Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

तो

हेमंत नाईक जुलै 21, 2026 1 minute read
0
1001108699.jpg
      काल “ती ” वर लिहिताना डोळ्यसमोर गृहिणी आली.
     आज “तो ” म्हणल की प्रथम आठवतो निधड्या छातीचा जीवनरूपी वादळात लिलया जीवन नौका वल्हवणारा “पिता” अर्थात “बाप”.
     अगदी अरुणोदयापासून दिवसरात्र कुटुंबासाठी झटणाऱ्या वडिलांकडे साहित्यकारांनी फारच कमी लक्ष दिले आहे. आईच्या प्रेमाची महती श्रेष्ठ आहेच पण वडीलही कुठे मागे नाहीत. स्वतः फाटकी चप्पल घालून मुलासाठी ब्रँडेड महागड्या बुटांसाठी  पैसे आनंदाने देणारे पिता बघितले की त्यांच्या अव्यक्त प्रेमाची महती कळते.
        वेदना झाली की “आईगं!” असं नकळत उच्चारले जाते प्रेमळ आईची आठवण आपोआप होते.
      अंधारात भीती वाटली किंवा काही संकटात सापडलो तर “बाप रे!” हे शब्द आपोआप येतात त्यावेळी आपल्याला आपल्या निघड्या छातीचा बापाचं आठवतो. 
       प्रसंगी कठोर असलेला तो आतमधून प्रेमळ असतो अगदी श्रीफळासारखा. वरतून कठीण आणि मधे गोड असा. सर्व मुलांना आदर्श वाटाणारा “तो”  , सुपरहिरो,शक्तिमान, हिमॅन अर्थात पिता असतो.
     सर्व कुटुंबाची जबाबदारी लिलया पेलणारा.”माझे शर्ट पॅन्ट अजून चांगले  आणि नवीन आहे,”असे म्हणुन आपले सोडून सर्वांचे सणासुदीला नवीन कपडे आनंदाने घेऊन येणारा मुलांना खांद्यावर बसून जत्रेत फिरवणारा पिता आयुष्यात आईएवढाच महत्वाचा आहे. 
     अगदी साठाव्याही वर्षी पितृछत्र हरवल्यावरही एका क्षणात खूप मोठे झालो याच भावना अनुभवास येते. 
     पित्याचे स्थान आपल्या आयुष्यात एक अभेदय कवचासारखे असते. त्याच्या सन्मानांर्थ जगभरात “फादर्स डे” साजरा करत असले तरी त्याच्या त्यागाची कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्या वृद्धीपकाळात मानांने आणि आदराने वागवणारी मुलं सोबत असली की त्याला जीवन  सार्थ झाल्याचे वाटते. 
     शहरांत निघालेले खूप वृद्धाश्रम बघितले की आपली एकत्र कुटुंब व्यवस्था मोडकळीस निघाली की काय? ही शंका मनात येते. हल्ली फाईव्हस्टार वृद्धाश्रमात आई वडिलांना ठेवून जबाबदारी झटकणारे मुलं खूप बघतो. त्यांनाही वृद्ध व्हायचे आहे ही जाणीव त्यांनी असू द्यावी.
     आईचे प्रेम तिचे महत्व सांगणारी खुप कविता गीत साहित्यिकांनी खुप लिहिली आहेत. त्यामानाने वडील या बाबतीत मागे राहिल
     मुलासाठी वडील किती स्ट्रेच होऊ शकतात वर दर्शविलेल्या चित्रात स्पष्ट दाखवले आहे.एका मित्राच्या ग्रुपवर आलेल्या आलेल्या या अर्थपूर्ण चित्रामुळे आजचा विषय मिळाला अन मी लिहिता झालो.
    पित्याबद्दलच्या माझ्या भावना या शब्दाओळीत व्यक्त करतो..
कष्ट अपार त्यांचे नेहमी
नाही पाहिलें दिवस वा रात्र
मुलांचे भविष्य घडवणे
हाच ध्यास त्याचे एकच स्वप्न!!
नाही रडला.. नाही खचला 
संकट कितीही त्यांचेवरती..
कर्जाचा डोंगर हलका वाटे
मुलांना शिक्षण देण्यासाठी!!
जे मिळाले नाही कधी त्याला
झीजे मुलांना तो ते देण्यासाठी..
चकचकित बूट चमके मुलांचे
यांची  चप्पल तीच जुनी फाटकी!!
बनियन याचे..छिद्रे त्याला
त्याची त्याला नाही पर्वा..
दूर किंतीही जाण्यासाठी
कधी न केली याने रिक्षा!!
मुले शिकली झाली मोठी
बालक अजूनही वाटे त्याला..
सांजवेळी खिडकीत दृष्टी
वाट पाहती सोनुल्यांना!!
“उगाच करता काळजी बाबा 
आम्ही आता मोठे झालो
तुम्ही फक्त्त आराम करा
भार घेण्या सज्ज आम्ही हो!!”
थरथर कंप आता हातांना
आधार मुलाचा प्रेम अनुभवतांना 
“पितृऋण फिटले तुझे रे!”
अभिमानात पिता तो वदला !!
मान ठेवा नित्य पित्याचा 
कॅप्टन तो  संसाराचा 
अर्धगिनीची साथ ती असता 
वादळातही चालवे जीवननौका!!

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा  असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: बिफोर द कॉफ़ी गेट्स कोल्ड
Next: औदुंबर
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.