नंतर म्हणजे कधी ?
भाग 2
बँकेतला सगळा प्रसंग डोळ्यासमोर आला. बँकेत लावलेलं एक पेंटिंग आठवलं. थोडं नवल वाटलं होतं. बँकेसारख्या रुक्ष जागी पेंटिंग कसं काय लावलं होतं काय माहित. त्यावरून आठवलं आपण या रविवारी पेंटिंग करणार असल्याचं विभोर आणि अबीर ला प्रॉमिस केलं होतं. मी शनिवार रविवारी एक नवं पुस्तक वाचायला सुरुवात करणार होते. मोबाईलचा वापर विकेंड ला कमी करणार होते. सोशल मीडिया तीन दिवस बंद ठेवणार होणार होते. ‘ आई गं !! ' नंतर नंतर नंतर' हे माझ्या जगण्याचं की न जगण्याचं सूत्र बनत चाललंय की काय ?! डोळे खाडकन उघडले. फक्त अंधेरी आलं होतं. ‘ काहीतरी फारच चुकतंय असं वाटायला लागलं.
एका सुंदर टूरवर जायचयं पण नंतर. आम्ही पाच जणांनी तीनचार दिवस वेगळेपणाने घालवायचे आहेत पण नंतर. पेंटिंग सुरू करायचं आहे पण नंतर.. परदेशात जाऊन काही आठवडे काम करायचं आहे पण नंतर. आईला चिपळूणला काही दिवस रहायला घेऊन जायचंय पण नंतर. माझी अनेक छोट्या मोठ्या गोष्टी करायची लिस्ट वाढतच चालली आहे आणि ‘ नंतरचा ‘ दिवस आणखीन पुढे पुढे..
दादर आलं. काहीही न ठरवता मी अभावितपणे उतरले. उतरून प्लॅटफॉर्मवरच्या बेंचवर शांतपणे बसले. सगळे जण पळत होते. कोणी गाडी पकडायला. कोणी उतरल्यावर बस पकडायला. कोणी ऑफिस गाठायला. यातली बरीचशी लोकं आपापल्या करायच्या गोष्टी ‘ नंतर ‘ च्या डब्यात बंद करून पुढे पुढे पळत होते. लोकांची धावपळ बघत शांतपणे बसून राहिले. मनात आलं, ‘ मला त्या बँकेतल्या मॅडमवर चिडण्याचा काय हक्क आहे?? माझ्या करायच्या बहुतेक गोष्टी मी ' नंतर ‘ च्या फोल्डर मध्ये टाकून ठेवल्यात. फोन उघडला सौरभसरांना आज येत नाहीये असं कळवलं. गर्दीला , त्यांच्या लगबगीला विसंगत मी संथपणे स्टेशन च्या बाहेर पडले. स्टेशनरीच्या दुकानातून रंग आणि कागद घेतले. वाळलेले जुने रंग आता टाकून देऊ असा विचार केला. स्टेशनजवळून निशिगंधाची फुलं घेतली. थेट प्लॅटफॉर्मवर आले. वसई स्लो ट्रेन मिळाली. निवांतपणे खिडकीत बसायला मिळालं. भाईंदरला उतरून बँकेत गेले.
मॅडम आणि त्यांचे सहकारी लंच नंतरच्या गप्पा मारत बसले होते. त्यातला एक जण म्हणाला ‘ मॅडम अहो लंच सुरू आहे. ‘ ‘ हो हो .. मला काही घाई नाही. मी बसते इथे. ‘ मी हसत म्हणाले. पेंटिंगच्या समोरच्या बेंचवर बसले. फोन बॅगेत ठेवला. पेंटिंगमधल्या निळ्या रंगाच्या छटांमाध्ये , उभ्या,वळणदार स्ट्रोकस मध्ये काहीतरी शोधत बसले. @पेंटिंग मधले रंग एका संथ प्रवासात असल्यासारखं वाटलं. कसलीही घाई नाही. काहीतरी विशेष दाखवायचा हट्ट नाही. चलबिचल नाही. फार फार शांत वाटलं.
तेवढ्यात , ‘ हं मॅडम या .. इथे सही करा .. मग आपलं काम पूर्ण झालं. ‘ मॅडम नी मारलेल्या हाकेमुळे तंद्रितून जागी झाले. ‘ तुमचं कौतुक हं.. नंतर येऊन म्हणून लगेच आजच आलात तुम्ही. बरं झालं काम पूर्ण झालं. आमचंही एक काम हातावेगळं होतं हो .. छान केलंत आलात ते. ‘ बघायचा दृष्टिकोन जरासा बदलला की समोरच्या व्यक्तीमधला प्रसन्नपणाही आपोआप जाणवायला लागतो. ‘ माझंच काम होतं हो.. ‘ मी आपलं थोडं ओशाळत म्हटलं. ‘ अहो असं कसं .. आमचं ही कामाचं आहे की ..” मॅडम हसत म्हणाल्या.
‘ एक विचारू का.. बँकेत हे पेंटिंग ?? ‘ मी त्यांना विचारलं.
‘ हाहाहा .. त्याची एक गंमतच आहे.. आमच्या काळे साहेबांची आयडिया आहे.. नुसतं काम आणि काहीच मजेदार न करून आपल्यातला जॅकला मरगळ येते त्यामुळे दर आठवड्याला प्रत्येकाने या बोर्डवर आपल्या आवडीचं, छंदापैकी काहीतरी तिथे लावायचं असा आमचा जुलै मधला प्रोजेक्ट आहे. अहो काळे सरांनीही त्यांनी काढलेल्या फोटोचे प्रिंटआउट्स लावले होते. ‘ मॅडम नी माहिती दिली.
‘ अरे वा.. ही किती अभिनव कल्पना आहे! हे पेंटिंग कोणी केलंय ? ‘ मी अगदी उत्साहात विचारलं.
‘ अहो मीच केलंय.. खूप वर्षांनी असं काहीतरी करायचा प्रयत्न केलाय. फार मजा आली मला. ‘ बाई एकदम आनंदात म्हणाल्या.
‘ मलाही फार मस्त वाटलं चित्र बघून.. मॅडम हे घ्या @तुमच्यासाठी.. ‘ म्हणत मी हातातली फुलं त्यांना दिली. मॅडम एकदम मौजेने हसल्या. ‘ अहो बँक एम्प्लॉइ ला कस्टमर चक्क फुलं देतोय .. पेपरात बातमी येईल उद्या.. ‘ ‘ हाहाहाहा .. येणारच असेल तर आपण सेल्फी पण देऊ की.. ' मी हसत हसत म्हणाले.
अगदी रिफ्रेश होऊन घरी आले. नव्या रंगांना सुरुवात करायची होती. आईबरोबर मिताकडे जायचं होतं. अबीर.. सुगंधा.. पेपरवाले राजुदादा सगळी उजळणी एकदा केली. बऱ्याच ' नंतर ‘ ना डच्चू द्यायचं ठरवून आत्ता सुरुवात केली.