Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

काकस्पर्श

हेमंत नाईक जुलै 2, 2026 1 minute read
0
1001085704.jpg

ईश्वराकडे गेलेल्या आप्ताना, जन्मदात्यांना, पूर्वजांना स्मरण करून त्याच्या बद्दल कृतज्ञता,  आदर व्यक्त करण्यासाठीचा  पंधरवाडा म्हणजे पितृपक्ष. हे सर्वं पितर कावळ्याच्या रूपाने येऊन प्रसाद भक्षण करतात ही भावना..आणि समज अजूनही रूढ आहे.

सर्वपित्री,पूर्वज काकरूपे,
पृथ्वीतलावर अवतरती..
नैवेद्याच्या काकस्पर्शास्तव ,
आप्तजन प्रार्थना करिती 
झाले कावळे अदृश्य,
दिसें कुठेकूठे क्वचित
दर्भाचा करुनी कावळा 
पिंडास होतो काकस्पर्श..
लहानपणी चित्रपट बघताना नेहमी सुखी अंत असलेले चित्रपट  मला आवडायचे. माहेरची साडी, बैजूबावरा, दिल अपना प्रीत पराई, साथी हे चित्रपट सुपरहिट ठरले असले तरी चित्रपटगृहातून बाहेर येणाऱ्या महिलांचे डोळे चित्रपटची कथा सांगत असत. त्यामुळे आपण आनंदासाठी जातो तिथे परत दुःखी होऊन का यायचे या भावनेतून मी हे असे रडके चित्रपट बघावयास जात नव्हतो. आज ही दुःखी कथा लिहावी का? हा प्रश्न मनात होता…पण जीवनाचे असे ही एक वास्तव रूप असू शकते.. हे सांगण्याचा एक प्रयत्न..
ही सत्यकथा सुमारे पन्नास साठ वर्षांपूर्वीची आहे.दुःखाची परिसीमा किती असू शकते, हे सांगणारी ही कथा.
प्रत्येकास कुठंतरी केव्हा न केव्हा आप्त दुरावण्याचे दुःख सोसावे लागते. पण असे आयुष्याचे वेगवेगळ्या टप्प्यावर नेहमी घडत असताना फक्त्त अन फक्त्त दुःखा चा सामना करत असतानाही कधीही ईश्वरला  दोष न देणारी, लोकांच्या मदतीला सदैव धावून जाणारी निष्काम कर्मयोग अंगी भिनलेली कृष्णामाई विरळच.
ही कथा आहे दोन मुली आणि एक मुलगा असलेली आणि तरुणपणी लवकर वैधव्याची कुऱ्हाड कोसळलेल्या दुर्भागी  कृष्णामाईची . 
देवाने तिच्यावर एवढा अन्याय करूनही ती सर्वं व्रत  देवाची पुजा नित्य नेमाने करत होती.सर्वं स्तोत्र पाठ होती तिला. भागवत वाचण्यात हातखंडा होता.. सर्वं कहाण्या तिला पाठ होत्या आणि तेवढ्याच रसाळपणे ती सांगत असताना आजूबाजूच्या सर्वं महिला गर्दी करीत असत.. गावात कुणीही मदतीला बोलवले. तर लागलीच कृष्णा माई हजर होई ..सकाळी येणाऱ्या वासुदेवापासून संध्याकाळी येणाऱ्या गाईपर्यत कोणीही तिच्या घरून  विन्मुंख जात नसे..धान्य दान करण्यासाठीचा डबा बैठकीत नेहमी  भरलेला असे.
तिचा मुलगा तात्या हा हाडाचा शेतकरी वीस एकर जमीन असली तरी कोरडवाहू शेतात पेरे करताना सोसायटीचे कर्जे काढायची आणि पीक आली ती परत भरायची हाती शिल्लक शून्य. वडिलोपार्जित दागिने होते ते शेतात विहिरी खोदण्यात गेले होते. थोडक्यात जेमतेम चरितार्थ चालेल एवढीच काय ती कमाई.अस  पन्नास वर्षांपूर्वीही कोरडवाहू शेतकऱ्याचे जीवन होते जे अजून ही तसेच आहे.
बर शेतावर आई प्रमाणे प्रेम करणारी ही मंडळी नफा काय आहे याचा विचार न करत वर्षा न वर्षे शेती करण्यातच धन्यता मानणारी असतें. नाही म्हणायला तात्यांना डिझेल इंजिन पंपाचे काम येत होती पण विना मेहनताना काम करायचे सर्वं गावचं आपले आहे पैसे कसे घ्यायचे? हा प्रश्न असे.त्यातूनही मिळकत अल्पच.
