Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

आमची हिम्मतवान गुरू

वैभव शिरखेडकर जुलै 29, 2026 1 minute read
0
gumohor-water
तिचा संघर्ष तिच्या जन्मापासूनच सुरू झाला होता. एका भल्या मोठ्या कुटुंबातली ती वयाने सर्वात लहान व्यक्ती. घरातील कोणत्याही कामात मदत करण्यापासून तर शेतीचे काम करण्यापर्यंत ती नेहमी तयार असायची. तिच्या सर्व भावंडांचे लग्न झाल्यावर कधी त्यांच्या घरी गेली तर तिथेही ही सर्वच कामात सदैव तत्पर असायची. कधीतरी आरामात श्वास घेऊन शांतपणे एकाजागी बसली असेल तर नवल.
तिचे लग्न झाल्यावर सुद्धा काही परिस्थिती बदलली नाही. नवऱ्याने म्हटले कुठे सोबत चल, तर जायची अन्यथा नाही. तो पौरोहित्य कार्य करून घरी आला की त्याला आलेल्या दानातील वस्तू वेगवेगळ्या करण्यातही तिचे बरेच आयुष्य गेले. मग एकवेळ अशी आली की, हे कार्य करणे तिचे थांबून गेले. कारण तिचा तोच नेहमीकरता तिला आणि लेकरांना पोरके करून गेला. ती रडली पण हिम्मत मात्र हरली नाही. सर्व चांगले होईल चा जप करत करत एकदम हळू हळू का होईना सर्व चांगले व्हायला लागले. मात्र तिचा संघर्ष अजूनही थांबला नव्हता आणि थांबलेला नाही. 
मुलांच्या नोकरीसाठी या ना त्या देवाला नवस कर, की आणखी काही तिचे चालू राहायचे. तिची इच्छा काय तर फक्त ८ ते १० हजार खूप आहे पगाराचे. तिच्या या भोळ्या भक्तीला देव पण बराचवेळा पावला. 
जरी ती फार तणाव घेत नसली तरी मानसिक संघर्ष तर आहेच. कधी चिडचिड सुद्धा होतेच ती वेगळी. रोजची ती तडतड, रोजची कामे हे आजही सुरू आहे. मुलांचे लग्न लवकर होऊ दे ही मागणी अजूनही तिच्या देवाने पेंडिंग ठेवली आहे.
तिच्या कार्यात तिला तिच्या मुलांचीही मदत होतेच आणि तिला सुद्धा आपल्याविषयी मुलांना जाणीव आहे याचेही तेवढे समाधान आहे. मात्र कुठेतरी एक संघर्ष जो अजूनही थांबला नाही अजूनही सुरूच आहे.  
या संघर्षातही तिला तिच्या मुलांचा अभिमान आहे. ती पूर्ण अभिमानाने सांगू शकते की माझी मुले चांगली आणि प्रामाणिक आहेत. 
एवढे असणेच तिच्यासाठी सर्व काही आहे. म्हणूनच मला माझ्या अशा गुरूचा माझ्या 'हिम्मतवान आईचा' अभिमान वाटतो. 
कारण आई ही आईच असते. तू माझ्या मुलासारखा आहे म्हणणारे खूप असतील पण स्वतःची मुले कशी आहे ते फक्त आईलाच ठाऊक असते. 
लेखक – रोज डब्यात कोणती भाजी आहे हे माहित नसलेला वैभव. 😀

लेखक

  • वैभव शिरखेडकर

    वैभव शिरखेडकर, नागपूर
    नागपूरला खासगी क्षेत्रात नौकरी. विविध विषयांवरचे पुस्तके वाचनाची आणि हिंदी, मराठी कविता लिखाणाची आवड. नागपूर विश्वविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी.

Post navigation

Previous: मोदक
Next: भगवंतांचे नामकरण आणि यमलार्जून उद्धार
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.