१९६०च्या दशकात अमेरिकेच्या नासाने चंद्रावर उतरण्यासाठी अपोलो मोहिम आखली. त्यात प्रचंड प्रमाणात तांत्रिक माहिती आणि विविध प्रक्रिया यांचा समावेश होता. या सर्व गोष्टी आत्मसात करणे आणि त्यांचा वापर करून त्वरित बिनचूक निर्णय घेणे, हे कोणत्याही एका व्यक्तीसाठी अशक्य होते.
ही समस्या सोडवण्यासाठी या प्रकल्पाच्या रचनाकारांनी एक अभिनव संकल्पना मांडली: 'मिशन रूल्स' (Mission Rules मोहिमेचे नियम).
थोडक्यात सांगायचे तर, 'मिशन रूल्स' म्हणजे विशिष्ट परिस्थितीत काय करावे याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे. उदाहरणार्थ, रॉकेटची ५ पैकी २ इंजिने अचानक बंद पडली तर काय करावे? किंवा अंतराळयानाने 'X' ही कृती करणे अपेक्षित असताना ते 'Y' ही कृती करत असेल, तर काय करावे? इत्यादी .
हे मिशन रुल्स बनवणे ही फार प्रदीर्घ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया होती, आणि त्यात अपोलो प्रकल्पातील सर्व घटकांनी —जसे की फ्लाईट कंट्रोल टीम, सिम्युलेशन टीम, अंतराळवीर, आणि सिस्टम इंजिनिअर्स—या नियमांच्या निर्मितीमध्ये सहभाग घेतला होता.
हे सर्व नियम एकत्रित करून त्यांच्या भल्या मोठ्या फाईल्स बनवल्या गेल्या . 'मिशन कंट्रोल टीम' वारंवार या नियमांची पडताळणी करून पाहत असे आणि ते अद्ययावत करत असे. अंतराळयानातही एक प्रत नेहमी सोबत ठेवली जात असे.
या नियमांच्या चौकटीने अनेक मोहिमांना मोठ्या संकटातून वाचवले आहे.
अपोलो ११ मोहिमेमध्ये नील आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रिन चंद्रावर उतरत असताना, कॉम्प्युटरने अनपेक्षितपणे अलार्म वाजवले. परंतु गायडन्स ऑफिसर स्टीव्ह बेल्स यांनी मिशन रूल्सनुसार त्यांना पुढे जाण्याची अनुमती दिली आणि अंतराळयान सुरक्षितरित्या चंद्रावर उतरले .
अपोलो १३ मोहिमेत अंतराळयान चंद्राच्या मार्गावर असताना त्यातील ऑक्सिजनची टाकी फुटली. तेव्हा चंद्रावर उतरणे तर सोडाच , तिन्ही अंतराळवीरांचे जीव धोक्यात आले होते. त्यावेळीही मिशन रुल्सचा तातडीने वापर करून नासाने यान सुखरूप पृथ्वीवर परत आणले.
आजही ही मिशन रुल्सची कार्यपद्धती आधुनिक अंतराळ मोहिमांचा आधारस्तंभ आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि हल्लीच पार पाडलेल्या आर्टेमिस चंद्र मोहिमांसाठी नासा या नियमांच्या अत्यंत पुढारलेल्या आवृत्त्या वापरत आहे.
मला वाटते की आपली विचारप्रक्रिया सुनियंत्रित करण्यासाठी 'मिशन रूल्स'ची संकल्पना खूप उपयुक्त ठरू शकते. यात फार वेगळे काही करायचे नाहीये. आपल्याला स्वतःलाच 'जर असे झाले तर काय करायचे?' (what-if) आणि 'हे कसे करायचे?' (how-to) असे प्रश्न विचारण्यास आणि किमान त्यांची उत्तरे शोधण्याची सवय लावून घ्यायची. दुसरे म्हणजे कोणत्याही गोष्टीचा पुरेसा विचार न करता गडबडीने प्रतिक्रिया (knee-jerk reaction) देणे टाळण्याचा प्रयत्न करायचा.
गंमत म्हणजे, आपण सर्वजण अजाणतेपणे आपल्या आयुष्यात एका 'मिशन रूल बुक'चा (नियम-पुस्तिकेचा) वापर करतच असतो. जन्माच्या वेळी आपले मन (जवळपास) कोऱ्या पाटीसारखे असते. जसजसे आपण मोठे होतो, तसतसे आपण आपले पालक, कुटुंबीय, मित्र, शिक्षक, पुस्तके, इतर माध्यमे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःचे अनुभव यांतून शिकत जातो. या सर्व गोष्टी आपल्या अंतर्मनात (subconscious level वर ) एकत्र येतात आणि कोणत्याही परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद द्यावा, हे ठरवतात. आपल्याला जे निर्णय क्षणार्धात घेतलेले वाटतात ते खरं तर यावरच बेतलेले असतात.
आयुष्यातील कसोटीचे प्रसंग टाळणे आपल्या हातात नाही, पण (बहुतेक) सर्व प्रतिकूल परिस्थितींसाठी आपण काहीतरी पूर्वतयारी करून ठेवली आहे, या जाणिवेमुळे आपला मानसिक ताण बराच कमी होईल हे नक्की.