कधी कधी वास्तव हे परिकल्पनेपेक्षा सुंदर असते आणि कधी कधी परिकल्पनाही वास्तवापेक्षा सुंदर असते या दोन्हींच्या मध्ये जुळणाऱ्या हिंदोळ्यावर माणूस आपले जीवन व्यतीत करीत असतो अगदी असेच स्वर्गीय कधी कधी आनंददायी कधी कधी अति आनंददायी आणि कधी कधी निराश करणारे असे सगळे प्रसंग एका बीएलओच्या जीवनात घडतात बीएलओ म्हणजे ब्लॉक लेवल ऑफिसर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अत्यंत सन्मान जनक शब्दात लिहिलेली ही व्याख्या किंवा हे नाव आपल्या देशातल्या कुठल्याही शेवटच्या स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्या च्या सोबत होणाऱ्या सुखद आणि दुःखद घटनांप्रमाणेच आनंददायी आहे.
निवडणुकी संदर्भात कामे आल्यावर सर्वात प्रथम जो घटक कार्यशील करवल्या जातो तो म्हणजे शिक्षक
शिक्षकाचे काम विद्यार्थ्यांना विद्यादान देण्याचे,
शिक्षक हा देशाचा पाया आहे तो समाजाला घडवितो आणि संपूर्ण पिढीचे भविष्य त्याच्या हातात आहे अशा बहुतांश स्वर्ग सुंदर गोष्टी आपण नेहमीच ऐकत असतो त्या खऱ्या ही आहेत आपल्या संस्कृतीत शिक्षकाला गुरुचे स्थान दिले आहे गुरु अर्थात जो आपल्याला अंधाराकडून उजेडा करण्यात येतो असा तो बदलत्या समाज रचनेनुसार आज याच शिक्षकाचे अथवा गुरुचे शिक्षकाच्या संदर्भात जे स्थान आहे ते खरेच तसे आहे का की बऱ्याच अंशी ते फक्त कागदपत्रे असून बाकी पूर्ण डळमळीत झाले आहे यावर विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
निवडणुकीची कामे आली की हमखास शिक्षक मंडळी आठवतात समाजाच्या डोळ्यात जुन्याकाळी असणारा शिक्षकांप्रतीचा आधार आणि आज समाजामध्ये एकंदरच व्यवस्थित शिक्षकाची झालेली पीछेहाट परवड किंवा उत्कर्ष हा सगळा चरबी चर्वन करण्याचा आनंदाचा विषय असतो.
तसेही एकंदर जागतिक स्तरावरच आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून ही एक प्रथाच होऊ घातलेली आहे
माणसे स्व जीवनात होणाऱ्या घटनांकडे उघडपणे बघण्याचे सोडून त्याकडे पुरेपूर दुर्लक्ष करून दुसऱ्यांच्या बाबतीत जे काही घडते आहे त्यात आपला स्वर्गीय आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात आणि हाच आनंद बीएलओच्या बाबतीतही काहीसा दिसून पडतो बीएलओ हा प्राणी निवडणूक दिवसांपेक्षा वेगळा प्रत्यक्ष निवडणूक होते त्या दिवशी सर्व प्रकारची यंत्रणा या कामात असते परंतु मतदार याद्या बनवण्यापासून तर मतदारांचे नाव समाविष्ट करणे व गळणे मृत झालेल्या लोकांची माहिती गोळा करणे लग्न झालेल्यांची माहिती गोळा करणे कुटुंब जर स्थलांतरित झाले असेल ती माहिती गोळा करणे या सर्व बाबी एका बीएलओला करायच्या असतात आणि याहूनही कितीतरी अन्य कामे या संदर्भात असतात.
आजकाल अगदी परिचित आणि परभणीचा झालेला असा शब्द म्हणजे तात्काळ वेगवेगळ्या आदेशांवर अति तात्काळ असे नमूद केले जाते व ते काम प्रमुख्याने करावे करावयाचे आहे याचा अनुभव एकंदरस पूर्ण व्यवस्था घेत असते व त्या व्यवस्थेचा आपल्याला जर उत्कृष्ट नमुना बघायचा असेल तर आपण एकदा निशाणी डावा अंगठा हा चित्रपट बघायला हवा यामध्ये एकंदरच व्यवस्थेचा जो काही सावळा गोंधळ काही ठिकाणी आढळतो तो दाखवला गेला आहे.
