Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

नागपूरचा इतिहास – राणी दुर्गावत

मोहन जोशी जुलै 7, 2026 1 minute read
0
gumohor-water

नागपूरचा इतिहास                                        7 जुलै 2026

 

गोंडवन

                          राणी दुर्गावती

पंधराव्या शतकात गोंडवंशिय राजा जादु राय याने गढ-मंडला राज्याची स्थापना केली तेव्हा या राज्यात जबलपूर भोवतीचे  ग्रहा , शहापूर ,दमोह असे तिन किंवा चार प्रांत होते.

इ.स. 1480 मध्ये राजा संग्रामशहा ग्रहा अथवा गढा येथे गादीवर बसाला. पराक्रमी संग्रामशहा याने  राज्य विस्तार करून  राज्याला 48 प्रांत अथवा गढ जोडले ! महाराज संग्रामशहा यांनी ग्रहा येथे संग्राम सागर जलाशय निर्माण करून काठावर भैरव मंदिर बांधले तसेच नरसिंहपूर येथे चैहारगढ किल्ला बांधला.

गढ-मंडला राज्य हे पुर्वेस शोण  नदी आणी पश्चिमेस पार्वती अथवा पार्बती नदी दरम्यान पुर्वेस शोण  नदी आणी पश्चिमेस पार्वती अथवा पार्बती नदी दरम्यान होते. गढ-मंडला च्या उत्तरेस चंदेल राज्य होते आणी दक्षिणेत देवगढ राज्य होते.

महाराज संग्रमाशहानंतर  पुत्र दलपतशहा गादीवर बसला.  महाराज दलपतशहांनी ग्रहा येथून सिंगारगढ येथे राजधानी नेली. दलपतशहा यांचा चंदेल राजपूत्री दुर्गावती हिचेशी इ.स. 1542 मध्ये प्रेमविवाह झाला होता. पण   विवाहानंतर मात्र आठ वर्षांनी महाराज दलपतशहा मृत्यूस पावले. नंतर तिन वर्षांच्या राजपुत्र बिरनारायण यास गादीवर बसवून

  राणी दुर्गावती समर्थपणे राज्या कारभार करू लागल्या.परोपकारी राणी दुर्गावतीने   रयेतच्या उपयोगी वास्तु निर्माण केल्या योजाना राबविल्या. राणी दुर्गावतीच्या 15 वर्षांच्या कारर्किदित राज्याची भरभराट होवून प्रजा सुखी  झाली.

 

पण इ.स.1564 मध्ये मोगलांच्या टोळयांनी कारा माणिकगड वाटेने गढ-मंडला राज्यावर हमला केला. तेव्हा विरागंना राणी दुर्गावतीने राजपुत्र बिर नारायण शहा सुरक्षित  यास नरसिंहपूरच्या चैराहगढ किल्ल्यावर पाठवून दिले नंतर सैन्य सज्जकरून दमोह   च्या सिंगारगढाकडे मोगलांच्या जोरदार प्रतिकार केला.नंतर तेथून निसटून मंडलाकडे निघून गेली. पण मोगलांचा लंपट सुभेदार आसफ खानाने पाठलाग केला तेव्हा  प्राण त्यागकरून राणी दुर्गावतीने  आत्मसम्मानाचे रक्षण केले. मग मोगलांनी चैराहगढावर हमला केला आणी  बिर नारायणला ठार करून  लुटालूट केली. वीर लढात  लढता वीरगतीला प्राप्त झाले तेव्हा  गडावरच्या  िस्त्रयांनी जोहर करून मोगंलापासून  आब्रुचे रक्षण केले.

तेव्हा सिंगरगढावर राणी दुर्गावती यांचे देवघरात सुवर्णाच्या देवांच्या प्रतिमा होत्या. खजिन्यात मौल्यवान दागिने होते गजशालेत शंभर हत्ती होते. चंद्रशहा सैन्यासह चालून   

येण्यापूर्वीच  हाताला जे लागेल ते घेवून मोगलांच्या टोळया पसार झाल्या.

नंतर महाराज दलपत शहांचा बंधु चंद्रशहा गादीवर बसला. खंडणीकरता मोगल सुल्तान अकबराने  गढ-मंडला राज्याचे  पश्चिमेकडील  र्पावती नदी आणी वेत्रावती नदी दरम्यानचे 10 गढ बळकाविले.

पूढे महाराज   हिरडे शहा गादीवर यांनी राज्याचा विकास केला. ग्रहा येथे गंगासागर जलाशय  निर्माण  केले. जबलपूर परीसरात महाराज हिरडे शहा यांनी 1 लक्ष आंब्याची झाले लावून आमराई निर्माण केली ! तसेच नर्मदेकाठी मंडला येथे  राजवाडा निर्माण करून  महाराज हिरडे शहा यांनी तेथे राजधानी केली.

गृहकलहामूळे  इ.स. 1789 नंतर गढ-मंडला राजवंश लयास  गेला नंतर पेशवे बाजीराव यांनी गढ-मंडलावर वर्चस्व केले.

 

 

लेखक

  • मोहन जोशी

Post navigation

Previous: #30 दिवसात 30# प्रयोग जुलै2026
Next: नंतर म्हणजे कधी ? भाग १
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.