Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

शुभेच्छा द्याव्या की न द्याव्या हा एकच सवाल आहे.

अभिषेक किन्हेकर जुलै 6, 2026 1 minute read
0
gumohor-water
सगळ्यांचीच नेहेमीच तक्रार असते की मी एका ठरावीक पद्धतीचे, साचेबंद आणि त्याच त्या पद्धतीचे शुभेच्छा संदेश पोस्ट करतो. (उदा. “अभिनंदन अभिष्टचिंतन आणि शुभेच्छा” मग प्रसंग कुठलाही असो).

आज आपल्या अक्षय सराफ सरांचा जन्मदिन. म्हणून आज वि. वा. शिरवाडकर आणि विल्यम शेक्सपिअर यांची क्षमा मागून त्यांच्याच “नटसम्राट” नाटकातील एक प्रसिद्ध स्वगतात बदल करून शुभेच्छा देतोय.

To be or not to be that is the Question…..  शुभेच्छा द्याव्या की न द्याव्या हा एकच सवाल आहे. ह्या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीच्या तुकड्यासारख्या त्याच त्याच जुन्यापद्धतीने द्याव्या शुभेच्छा बेशरम लाचार आनंदानं? का दणदणून द्याव्या शुभेच्छा बॅनर लावून भल्यामोठ्या चौकामध्ये? आणि करावा धिंगाणा सर्व मित्रांना सोबत घेउन एकत्र, एकाच तडाख्यात? माझ्या, तुझ्या, ह्याच्या अन त्याच्याही….

पार्टीच्या महासर्पाने रोजच्या रुटीन ला अस्सा डंख मारावा…. की नंतर येणार्या समाधानाला नसावा वर्कलोडचा किनारा देखील कधीही….. पण मग….. त्या वर्कलोडला ही पुन्हा रीक्रिएशन ची स्वप्न पडू लागली तर?…. तर….. इथेच तर खरी मेख आहे…….

नव्या प्रकारच्या शुभेच्छांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतोय ते जुने घासलेले, गंजलेले शुभेच्छा संदेश… सहन करतोय प्रेताच्या निर्जीवपणे, धेडगुजरी भाषेमुळे मातृभाषेवर होणारे बलात्कार….. अस्तित्वाच्या गाभार्यात असणार्या सत्वाची विटंबना…. आणि अखेर…. घासून गुळगुळीत झालेल्या संदेशांचा कटोरा घेऊन उभे राहातो बेसावधपणे आम्हालाच पार्टी देणार्यांच्या दाराशी….

अक्षया, तु इतका भावशून्य कसा काय झालास? एका बाजूला ज्याना आम्ही नवीन पद्धतीने शुभेच्छा संदेश दिले ते आम्हाला विसरतात, आणि दुसर्या बाजूला ज्यांच्या कडून आम्हाला नवीन प्रकारच्या शुभेच्छा पद्धतीची अपेक्षा आहे असा तूही आम्हाला विसरतोस? अरे… मग हे विस्कटलेल्या प्लॅन चे विसर्जन करून पुन्हा नवीन उमेदीने नवा प्लॅन घेऊन, हे बाळासाहेब, सराफ कुलोत्पन्ना………… आम्हा शुभेच्छुकांनी कुणाचा गेम घ्यायचा रे? कुणाचा?? कुणाचा???

लेखक

  • अभिषेक किन्हेकर

Post navigation

Previous: आनंद कि सुख ? भाग ३
Next: श्रीमदभागवत चिंतन – ७ चतुःश्लोकी भागवत
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.