बीएलओ हा प्राणी शिक्षक असतो बहुतांशी किंवा आजकाल अंगणवाडी सेविका आणि गरज पडल्यास एखाद दुसऱ्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना यामध्ये समाविष्ट केल्या जाते अन्यथा जास्तीत जास्त शिक्षकच या कार्यासाठी नेमले जातात. जिच्या हाती दोरी ती जगाउद्धारी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जागा उद्धारी असे म्हटले जाते अगदी त्याचप्रमाणे जुन्या काळी छडी लागे छम छम विद्या इगम अशी काहीशी म्हण होती आणि शिक्षकाचे काही ठिकाणी अतिशय वाईट वर्णन करताना आपल्या इकडे बडबडगीतांमधून का होईना पण त्यावर त्यांवर टीका केली गेली जसे की मोठ्या मोठ्या मिशा डोळे लाल लाल दंडोजी चा पत्ता नाही खप्पड दोन्ही गाल वर्गांमध्ये मुलांना हा वाटे दुसरा यम छम छम छम अशा प्रकारच्या बडबडगीतांमधून का होईना अप्रत्यक्षपणे शिक्षकाला ओ मंगळवार रूपात साजरे केले गेले.
हे योग्य की अयोग्य तो नंतरचा भाग तूर्तास बीएलओच्या विषयावर परतुयालो ज्याचेही सर्व काम तो शिक्षक असल्यामुळे शिक्षकाची जबाबदारी त्याला पार पाडायची असते शिक्षक असताना त्याला नेमून दिलेले शाळेचे काम आणि अगदी सहजपणे आजच्या 50 ते समोरच्या पिढीला विचारल्यास ती सांगेल की त्यांच्या काळी शिक्षकांचा धबधबा आणि सर्व गोष्टी आणि स्वतः शिक्षकांचा ते किती आदर सत्कार करायचे आजही करतात याची कितीतरी उत्कृष्ट उदाहरणे सापडतील पण त्या नंतरची अर्थात 50 पूर्वीची अगदी काल-परवा लग्न होऊ घातलेली पिढी या सर्वांमध्ये शिक्षकांप्रती सन्मान तर आहेच पण एकंदरच भांडवलशाही व्यवस्थेमध्ये पैशाचे महत्त्व वाढून माणसाचे कमी होते आहे त्याला शिक्षकी पेशाही अपवाद नाही बीएलओला एकाच वेळेस कितीतरी कामगिरी पार पाडावे लागतात त्यात एक काम होईल म्हणजे शाळेत शिकवणे देखील आणि निवडणुकीची कामे करणे देखील यामध्ये काम करताना कितीतरी वेळा असे प्रसंग येतात की शाळेचे काम करावे की इलेक्शनचे काम करावे आणि व्यवस्थेमध्ये प्रत्येक माणूस आपापल्या ठिकाणी कदाचित बरोबर असेलही पण मधात जो पिसला जातो ज्याला वारंवार वेगवेगळ्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते तो म्हणजे मुलांचा कोर्स पूर्ण करणे आणि त्यांना वर्गात शिकवणे हे काम बीएलओचे असतेच आणि बाकी कोणत्याही मशीन कामकाजाप्रमाणे ते दुसरे कोणी करू शकत नाही वर्गातल्या मुलांना शिकवणे हे ज्याचे त्याच शिक्षकाचे काम असते. दुसरे तो करू शकत नाही शिक्षकाच्या त्या वर्गाचा पूर्वी उर्वरित कोर्स त्यालाच पूर्ण करायचा असतो आणि सर्व शाळेची बंधने यात असतात आणि हे सगळे असल्यावर देखील एकंदरच आजकालच्या समाज व्यवस्थेत जो वरवरची विचारसरणी आली त्यानुसार लोकांना शिक्षकाचे काम हे अत्यंत साधे सोपे वाटते येथे सांगावेसे वाटते की ते त्यांनाच कळेल ज्यांना जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे असा अशी म्हण परिस्थिती आहे
खरं म्हणजे खरं म्हणजे आजच्या परिस्थितीत बीएलओला एकाच वेळी दोन दोन तीन तीन आघाड्या सांभाळव्या लागतात जेव्हा पासन कम्प्युटर्स आलीत तेव्हापासून जरूर माणसाची कामे कमी झाली पण कम्प्युटर्स आणि व्हाट्सअप सारख्या ग्रुप्सनी माणसांना एक प्रकारे 24 तासाचा कर्मचारी ठरवले आहे बऱ्याच अंशी या गोष्टी चांगल्या आहेत पण अशी कामे जेव्हा एक पेक्षा जास्त होऊ लागतात तेव्हा तेव्हा पूर्ण कामांना योग्य न्याय देता येईल हे थोडे कठीणच वाटते.
