Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

कदर जाने ना..

गौतम सोमण जुलै 5, 2026 1 minute read
0
gumohor-water
अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे दुर्लक्षित केले जात असल्याची, आपल्या कामाची किंवा अस्तित्वाची कदर केली जात नसल्याची भावना. आणि हे केवळ वृद्धांबाबतच घडते असे नाही, तर लहान मुले आणि तरुणही अनेकदा अशाच भावना व्यक्त करतात.
या मागचे कारण आणि त्यावरील उपाय शोधण्याचा प्रयत्न करताना मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या.
मुळात घर असो, शेजार-पाजार असो किंवा समाज – सर्वत्र आपली किंमत किंवा महत्त्व  आपण इतरांसाठी कोणते ठोस योगदान देतो त्यावरूनच  ठरते .
या योगदानाचे प्रामुख्याने खालील प्रकारांत वर्गीकरण करता येईल:
-आर्थिक योगदान
-शारीरिक योगदान
-बौद्धिक योगदान

लहानपणी आपल्याकडून आर्थिक किंवा बौद्धिक योगदानाची अपेक्षा नसते. पण शारीरिक कामांच्या बाबतीत मात्र आपल्याकडून सहभागाची अपेक्षा असते – मग ते घरातील कामात मदत करणे असो, कौटुंबिक समारंभ असोत किंवा सामाजिक कार्यक्रम. जो मुलगा किंवा जी मुलगी अशा प्रकारे सक्रिय असते, त्याचं कौतुकच होतं , किमानपक्षी दुर्लक्ष केलं जात नाही.

युवा आणि प्रौढावस्थेत अपेक्षा बदलतात. आपल्याकडून पैसे कमवण्याची आणि त्याच वेळी शारीरिक कामांसाठी पुढाकार घेण्याची अपेक्षा असते. कुटुंबात पैसे कमवणाऱ्या सदस्यांना सहसा आदराची वागणूक मिळते. त्याच वेळी, घर चालवण्यात मदत करणाऱ्यांनाही – मग त्या गृहिणी असोत, घरकाम करणाऱ्या मदतनीस असोत किंवा इतर कोणी – एक विशिष्ट दर्जा किंवा मान मिळतोच.

वृद्धापकाळात शारीरिक कामांच्या बाबतीतीतील अपेक्षा कमी असतात. आर्थिक योगदानाची काही प्रमाणात अपेक्षा असते. पण ज्येष्ठांकडे प्रामुख्याने अशा व्यक्ती की  ज्यांच्याकडून सल्ला, अनुभवाचे बोल, आणि कठीण प्रसंगी चार धीराचे शब्द मिळू शकतील अशा दृष्टीने पाहीले जाते.

जेव्हा आपली कदर केली जात नाही असा मनात विचार येतो तेव्हा आपण स्वतःला पहिला प्रश्न विचारला पाहिजे – आपल्या वयानुसार अपेक्षित असलेले योगदान आपण देत आहोत का?

 लहानपणी आपण घरकामात किंवा इतर किरकोळ कामांत मदत करतो का? 
तरुणपणी आपण आपली कमाई वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो का? आपल्या समाजात काही सकारात्मक बदल घडवण्यासाठी काही  पुढाकार घेतोय का? 
आणि शेवटी, ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण पुढच्या पिढीची काळजी घेतोय? त्यांना मानसिक पाठबळ, आपल्या अनुभवातून शिकलेल्या चार गोष्टी आणि (शक्य असल्यास ) आर्थिक  आधार देतोय  का?
जर आपण यापैकी काहीच करत नसू, तर आधी आपण स्वतःला  कौतुकास आणि आदरास पात्र बनवूया.
आणि जर आपण आपले योगदान देतच असू, तर त्यात आणखी थोडी प्रगती करूया.

लेखक

  • गौतम सोमण
    गौतम सोमण

Post navigation

Previous: लक्ष्मणराव आणि कुटुंब – ०४
Next: आनंद कि सुख ? भाग २
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.