तात्यांना  मुलबाळ नव्हते.अनेक व्रत वैकल्ये करूनही त्या घरी पाळणा हलला नव्हता, तरी सर्वं सुखात होते. प्राप्त स्थितीत आनंदात जीवन जगत होते. उन्हाळ्याच्या सुटीत तात्यांबरॊबर बैल गाडीत बसून शेतात जाणे ही पर्वणीच असायची. दुपारी कृष्णामाई प्रल्हाद अन कृष्णाच्या अगाध लिला रसाळपणे सांगायची.गाव छोटं खेड असले तरी सुटीचे दिवस मजेत सरायचेत.
अशाच एका वर्षी पोळ्याच्या दिवशी बैलांना अंघोळ घालून त्यांची पूजा करून  दुपारी जेवण झाल्यावर तात्या कसतरी होतय म्हणून पडवीत आडवे झाले ते कायमचे. खूप मोठा हृदयाविकाराचा झटका आला होता.कृष्णा माई व त्यांची सूनबाईवर दुःखाचा डोंगर कोसळला होता .  आता त्या घरावर जीवघेणी उदास छाया पसरली होती..
घरातला कर्ता नव्हता. दुःखाला आवर घालून  कृष्णामाईचा ईश्वर पूजेचा नेम कायम होतो सकाळी मंदिरात त्रिविक्रमाचे दर्शन करून नित्य नेमाने तुळशी वृदावनाची पुजा करून त्यास २१ प्रदक्षिणा झाल्यावर देवपूजा केल्यावरच ती अंन्नग्रहण आणि तेही आता एकदाच ती करत होती दुपारी न झोपता कापसाच्या वाती करताना देवाचे सर्वं अभंग म्हणतं तिच जीवन व्यतित होत असताना परत दुर्भाग्य आडवे आले.
एकदिवस तिच्या ४० वर्षाच्या धाकट्या मुलीला कॅन्सर निदान झाल्याची दुर्दैवी बातमी आली माईने अजून कडक उपास करण्यास सुरुवात केली देव तर पाण्यात उतरवले पण उपयोग झाला नाही.  तिन महिन्यांनी दुपारी तारेने ती अशुभ बातमी आलीच. तरुणपणी मुलाचा अन मुलीचा झालेला अंत पाहून ती पुरती कोसळली होती. तिची सात्वन करायला थोरली कन्या अक्का आली होती. त्याच दिवशी मनास आवर घालून संध्याकाळी परत जपमाळ घेऊन रामाचा जप तिने सुरु केला..
जेमतेम तीनचार वर्ष सरली होती. दुःखावर थोडी काळाची खपली बसली असतांनाच परत दैवाने दगा दिला,  थोरल्या अक्काचा अपघात झाला होता मेंदूत रक्तस्त्राव झाला असल्याने डॉक्टरांनी गंभीरता सांगितली होती. आणि चार ते पाच दिवसात अक्काचीही प्राणज्योत मावळली. दैव किती निष्टुर असते, आपण जिवंत असताना आपल्या सर्वं तरुण मुलांचे असे देवाघरी निघून जाणे देवावरचा विश्वास उडवणारे होते. देव आहे की नाही अशो मनात शंका यावी इतके आघात कृष्णामाई वर झाले होते.
अस असून ही तिची ईश्वर निष्ठा कायम होती.सकाळी लवकर उठून सडा समार्जन करून रांगोळी काढून मंदिरात देवदर्शन करून आल्यावर तुळशी पूजन तिला घातलेल्या रोज एकवीस प्रदक्षिणा.. सर्वांशी प्रेमळ वागणे.. यांचकाला कधीही विनमुख न पाठवणे.. सर्वांच्या मदतीला स्वतः होऊन धावून जाणे… देव स्तुतीचे अभंग गाणे.. उपास तपास.. व्रत वैकल्ये…. आदी  नियमित होत होते. हे सारे देवाने नाकारले असले तरी तिची भक्ती कमी न होता वाढली होती.
दोन चार वर्षात  तिची सुनबाई  सर्प दंशाचे कारण होऊन गेल्यात. कधीच सासूस न दुखावणारी लेकीसमान सून गेल्याचा खुप मोठा धक्का कृष्णमाईस बसला होतो.  एवढ्या   मोठया जीर्ण पडक्या वाडयात एकट्या ८८ वर्षाच्या कृष्णा माई आणि तिच्या सोबतीला शिसवी देव्हाऱयातील तिचे नित्य पुजा केलेले लखलखीत देव फक्त उरले होते. अजूनही तिचा दिनक्रम मात्र अगदी तसाच होता.