व्यक्ती तितक्या प्रकृती असतात अगदी त्याचप्रमाणे आज कुणालाही एकमेकांवर विश्वास ठेवण्याची इच्छा चोरली नाही असं विमाने त्यामुळे बीएलओ काय की जनगणना वाले काय की अजून कोणी जेव्हा कोणी सरकारी कर्मचारी आपल्या घरी माहिती घ्यायला येतात तर जुन्या खेड्यापाड्यात आजही लोक ते सांगायला आणि काही भागात तत्पर असतात पण बहुतांश माणसे सर्वप्रथम अविश्वास दाखवून पहिले पंधरा मिनिट फक्त झाडाझळती घेतात आणि त्यानंतर मग कुठेतरी माहिती सांगाल तयार होतात आणि सरकारी नियमानुसार एक काम चार दिवसांच्या आत पूर्ण करायचे असते 121500 माणसांची माहिती चार दिवसात गोळा करून सादर करणे म्हणजे ब्रह्मदेवाला खाली बोलवण्यासारखे आहे कदाचित किंबहुना हे काम एवढ्या गतीने ते सुद्धा करू शकणार नाहीत मग याचे काय करावे या बीएलओच्या कामाचे जर मनात आणले तर पाणी यंत्रणेने योजिले तर उत्तर उपलब्ध आहेत परंतु कोणतेही काम करताना कोणत्याही प्रकारची यंत्रणा राबवताना सर्व एकसमान सर्वांना समान न्याय ही प्रणाली असायला हवी मग तो मंत्र्याचा मुलगा असो साहेबाचा असो की गरीबाचा असो न्याय सगळ्यांसाठी समान असायला हवा याच अर्थाने बीएलओचे काम देताना देखील ती फक्त स्त्री आहे किंवा तो फक्त पुरुष आहे तो माझ्या जवळचा आहे हा माझ्या दूरच आहे असा विचार करून नेमणूक जर दिली तर होणारे बीएलओच काय कोणतेही काम व्यवस्थित वर वेळेवर होईल आणि माणसे ते पूर्ण प्रामाणिकपणे करतील याबाबत शाश्वती देता येत नाही.
