Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

सजग पालकत्व : काळाची गरज

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026
0
gumohor-water

शुभंकरोती कल्याणम, आरोग्यम धनसंपदा ..

घराजवळील मैदानावर खेळत असलेली मुले तिन्ही सांज होताच खेळ सोडून घरी परतून तिन्हीसांजेला प्रार्थना, परवचा म्हटत असत. ते चित्र आता खूप धूसर झाले आहे. अनेक घरांमध्ये अशी रोज प्रार्थना ठरल्या वेळी सगळ्यांनी मिळून म्हटली जात असेलच असे काही नाही. अर्थात केवळ प्रार्थना म्हणणे हे काही पालकांसमोरील आव्हान नाही.

आता पालक असलेले जेव्हा स्वतः मुले होती. त्यावेळी घरात किमान आजी आजोबा, एखाद दोन भावंडे असायची. तो काळ मागे पडून घरटी एखादे च् मूल, क्वचित दोन मुले, आणि काही घरांमध्ये असलेले जेष्ठ नागरिक. होय त्यांना आजी आजोबा असं म्हणता जेष्ठ नागरिक म्हणणे जास्त संयुक्तिक आहे. कारण आता पालक असलेली मुलांचा  घरातील आजी आजोबांसोबत संवाद होत असे. त्यामुळे मुलांच्या मनात त्यांचे एक विशेष असे स्थान तर होतेच शिवाय त्यांचा धाकही होता. या नात्याचा संवादांचा फायदा त्यावेळी मुलांच्या जडण घडणीसाठी मोलाचा ठरत असे. घरातील जेष्ठांचा धाक तेव्हा घरातील सर्वानाच असे. त्यामुळे घरात काही अलिखित नियम असत, जे सगळे जण पाळत असत. याचा उपयोग मुलांना चांगल्या सवयी लागण्यासाठी नक्कीच झाला. अर्थात त्या वेळी देखील काही मुलांना त्यांच्या आजी आजोबांचा सहवास मिळाला असेलच असे ही नाही. पण अशा एकत्र कुटुंब पद्धती मधे मुले वाढविताना आई वडिलांना काही वेगळे प्रयत्न मात्र नक्कीच करावे लागले नसतील. पण तेव्हाची मुले असलेली पिढी अर्थात आताची पालक मंडळी मात्र मुलांना वाढविताना अनेक आव्हानांचा सामना करताना दिसते आहे.

आताचे पालक हे स्वतः उच्चशिक्षित तर आहेत च पण त्यांची कामे ही बहुतांश संगणक, मोबाइल यासारख्या तंत्रज्ञानावर आधारलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक घरात मुलांच्या समोर मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही, यांचा सहजपणे होणारा वापर हा अगदी सामान्य झाला आहे. त्यामुळे आताची मुले ही जन्मापासूनच मोबाईल सहजपणे हातळताना  दिसतात. वरवर याचे पालकांना कौतुक वाटत असले तरिही त्यामागचे कितीतरी धोके पालकांना दिसत आहेत. अर्थात पालकांसमोर चे मोबाइल हे एक सर्वात मोठे आव्हान असले तरिही अशी अनेक आव्हाने आहेत जी पाल्यांचे संगोपन करताना पालकांच्या समोर आव्हान म्हणून उभी आहेत. आताचे पालक कोणकोणत्या आव्हानांचा सामना करीत आहेत ते आपण थोडक्यात बघूया.

1.   स्मार्टफोन

2.   बाहेरील जेवणाचे विविध पर्याय आणि सहज उपलब्धता

3.   मुलींसाठी कपड्यांचे उपलब्ध पर्याय

4.   स्वच्छता आणि वेळेचे महत्व

अशी आणखी ही अनेक आव्हाने आजच्या पालकांसमोर आ वासून उभी आहेत. त्यांचा सामना करताना पालकांची अगदी तारांबळ होत असली तरिही आपले मूल ही आपली जवाबदारी आहे असे समजून त्याच्या सगळ्या गोष्टी या आपल्या शी संबंधित आहे त्यामुळे तो उद्याचा जवाबदार नागरिक होणार आहे आणि त्या अनुषंगाने त्याच्या जडणघडणीत आपले नेमके योगदान कसे असले पाहिजे या संभ्रमवस्थेत आजचे पालक दिसतात.

 

 

 

लेखक

  • शिवानी बलकुंदी
    शिवानी बलकुंदी

Post navigation

Previous: समारोप
Next: जुनी पाने
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.