इतिहासाच्या खाणाखुणा या सदरात आपण
ऐतिहासिक स्त्रियांचा विचार करणार आहोत .आज त्यांच्यामुळे स्त्रियां आपलं अस्तित्व सिद्ध करू शकल्या.आज आपण जी प्रगती केली आहे .अशा स्त्रिया ज्यांनी विविध क्षेत्रात आपलं नाव केलं आहे.भारतीय आणि जागतिक इतिहासात स्त्रियांनी राजकारण, समाजसुधारणा ,शिक्षण आणि स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका निभावली आहे.
अगदी प्राचीन काळातील संत किंवा ऋषितुल्य स्त्रियांचा विचार केला तर लोपामुद्रा,गार्गी आपाला,घोषा यांसारख्या विदुषी स्त्रिया घेता येतील.नंतरच्या काळात अनेक संत स्त्रियांनी पण स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न तर केलाच पण त्या अंगाने समाज प्रबोधन पण केले.उदा.मुक्ताबाई, संत जनाबाई, सोयराबाई,संत सखु वेण्णा बाई अशा अनेक स्त्रियांनी समाजाला एक वेगळी दृष्टी दिली.त्यांनी एक प्रकारे समाज व्यवस्थेविरुद्ध आणि पुरुषप्रधान संस्कृतीचा विरोध दर्शविला.
त्याचबरोबर समाज प्रबोधन केले.
मध्ययुगात राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर,राणी लक्ष्मीबाई ,राणी दुर्गावती , चांदबीबी, ताराबाई,येसुबाई यांचा समावेश आपण करू शकतो ज्यांनी लोकहितार्थ राज्य केले.अहिल्याबाई होळकरांनी स्त्रियांना सैन्य प्रशिक्षण दिले आणि त्यांची महिला फौज निर्माण केली.तर घरोघरी जाऊन महिलांना शिलाई कढाई आणि बुनाईचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले.त्यामुळेच आज माहेश्वरी साड्या जगप्रसिद्ध आहेत.
त्याचप्रमाणे महाराणी पद्मिनी यांनी जोहार करून स्त्रियांवरील अत्याचार आणि शीलरक्षणाचे उदाहरण प्रस्तुत केले.स्त्रियांना स्वतंत्रपणे जगायला शिकवले.या सर्व स्त्रियांनी परकीय आक्रमणां विरुद्ध नेतृत्व केले.
सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे,पंडिता रमाबाई,ताराबाई शिंदे यांनी समाज सुधारणा केली आणि स्त्री शिक्षणावर भर दिला.
राणी लक्ष्मीबाई अरुणा असफ अली, सरोजिनी नायडू, भीमाबाई होळकर,कस्तुरबा गांधी इंदिरा गांधी या सर्वांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय भाग घेतला होता.स्वातंत्र्य लढ्यातील भूमिगत
क्रांतिकारकांना निरोप पोहचवणे जेवणखाण देणे यासारखी अनेक कामे त्या करत .
एकंदरीत पहाता इतिहासातील स्त्रियांचा अभ्यास हा केवळ त्यांच्या जीवनाचा नसून तत्कालीन समाजातील त्यांच्या स्थानाचा आणि संघर्षाचाही अभ्यास आहे.