त्यामुळे मला स्पष्टपणे वाटतं की बीएलओ हा जो प्राणी आपल्या समाजात वावरतो ज्याची सध्या एसआर च्या माध्यमातून घरोघरी जाणे अन्यथा एका विशिष्ट ठिकाणी बसून सर्वांना बोलून फॉर्म भरणे सुरू आहे त्याला आपण सर्वांनीच एक समाज म्हणून मान्यता द्यायला हवी व मदत करायला हवी किंबहुना खूप वेळा व्यवस्था कितीतरी गोष्टींची गरज नसताना त्याची जाहिरात करते व जनगणना आणि बीएलओ सारख्या कामाच्या विशेषता बीएलएस च्या कामाची प्रसिद्धी ती पेपरमधून किंवा अन्य माध्यमातून नाहीच्या बरोबर होत असते आणि म्हणून मग लोक विश्वास ठेवायला तयार होत नाहीत हे सगळे जरी असले तरी काही ठिकाणी अतिशय सुंदर अनुभव येतात लोक अगदी व्यवस्थितपणे सगळी माहिती सांगतात की मौना चहा कॉफी सुद्धा विचारतात पण अशी उदाहरणे बोटावर मोजण्याला एक तेव्हा आपल्या सगळ्यांना एकच विनंती की बीएलओ आपल्या घरी आला तर त्याला सन्मान द्या निदान पाण्यासाठी विचारा आणि त्याला आवश्यक ती माहिती द्या त्यापासून काय त्याचे म्हणणे आहे ते ऐकून घ्या व त्यानंतर आपली आवश्यक ती माहिती देऊन सरकारी कामात मदत करा जेणेकरून जो आपण राष्ट्रवाद म्हणतोय तो खऱ्या अर्थाने राष्ट्र म्हणून आपण उदयास येऊ वर सरकारी कामांना पूर्णपणे व्यवस्थित करुयाव देशाची प्रगती करूया
कधी कधी वास्तव हे परिकल्पनेपेक्षा सुंदर असते, तर कधी परिकल्पनाही वास्तवापेक्षा सुंदर असते. या दोन्हींच्या मध्ये जुळणाऱ्या हिंदोळ्यावर माणूस आपले जीवन व्यतीत करीत असतो. अगदी असेच कधी आनंददायी, कधी अतिआनंददायी, तर कधी निराश करणारे सगळे प्रसंग एका बी.एल.ओ.च्या म्हणजेच 'ब्लॉक लेव्हल ऑफिसर' (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) या घटकाच्या जीवनात घडत असतात. अत्यंत सन्मानजनक शब्दात लिहिलेली ही व्याख्या किंवा हे नाव, आपल्या देशातल्या कुठल्याही शेवटच्या स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या आयुष्यातील सुखद आणि दुःखद घटनांप्रमाणेच संमिश्र आहे. निवडणुकीसंदर्भात कामे आली की सर्वात प्रथम जो घटक कार्यशील केला जातो, तो म्हणजे शिक्षक. शिक्षकाचे मूळ काम विद्यार्थ्यांना विद्यादान करण्याचे असते. “शिक्षक हा देशाचा पाया आहे, तो समाजाला घडवितो आणि संपूर्ण पिढीचे भविष्य त्याच्या हातात आहे,” अशा बहुतांश स्वर्गसुंदर गोष्टी आपण नेहमीच ऐकत असतो आणि त्या खऱ्याही आहेत. आपल्या संस्कृतीत शिक्षकाला गुरूचे स्थान दिले आहे; गुरू अर्थात जो आपल्याला अंधाराकडून उजेडाकडे नेतो. परंतु, बदलत्या समाजरचनेनुसार आज याच शिक्षकाचे किंवा गुरूचे स्थान खरेच तसे राहिले आहे का, की बऱ्याच अंशी ते फक्त कागदपत्रांपुरते उरून बाकी पूर्ण डळमळीत झाले आहे, यावर आता विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. निवडणुकीची कामे आली की हमखास शिक्षक मंडळी आठवतात आणि आज समाजामध्ये एकंदरच व्यवस्थेमुळे शिक्षकाची झालेली पीछेहाट, परवड किंवा उत्कर्ष हा सगळा केवळ 'चर्वीचर्वण' करण्याचा विषय बनला आहे.
तसेही एकंदर जागतिक स्तरावरच 'आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून' ही एक प्रथाच होऊ घातली आहे. माणसे स्वतःच्या जीवनातील घटनांकेडे उघडपणे बघण्याचे सोडून, त्याकडे पुरेपूर दुर्लक्ष करतात; पण दुसऱ्यांच्या बाबतीत जे काही घडते, त्यात आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात. हाच अनुभव बी.एल.ओ.च्या बाबतीतही येतो. बी.एल.ओ. हा घटक निवडणुकीच्या प्रत्यक्ष दिवसापेक्षा इतर वेळी अधिक राबत असतो. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सर्व प्रकारची यंत्रणा कामात असते, परंतु मतदार याद्या बनवण्यापासून ते मतदारांचे नाव समाविष्ट करणे व वगळणे, मृत झालेल्या लोकांची माहिती गोळा करणे, नवविवाहितांची माहिती मिळवणे, कुटुंब स्थलांतरित झाले असल्यास त्याची नोंद ठेवणे, या सर्व बाबी एका बी.एल.ओ.लाच कराव्या लागतात. आजकाल अगदी परिचयाचा झालेला शब्द म्हणजे 'तात्काळ'. वेगवेगळ्या आदेशांवर 'अति तात्काळ' असे नमूद केले जाते व ते काम प्रामुख्याने करावे लागते, याचा अनुभव एकंदर पूर्ण व्यवस्था घेत असते. या व्यवस्थेचा जर उत्कृष्ट नमुना बघायचा असेल, तर आपण एकदा 'निशाणी डावा अंगठा' हा चित्रपट बघायला हवा, ज्यामध्ये व्यवस्थेचा जो काही सावळा गोंधळ आढळतो, तो अतिशय मार्मिकपणे दाखवला गेला आहे.
