Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

देवाचं सर्टिफिकेट

गौतम सोमण जुलै 24, 2026 1 minute read
0
GautamSoman_20260724.jpg
म : तुला सांगतो , देव वगैरे काही नसतं रे… त्याच्या  अस्तित्वाचा  कोणताही पुरावा नाही.
ग: अरे, अनेक संतांनी ईश्वराचा अनुभव घेतला आहे आणि त्यांचे अनुभव लिहून ठेवले आहेत.
म : हॅ.. मला तसले पुरावे मान्य नाहीत हां… संतही  माणसेच असतात आणि त्यांच्याकडूनही चूक होऊ शकते.
ग:  ठीक आहे, पण मग तुला  'पुरावा' म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे?
म : प्रत्यक्ष, अनुभवजन्य पुरावा… जो मी स्वतः पडताळून पाहू शकेन.
ग:  हम्म… ठिक आहे. चल, चहा घेतोस? या समोरच्या टपरीवरील काका मस्त चहा बनवतात.  
म :  हाहा! हार मान्य केलीस का? तर मग चहा घेऊच आणि पैसे तू द्यायचेस
ग: बरं बाबा … तू चल तर..
 …. काका , दोन स्पेशल चहा द्या, मस्त आलं-वेलची टाकून!
……….
म :  चांगला आहे रे चहा… त्यातून तू पैसे देणार म्हणून अजूनच चांगला लागत आहे, हॅ हॅ!  
ग:  हाहा, तेही खरंच… अरे वाह, हातात नवीन घड्याळ आहे  का?
म :  हो! अरे मी वाटच पाहत होतो की तुझं  लक्ष जातंय की नाही
ग: मस्त आहे… महाग असेल ना?
म :  हो, महाग तर असणारच कारण हे अस्सल रोलॅक्स (Rolex) घड्याळ आहे. दीड लाख मोजलेत मी याला  
ग:  बापरे … अरे पण ते अस्सल आहे हे तुला कसे कळले?
म :  घड्याळासोबत त्याचे अस्सलतेचे प्रमाणपत्र घेतलेय. वेडा वाटलो काय मी?
ग:  तसं नाही.. पण त्या प्रमाणपत्रांचं काय सांगता येत नाही…
म :  म्हणजे?
ग:  अशी प्रमाणपत्रे कोणीही बनवून देऊ शकतं-
म :  अरे बाबा, रोलॅक्स कंपनीचं प्रमाणपत्र आहे ते!
ग: हो, पण ते प्रमाणपत्र माणसंच बनवतात ना…  आणि माणसांकडून चुका होऊ शकतात.
म :  ओह… आलं लक्षात माझ्या.  पण ही  गोष्ट वेगळी आहे-
ग: म्हणजे तुझे रोलॅक्स अस्सल आहे हे  सिद्ध करण्यासाठी तुलाही मानवी साक्ष आणि मानवी संस्थांवरच अवलंबून राहावे लागते.
म :   तरीही-
ग:  कोण कुठल्या एखाद्या मानवी इंजिनीअरने  दिलेले प्रमाणपत्र तू  डोळे झाकून स्वीकारतोस, पण संतांची साक्ष मात्र नाकारतोस?
म्हणजे , जेव्हा सोयीचे असते तेव्हा तू मानवी पडताळणीवर, मानवी प्रमाणपत्रावर  विश्वास ठेवतोस. पण देवाच्या बाबतीत मात्र तीच तू नाकारतोस… ऐसा कैसे चलेगा राजा?.
म :  …
ग:  हे बघ… मुद्दा देव आहे की नाही हे  सिद्ध करण्याचा नाहीये.. तर  संतांचे  अनुभव, त्यांचा विश्वास नाकारण्यासाठी  तुम्ही जो निकष वापरता, त्याच निकषाने इतरही बऱ्याच गोष्टी  फेटाळल्या जाऊ शकतात.
म :  हम्म…  मी माझेच लॉजिक सोयीस्करपणे वापरत होतो, हे माझ्या लक्षातही  आले नव्हते.
ग: चालतं रे… तुला हा विरोधाभास दिसला आणि मुख्य म्हणजे तू तो मान्य केलास हेच महत्त्वाचे.
चल, तुझा चहा पिऊन झाला असेल तर निघुयात आपण.  
म :   हो… एक मिनिट थांब… अहो चहावाले काका,  यांच्याकडून पैसे घेऊ  नका – आजचे आणि यापुढील महिनाभराच्या चहाचे पैसे मीच देणारे.
 

 

GautamSoman_20260724.jpg

लेखक

  • गौतम सोमण
    गौतम सोमण

Post navigation

Previous: म्हातारपण
Next: |व्यवसाय की नोकरी|| भाग ९ उद्घाटन सोहळा
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.