “ अशी ही सभ्यता येथे पदोपदी दिसते . एव्हाना ह्या सर्व गोष्टी आता आपल्याकडेही तुरळक प्रमाणात दिसत आहेत. 

जेव्हा आपण येथे अठरा-वीस तास विमानात बसून जगाच्या दुसऱ्या टोकाला येतो, तेव्हा लक्षात येते की, येथील लोकांची कार्यप्रणाली आपल्या दृष्टीने विरुद्ध टोकाची असते . सर्वांची काहीतरी असाधारण करण्याची ,असाधारण धडपड , सुरू असते, आणि त्यातही येथे असलेले परदेशी ( मुख्यतः भारतीय) मंडळी सर्वात पुढे दिसतात. येथे प्रत्येक वेड्या कल्पनेला पूर्ण ताकदीनीशी प्रत्यक्षात कसे आणायचे, ह्यासाठी अगदी टोकाची भूमिका घेत , हे सर्व धडपडत असतात. माझे येथील वास्तव्य अटलांटामध्ये होते, येथे तर या देशाच्या अंतर्विरोधांची जाणीव अधिक तीव्रतेने होते. प्रचंड संपत्ती निर्माण करणाऱ्या ह्या देशात जरी ही टोकाची विषमता आणि असुरक्षितता दिसत असली, तरीही काही गोष्टी मात्र आपल्याला निश्चितच हेवा वाटावा , इतक्या चकित करणाऱ्या आणि अनुकरणीय असतात , ह्यात शंका नसावी. 

लेखक

  • मोहन जोशी

Post navigation

Previous: ||नोकरी या व्यवसाय|| भाग चार कनिष्काची भेट
Next: फॅशनच्या नावाखाली अंगप्रदर्शन
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.