बी.एल.ओ. म्हणून काम करणारी व्यक्ती बहुतांशी शिक्षक असते; किंवा आजकाल अंगणवाडी सेविका आणि गरज पडल्यास नगरपालिका कर्मचाऱ्यांना यामध्ये समाविष्ट केले जाते. “जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाउद्धारी” असे म्हटले जाते, अगदी त्याचप्रमाणे जुन्या काळी “छडी लागे छमछम, विद्या येई घमघम” अशी काहीशी म्हण होती. परंतु, शिक्षकांचे काही ठिकाणी अतिशय वाईट वर्णन करताना आपल्याकडे बडबडगीतांमधून अप्रत्यक्षपणे टीकाही केली गेली, जसे की 'मोठ्या मोठ्या मिशा, डोळे लाल लाल, दंडोजीचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल… वर्गामध्ये मुलांना हा वाटे दुसरा यम.' अशा प्रकारच्या गाण्यांमधून शिक्षकाला काहीशा उग्र रूपात दाखवले गेले. हे योग्य की अयोग्य हा नंतरचा भाग, पण बी.एल.ओ.चे काम करणाऱ्या व्यक्तीला शिक्षक म्हणूनही आपली जबाबदारी पार पाडावी लागते. आजच्या ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पिढीला विचारल्यास ती सांगेल की, त्यांच्या काळी शिक्षकांचा धबधबा कसा होता आणि ते शिक्षकांचा किती आदर-सत्कार करायचे. पण त्यानंतरची पिढी आणि आजची तरुण पिढी, या सर्वांमध्ये शिक्षकांप्रती सन्मान तर आहेच; पण एकंदरच भांडवलशाही व्यवस्थेमध्ये पैशाचे महत्त्व वाढून माणसाचे महत्त्व कमी होत चालले आहे, त्याला शिक्षकी पेशाही अपवाद राहिलेला नाही.
बी.एल.ओ.ला एकाच वेळेस कितीतरी कामगिरी पार पाडाव्या लागतात, त्यात महत्त्वाचे काम म्हणजे शाळेत शिकवणे आणि सोबतच निवडणुकीची कामे करणे. यामध्ये काम करताना कितीतरी वेळा असे प्रसंग येतात की नक्की शाळेचे काम करावे की इलेक्शनचे? व्यवस्थेतील प्रत्येक माणूस आपापल्या ठिकाणी कदाचित बरोबर असेलही, पण यामध्ये जो पिसला जातो, तो म्हणजे वर्गात शिकणारा विद्यार्थी. मुलांचा कोर्स पूर्ण करणे आणि त्यांना वर्गात शिकवणे हे काम बी.एल.ओ.चे मुख्य कर्तव्य असतेच; वर्गातल्या मुलांना शिकवणे हे ज्याचे त्याचे काम असते, दुसरे कोणी ते करू शकत नाही. परंतु, उर्वरित कोर्स पूर्ण करण्याचे दडपण आणि शाळेचे नियम या सर्व गोष्टी सांभाळाव्या लागतात. हे सगळे असूनही आजकालच्या समाजात लोकांची विचारसरणी अशी झाली आहे की, त्यांना शिक्षकाचे काम अत्यंत साधे-सोपे वाटते, मात्र येथे एवढेच सांगावेसे वाटते की—”जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे.” खरं तर आजच्या परिस्थितीत बी.एल.ओ.ला एकाच वेळी दोन-दोन, तीन-तीन आघाड्या सांभाळाव्या लागतात. जेव्हापासून कॉम्प्युटर्स आले, तेव्हापासून माणसाची कामे सोपी झाली असतीलही, पण कॉम्प्युटर्स आणि व्हाट्सॲपसारख्या ग्रुप्सनी माणसाला एक प्रकारे '२४ तासांचा कर्मचारी' बनवून ठेवले आहे. बऱ्याच अंशी या गोष्टी चांगल्या आहेत, पण अशी कामे जेव्हा एकापेक्षा जास्त वाढू लागतात, तेव्हा सर्वच कामांना योग्य न्याय देणे थोडे कठीण होऊन बसते.
