“साथी हाथ बढाना
एक अकेला थक जायेगा
मिलकर बोझ उठाना
साथी हाथ बढाना “
नया दौर या चित्रपटातील हे गीत एकत्र काम काम करण्याचे आणि आम्ही या शब्दाची व्याप्ती आणि ताकत सांगते.
अगदी सांघिक खेळात देखील सर्वांचेच योगदान असल्याशिवाय विजयश्री मिळत नाही अगदी क्रिकेट पासून दहीहंडी पर्यत सर्वांनाच हा नियम लागू आहे.
मी हे करतो, हे मी केलं माझं हे विश्व आहे असं बोलण्यात नकळत अहं गर्व येतो. याच ठिकाणी आम्ही शब्द आला की सर्वांनाच श्रेय मिळतंय त्यामुळे श्रेयासाठी होणारे वाद ही टळतात.
“एक तीळ सात जणांनी वाटून खावा” ही कोणतीही प्रत्यक्ष घडलेली जुनी कथा किंवा गोष्ट नसून, आपली संस्कृती आहे. अल्प किंवा कमी प्रमाणात असलेले अन्नदेखील आपापसात प्रेमाने व समाधानाने वाटून खावे आणि एकोप्याने रहावे. हा संदेश देणारा एक लोकप्रिय मराठी वाक्यप्रचार किंवा म्हण आहे.ती देखील एकता आणि प्रेमाचं महत्व अधोरेखित करते.
लहानपणी एक काडी लगेच तोडता येते पण त्या एकत्र बांधल्या तर तुटन अशक्य असतें. एकीचे बळ सांगणारी ही कथा सर्वाना माहिती असली तरी आज सर्व विसरलो आहे.
विभक्त कुटुंब पद्धती मुळे एकत्र कुटुंब म्हणजे काय?, हे समजवून सांगावे लागते. एकटे संकटास सामोरे जाताना तणाव असह्य होऊन निराशेच्या गर्तते जाऊन मानसिक आजरा होऊन उपचार घेणारी मंडळी खूप आहेत.
सामाजिक जीवनात तर मी हा शब्द विसरून नेहमी आम्ही या शब्दाचा सढळ वापर करावा.
“मै चलता गया अन कारवा बनता गया l”
हे म्हणताना आदर्श वाटते पण असं करताना हा पुढेपुढे जात एकटा खूप दूरवर निघून जाऊन एकटा पडण्याची शक्यता आहे. सर्वाना बरोबर घेऊन प्रगती हवी. सबका साथ सबका विकास. हे साध्य करण्यासाठी मी विसरून आम्ही ह्या शब्दाला महत्व दिले पाहिजे. जे करेल ते कुटुंबासाठी.. गावासाठी.. देशासाठी.. जगासाठी असा सर्वव्यापक दृष्टिकोन हवा.
कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करायची आहे.रोज क्षुल्लक कारणावरून कडकडून भांडणारे आई वडील त्यांच्या मुलांना भांडू नका असं सांगताना विरोधाभास वाटतो. अन ते मुलं ते ऐकतील का? ती कला त्यांनी आई वडिलांपासून शिकली आहे हे ते जाम विसरता.असच या विचाराचेही आहे. मी लिहिणारा नसून या मंचावरील “आम्ही” मंडळी लिहून घेतात असेच वाटले पाहिजे. एकत्रित लिहिण्याचा या सुंदर प्रवासाचा आपण सर्व अनुभवला आहे आणि त्याचा आनंद घेत आहे.
शेजारच्या घरात कुणी दुःखी असेल तर तुम्ही सुखी होऊ शकत नाही हा मंत्र जाणून त्यालाही प्रगतीच्या यशाच्या मार्गांवर नेण्याची आपलीच जबाबदारी आहे.
“वसुधैवकुटुंबकम” सर्व विश्व आमचे घर आहे ही भावना एकमेकांबद्दल द्वेष शत्रूता असल्यास दूर करण्यास कारणीभूत ठरते.
मी माझं अशा प्रथम पुरुषी एकवचनी शब्दाबरोबर नकळत गर्व येतो. काही मंडळी कार्याने खूप मोठी होतात आणि “आम्ही” हा शब्द एकवचनी स्वरूपात “मी” ऐवजी वापरायला लागतात. यश सत्ता धन प्राप्त झाले की नकळत ग ची बाधा होउ शकते असे जाणकार म्हणतात.
मग तो गर्व,
कुणाला रूपाचा
कुणाला धनाचा
कुणाला गावाचा
कुणाला जातीचा
कुणाला सत्तेचा
कुणाला मुलांचा
कुणाला दानाचा
कुणाला बुद्धीचा
कुणाला शक्तीचा….
या अगणित गोष्टींचा
असू शकतो.
अहं धन अन शक्तीचा
उगाचच असतो गर्व..
चितेवर अंत एकच
जाणतो जरी सर्व!!
तुझे ते नसेल तेव्हा
होइल धनी तो दुसरा
जीवनाचे जाणा मर्म
मी पासूनी करा सुटका!!
छोटी मुंगी उदाहरण देते
एकता काय ते सांगे ?
वजनी खडा साखरेचा
एकत्र घरी सर्वासवे नेते
“मी” ला विसरा आता
“आम्ही” शब्द सदा वापरा
होईल कार्य सहजकी
अद्भुत जादू ती अनुभवा!!
जे आहे ते सर्व आपले
माझे काही इथं नाही
आपुलकी प्रेम जपता
शत्रू न उरे तो कोणी!!