Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

आनंद कि सुख ? भाग ३

अभिषेक किन्हेकर जुलै 6, 2026 1 minute read
0
gumohor-water

मागच्या लेखांत आपण फिरून या निष्कर्षाप्रत आलेलो होतो की आनंद मिळवायला आपल्याला जागृतावस्थेत शरीर निश्चल, मन शांत आणि बुद्धी स्थिर करावी लागेल. कसं करावं ? 

सोपा उपाय….. ध्यान 

कसं जमायचं ? तर त्याकरता सोपी स्टेप बाय स्टेप प्रोसेस …. 

१. यम 

२. नियम 

३. आसन 

४. प्राणायाम 

५. प्रत्याहार 

६. धारणा 

७. ध्यान 

८. समाधी 

एक एक करून बघू…. अर्थात उदाहरणासकट ….

१. यम :- यम म्हणजे पाळायची असलेली नैतिक आणि सामाजिक मार्गदर्शक तत्त्वे. म्हणजे सोप्या भाषेत प्रोटोकॉल्स …… काय असावं ह्याचे शिष्टाचार…. संपूर्ण थेअरी … आवर्जून पाळावी अशी पण… पूर्णपणे पाळायला अवघड…. ह्यात ५ प्रोटोकॉल्स आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. 

अहिंसा : कोणत्याही प्रकारची शारीरिक, मानसिक किंवा भावनिक हिंसा न करणे. ह्यात दुसऱ्यांची मते ना मानणे, आपणच नेहेमी बरोबर असणे हा अट्टाहास पण येतो बरं.

सत्य : स्वतःशी व इतरांशी खरे राहणे. (अत्यंत कर्मकठीण…. वयाच्या ८ व्या वर्षा पर्यंत सहज करत असतो आपण….. नंतर कसा काय सुटते सवय कल्पना नाही बुवा ….)

अस्तेय : शब्दशः अर्थ तर चोरी न करणे. चोरी म्हणजे न विचारता इतरांची वस्तू हिरावून घेणे. मग ते लौकिक असो व मानसिक. म्हणजे मी जाण्याने कुणी हसण्याचं थांबवत असेल तर ती त्याच्या आनंदाची चोरीच झाली नाही का? 

ब्रह्मचर्य : आत्मसंयम राखणे. व्यसनांवर मात करून धैर्य व इच्छाशक्तीने निरोगी, शहाणे जीवन जगणे. 

अपरिग्रह : लोभ सोडणे. सगळ्यांचाच….. गरजेपेक्षा अधिक वस्तूंचा त्याग करून (यात गरजेपेक्षा अधिक राग, प्रेम, इ. सगळेच आले.) साधे, समाधानकारक जीवन जगणे.

२. नियम :- हा साधनांचा एक शक्तीशाली संच आहे, म्हणजे “यमाची थेअरी ला असलेले प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन्स”  नियमाच्या पाच शाखा आहेत- शौच, संतोष, तापस, स्वाध्याय आणि इश्वरप्रणिधान

शौच : म्हणजे शुद्धीकरण. अशुद्धी शोधणे व समूळ नायनाट करणे म्हणजे शौच. घराची सफाई, जेवणात स्वच्छता, मनोरंजनात स्वच्छता, विचारांत स्वच्छता म्हणजे शौच. कसं करायचं? सोप्पंय…. काय जनमान्य, समाजमान्य अस्वच्छ आहे ते जाणीवपूर्वक दार ठेवायचं'…..

संतोष : संतोष यामध्ये समाधान, आत्मविश्वास भावना दाखवली जाते. समाधानी राहता आले तर आपली हाव कमी होते. हा नियम आपल्यात कृतज्ञतेची भावना निर्माण करतो.

तापस : तापस हा स्वयंशिस्तीचा आणि हिंमतीचा सराव आहे. जाणीवपूर्वक  करण्या करता. व्यायामासारखी….. त्रास होतो… पण नंतर सवयीने फायदा पण….

स्वाध्याय : स्वाध्याय म्हणजे स्वत:चा अभ्यास करणे. हा स्वत:चा, स्वत:च्या कृतींचा आणि विचारांचा अभ्यास आपल्याला स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणण्यात तसेच स्वत:चे अधिक चांगले स्वरूप साध्य करण्यात मदत करतो.

ईश्वरप्रणिधान : याचा अर्थ दिव्यत्वाला शरण जाणे. नियमपूर्वक ईश्वराचं स्मरण…..

3. आसन :-आसने ही केवळ शारीरिक व्यायाम नसून मनोबल आणि जीवनदृष्टी घडवणारी साधना आहे. ह्याला आपण ध्यानाकरता शारीरिक सिद्धता करणारं टूल म्हणूयात.

4. प्राणायाम :- प्राणायाम हा श्वासांना स्थिर हालचालींशी जोडण्याचा सराव आहे किंवा थोडक्यात श्वासावर नियंत्रण ठेवणे आहे. श्वासावर नियंत्रणं म्हणजे एका प्रकारे मनावर नियंत्रण हे रेस्ट्रीकशन चॅनेलीन्ग आहे.

5. प्रत्याहार :- प्रत्याहार म्हणजे अनावश्यक किंवा सकारात्मक वाढ आणि विकासात अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टींतून आपल्या संवेदना काढून घेण्याची पद्धत. आताच्या भाषेत डिटॅचमेंट. पण अनावश्यक गोष्टीची. मग ते टॉक्सिक रेलशनशिप असो किंवा वोर्कप्लेस स्ट्रेस….

6. धारणा :- म्हणजे अविचलित एकाग्रता. धारणा म्हणजे लक्ष एका बिंदूवर, अविचलितपणे एकाग्र करणे. शरीर मन व बुद्धी वर कंट्रोल…..  

7. ध्यान :- ध्यान आणि धारणा यांची अनेकदा गल्लत केली जाते, पण ते तसे नाही. यातील प्रमुख फरक समजून घेऊ. धारणा म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीवर एका वेळी अधूनमधून केंद्रित केलेले लक्ष. यामध्ये काहीतरी क्रिया घडत असते. ध्यान म्हणजे कोणत्याही प्रक्रियेचा विचार न करता केलेलं संपूर्ण रेलॅक्सएशन.

उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती जेव्हा ध्यान करत असते, तेव्हा ती आपण ध्यान करत आहोत असा विचारही करत नाही. ही जागृतावस्थेतील विश्रांतीची अवस्था आहे. यात शरीर, मन  व बुद्धी विश्रांती घेत असते .

8. समाधी :- ह्याचा समानार्थी शब्द आहे आनंदाची अनुभूती. हा खरा आत्मानंद…..

खूप जास्त एकाच विषय चघळल्या जातोय असा वाटतंय….. ही लेखमाला बंद करतोय…. बघा जमतंय का? 

लेखक

  • अभिषेक किन्हेकर

Post navigation

Previous: आत्महत्या
Next: शुभेच्छा द्याव्या की न द्याव्या हा एकच सवाल आहे.
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.