व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, आज समाजात कोणाचाही एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे बी.एल.ओ. काय किंवा जनगणनेचे कर्मचारी काय, जेव्हा कोणी सरकारी कर्मचारी माहिती घ्यायला लोकांच्या घरी जातात, तेव्हा खेड्यापाड्यात आजही लोग माहिती द्यायला तत्पर असतात; पण शहरी भागात बहुतांश माणसे सर्वप्रथम अविश्वास दाखवतात. पहिले पंधरा मिनिटे फक्त उलटतपासणी म्हणजेच झाडाझळती घेतात आणि त्यानंतर कुठे माहिती द्यायला तयार होतात. सरकारी नियमानुसार एखादे काम चार दिवसांच्या आत पूर्ण करायचे असते; १२-१५०० लोकांची माहिती चार दिवसांत गोळा करून सादर करणे म्हणजे ब्रह्मदेवाला खाली बोलावण्यासारखे आहे, कदाचित हा वेग त्यांच्याकडूनही शक्य होणार नाही. यंत्रणेने मनात आणले तर यावर नक्कीच पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, कोणतीही यंत्रणा राबवताना 'सर्वांसाठी समान न्याय' ही प्रणाली असायला हवी, मग तो मंत्र्याचा मुलगा असो, साहेबाचा असो की गरीबाचा. बी.एल.ओ.चे काम देताना देखील ती स्त्री आहे की पुरुष, तो माझ्या जवळचा आहे की दूरचा, असा वशिला न लावता जर योग्य नेमणूक दिली, तर कामे वेळेवर आणि प्रामाणिकपणे होतील.
त्यामुळे मला स्पष्टपणे वाटते की, बी.एल.ओ. हा जो घटक आपल्या समाजात वावरतो आहे—ज्याचे सध्या घरोघरी जाणे किंवा एका विशिष्ट ठिकाणी बसून फॉर्म भरून घेणे सुरू आहे—त्याला आपण सर्वांनीच एक समाज म्हणून सहकार्य करायला हवे. खूप वेळा व्यवस्था नसलेल्या गोष्टींची जाहिरात करते; परंतु जनगणना किंवा बी.एल.ओ. सारख्या महत्त्वाच्या कामांची प्रसिद्धी वर्तमानपत्रातून किंवा इतर माध्यमातून हवी तशी होत नाही, म्हणूनच लोक सहसा विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. हे सगळे जरी असले तरी काही ठिकाणी अतिशय सुंदर अनुभव येतात, लोक अगदी व्यवस्थितपणे सगळी माहिती सांगतात, इतकेच नव्हे तर चहा-कॉफी सुद्धा विचारतात; पण अशी उदाहरणे बोटावर मोजण्याइतकीच आहेत. शेवटी आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे—जेव्हा एखादा बी.एल.ओ. आपल्या घरी येईल, तेव्हा त्याला सन्मान द्या, निदान पाण्यासाठी विचारा आणि त्याला आवश्यक ती अचूक माहिती द्या. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या व सरकारी कामात मदत करा. आपण ज्या राष्ट्रवादाच्या गोष्टी करतो, तो खऱ्या अर्थाने कृतीत आणून देशाची प्रगती करूया!
प्रशांत चित्रा जानराव बठ्ठे
#सूरपाखरु #30 दिवसात30#जुलै 2026
दिनांक 2 जुलै 2026