#सुरपाखरू#३०दिवसात३० #जुलै२०२६
मुक्त छंद
शब्दांचा खेळ
बस भावनांचा मेळ
आमच्या लहानपणी सकाळ आणि संध्याकाळ हे सुद्धा माहिती नव्हतं, उजाडला दिवस की खेळायला जायचं मैदानात सायंकाळी घरी वापस येऊन खेळायचे. असे आणि एवढीच दिनचर्या होती.
मग शाळेत जायला लागलो फारसा काही फरक नव्हता. सकाळ उठली की खेळणे, शाळेतून वापस येताना सायंकाळपर्यंत खेळणे. कधी श्रीराम बनून तर कधी अर्जुन बनवून, बांबू कमच्यांचे तीर धनुष्य बनवून, कधी शिवाजी, कधी तानाजी कधी संताजी तर कोणी बाजीप्रभू लाट्या घेऊन खेळायचे. हे खेळताना तर कधी कधी अंगावर हातावर, पाठीवर वळही उमटायचे. पण सगळे मस्त चालू होते. कॉलेज सुरू झाले. ट्युशन पण त्यातही, सकाळ आणि सायंकाळ असाच वेळ होता. हा; बस खेळणे थोडे कमी झाले होते, पण जोम कमी झालेला नव्हता.
हळूहळू मोठा झालो, नोकरीला लागलो, त्यातही सकाळ आणि संध्याकाळ असाच वेळ होता. सकाळी जायचे सायंकाळी वापस, कधी कधी तर रात्रही व्हायची. स्टेटस सिम्बॉल म्हणून कुठल्यातरी क्लबला जॉईन करायचे. हळूहळू सकाळ तशीच राहिली ऑफिसला जाण्यासाठी, पण वापस येण्याच्या वेळा हळूहळू उशिरा उशिरा व्हायला लागला. कामाचा व्याप वाढला, ताण तणाव वाढला, तस तशी दिनचर्या ही बदलत गेली. खाण्यापिण्याच्या वेळाही राहिल्या नाही, टेन्शन आणि अनिद्रा असे त्रास व्हायला लागलेत.
त्यासाठी डॉक्टर कडे गेलो. तर त्यांनी काही गोळ्या लिहून दिल्या आणि सांगितले या गोळ्या, “सकाळ”, “दुपार” आणि “संध्याकाळ” अशा घ्यायचा. आणि इथेच दुपारची ओळख झाली, असे नव्हते की दुपार माहितीच नव्हती, सुरूवातीपासूनच त्याचे कधी काम पडेल असं काही वाटलं नव्हतं. पण ही “पहिलीच वेळ होती रोजच्या दैनंदिन जीवनात दुपारी” पहिल्यांदाच आवर्जून आली. आणि अशी ती जीवनाचा एक भाग बनली.