#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६
|| निसर्गसरसाञ्जलि: ||
“आवडतो मज अफाट तळ ,
अथांग पाणी निळे
निळ्याजांभळ्या जळात
केशर सायंकाळी मिळे”
कुसुमाग्रजांची “सागर” या कवितेतल्या काही ओळी थोडे बदल करून प्रस्तुत केलेले आहे. आणि हाच आजचा विषय आहे.
अंबाझरी!! म्हणतात किंवा ऐकताच, डोळ्यासमोर येतो तो एक अथांग एक सुंदर तळ. निरव शांतता, वाऱ्याचा थंड झुळूक, आणि पाण्यावर उडणाऱ्या लहरी, निसर्गाने भरभरून उधळलेले सौंदर्य असे चित्र डोळ्यासमोर येत.
मुळात याच्या पूर्व किनाऱ्यावर बसून सूर्यास्त बघणे हा एक अलौकिक अनुभव आहे. सायंकाळच्या मावळत्या सूर्याच्या वेगवेगळ्या रंगछटा पाण्यात मिसळलेले सूर्याचे केशरी रंग, आणि त्याचे प्रतिबिंब बघण्यात देहदान विसरून स्वतःला विसरून, त्या क्षणात हरवून जाणारा इतका तो जिवलग आणि अविस्मरणीय क्षण पूर्ण आयुष्य फुलवून देणारा आहे.
अंबाझरीच्या मधोमध वडसावा खांब असावा, पण एक निशाणी म्हणूया त्यावर दर स्वातंत्र्यदिनीला, क्रांती दिनाला आणि प्रजासत्ताक दिनाला भारताचा तिरंगा लावला जायचा.
आपण त्याला प्रत्येक अंबाझरीला पोहणाऱ्या दिग्गजांचे स्वप्न या झाडाला चक्कर मारून येणे, अथवा त्याला हात लावून येणे म्हणजे जग जिंकणे. त्यासाठी किती किती दिवस अथांग प्रयास आणि सराव. त्यातलाच एक मी बरं का ज्या दिवशी झाडाला चक्कर मारून आलो होतो त्यादिवशी, पूर्ण जग जिंकल्याचा आव आणत अंबाझरीच्या किनाऱ्यांचा राजा म्हणून मिरवलो होतो, काय ते लाड!! काय ते कौतुक!! वा !!! वा!!!
कालच तापसी ताईंनी नाग नदीचा उल्लेख केला होता त्याचा उगम इथूनच होतो बर का……..