अजून पाच वर्ष सरलीत आणि एकदिवस  देवालाही तिची शेवटी दया आली. तिच्यावर प्रसन्न झाला तिला तिच्या मुलाच्या पतीच्या भेटीसाठी आमंत्रण देवाने धाडलं होते.शेवट पर्यत चालती बोलती असलेली, रात्री झोपलेली कृष्णामाई. सकाळी उठली नव्हती. तिच्या चेहऱ्यावर शेवटीही  प्रसन्न हसू होते. ती गेल्यावर तिच्या इच्छेनुसार जे काही उरले होते ते गावातील त्रिविक्रमाच्या मंदिरास दान केले. देवघरातील देवही आप्तानी वाटून नेलेत आणि शिसवी कोरीवकाम केलेले देवघर रिकामे झाले होते.
जीवन ठरते फक्त्त शिक्षा
नसता कुटुंबात उरता कुणी..
जीवनही तेव्हा मरणच वाटे 
एकटेपणाही एकटाच राही..
वाट पाहुनी ईश्वर भेटीची 
डोळे पार ते थकून गेले..
कारण काय उरले आता
जगायचे ते बाकी राहिले..
दया आली श्री भगवंताला
सुदिन शेवटचा  तो आला..
सोडायला ना कुणी स्वगृही
एकटीचा प्रवास सुरु जाहला..
भकास वाडा.. पडल्या भिंती
वृंदावनी हिरवी तुळस वाळली 
रुदन करे जीर्ण वाडा मुक्याने 
निर्वश काय तो नकळत जाणे
देवही वाटले देव्हारा  उरला
आडगळीत तो न हार न माळा
रोजच्या आरती कहाण्या विरल्या
दीप विझता.. मुक्या विराण्या..
माईच्या तेराव्याला संपूर्ण गाव आले होते. सर्वं आप्त आवर्जून जमली होती. तिच्या सत्काऱ्यांची, प्रेमळ स्वभावाची ती पोहचं होती. जमल्यावर प्रत्येकाने तिने त्यांना केलेली मदत..तिच्याबद्दल असलेल्या भावना, आठवणी व्यक्त करताना ते गहिवरत होते.
“जन्मभर दुःख तिच्या पाचवीला पूजले होते. त्याचा अतिरेक झाला त्याची दाहकता कमी होते. दुःख हा शब्द अगदी तसाच वेळोवेळी अनुभवून घासूनघासून अगदी बोथट झाला होता तिच्यासाठी. आता शेवटी फक्त्त एकच इच्छा होती ईश्वर भेटीची.. आणि तिही खुप वाट बघितल्या नंतर पूर्ण झाली होती.”
तिच्या  श्राध्दाला मात्र समोरच्या पिंपळाच्या झाडावर खुप कावळे होते,  प्रसाद व पिंडास खाण्यासाठी कावळ्यांची सर्वच्या सर्वं झुंड आली होती. पिंपळावर एकही कावळा शिल्लक राहिला नव्हता. प्रसाद त्यांनी अवघ्या दोन मिनिटात पुरता फस्त केला होता.
कृष्णमाई होती निरीच्छ
भोगले सर्वं अतीव दुःख
कठोर तिजवर जरी ईश्वर
त्याचीच ती निस्सीम भक्त
लवकर गेले तिचे सौंभाग्य
देवाघरी गेला मुलगा प्रेमळ 
मुलीही भावा भेटण्यास गेल्या
सासू सुना त्या मागे उरल्यात 
वंशवेलीची सुकली पान फुल
ईश्वरभक्ती तरी तिची अविरत
शेवटच्या दिनी देव प्रसन्न झाला
तिला तो स्वर्गी घेऊन गेला 
तिच्या तेराव्यास प्रसादासाठी 
आप्त गावकरी  जमली सारी 
प्रसादास शिवले कावळे  अनेक
निरीच्छ भक्ताचा तो काकस्पर्श..
✍️हेमंत नाईक
Yahoo Mail: Search, organise, conquer

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा  असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: अंबाझरी
Next: लक्ष्मणराव आणि कुटुंब – ०१
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.