नंतर म्हणजे कधी ?
भाग १
विक्रम वेताळासारखे काऊंटर पलिकडच्या बाई आणि मी , दोघी आपापले हट्ट सोडत नव्हतो. ‘ आधार कार्डची कॉपी कुठाय? ‘ अहो लावलीय.’ ‘ फोटो कुठेत ? ‘ ‘ अहो हे काय लावलेत ना ..’ काऊंटर पलिकडच्या बाईंच्या कपाळावरच्या आठ्या आणखीन ठळक झाल्यासारख्या वाटल्या. ‘ बरं.. बघते. तुम्ही बसा. ‘ म्हणत मॅडम पुन्हा त्यांच्या कामात व्यस्त झाल्या.
' मॅडम प्लीज ऑफिसला एक तास उशिरा येईन सांगून आलेय. जरा लवकर झालं तर बघा ना. ‘ मी हेका सोडला नाही. आज उशीर झाला तर वाट लागणार होती. सौरभसरांच्या शाळेचा विचार करूनच नको झालं. मोबाईल वर फोटो बघ.. कायप्पा चे मेसेज बघ ..असा काहीतरी टाईमपास मी करत राहिले. बरं घाई असताना जेव्हा वाट बघावी लागते तेव्हा जणू तोच काहीतरी करत घालवलेला वेळ आकुंचन पावतो आणि वाट बघण्याची वेळेची विलंबित लय सुरू होते.
आता मॅडम निवांतपणे उठल्या. आत कुठेतरी जायची तयारी दिसत होती. ‘ अहो मॅडम माझा फॉर्म..’ आता मात्र मी काकुळतीला आले होते. ‘ तुमचं काम सुरू आहे.. तुम्हाला खूप घाई असेल तर नंतर या. तोपर्यंत काम झालं असेल. ‘ बाई अगदी सवयीचं असल्यागत म्हणाल्या. ‘ नंतर म्हणजे कधी ? मॅडम मला या महिन्यात पुन्हा लेट जाता येणार नाही हो..’ मी अगदी अजिजीने त्यांना सांगितलं. ‘ ठीक आहे पुढल्या महिन्यात या.’ त्या शांतपणे म्हणाल्या. ‘ आपल्यालालाच गरज आहे. ' म्हणत.. मी वैतागून बँकेतून निघाले. ' जाऊ दे करू नंतर कधीतरी.. मनात पुटपुटत घाईघाईने ऑफिसकडे निघाले.
वाटू लागलं की सगळी कागदपत्रं व्यवस्थित एकत्र केलेली , अर्ज/ फॉर्म व्यवस्थित अचूकपणे भरलेले ग्राहक अशा ऑफिसेस ना नकोच असतात. कारण अशा लोकांमुळे त्यांना काम ‘ नंतर ‘ करता येणार नसतं. ते तेव्हाच करून देण्याचं जवळजवळ सक्तीचंच होऊन जातं.
हाश हुश करत पळत लोकल पकडली. नशिबाने चर्चगेट फास्ट मिळाली आणि बसायला जागाही मिळाली ! डोळे मिटून काही वेळ बसुया म्हणून डोळे मिटले. आत्ता ही ट्रेन पकडेपर्यंतचे ९ ४२ पर्यंतचे सगळे सीन डोळ्यासमोर आले.
अबीर ने सकाळी आठवण केली ‘ आई तू म्हणाली होतीस ना .. आपण सगळे मिळून एक दिवस वेगळ्या पद्धतीने घालवू.. ‘ ‘ हो हो .. नक्की रे .. पण आत्ता नाही विचार करत .. नंतर .. नंतर ..’ निघताना आई ने हाक मारली.. ‘ शुभा .. अगं आज संध्याकाळी मिताकडे जायचंय .. ‘ .. ‘ अरे बाप रे.. हो आज बुधवार ! आई बोलते गं फोनवर.. तू तयार रहा संध्याकाळी.’ तिला घाईघाईत उत्तर देऊन बाहेर पडले. बाहेर पडताना राजुदादा भेटले.. ‘ मॅडम पेपरचे पैसे घ्यायचे होते.. ' अहो काय राजुदादा .. अहो नंतर घ्या ना .. नाही तर असं करा विभोरकडून घ्या पैसे. मी जरा गडबडीत आहे.’ तेवढ्यात सुगंधाचा फोन आला , ‘ शुभुताई उद्या पार्लरमध्ये जायचयं .. लक्षात आहे ना .. ‘ ‘ अगं हो सुगंधा.. नंतर बोलू? .. आता निघतेय.. चाल बाय ..’ सुगंधाचा फोन कट करून लिफ्ट मध्ये शिरले. ' सगळ्यांना सकाळीच बरा वेळ मिळतो. ' अशी थोडीशी इरीटेट होतंच बिल्डिंगबाहेर पडले होते.
नंतर सगळा बँकेतला प्रसंग डोळ्यासमोर आला. बँकेत लावलेलं एक पेंटिंग आठवलं. थोडं नवल वाटलं होतं. बँकेसारख्या रुक्ष जागी पेंटिंग कसं काय लावलं होतं काय माहित. त्यावरून आठवलं आपण या रविवारी पेंटिंग करणार असल्याचं विभोर आणि अबीर ला प्रॉमिस केलं होतं. मी शनिवार रविवारी एक नवं पुस्तक वाचायला सुरुवात करणार होते. मोबाईलचा वापर विकेंड ला कमी करणार होते. सोशल मीडिया तीन दिवस बंद ठेवणार होणार होते. ‘ आई गं !! ' नंतर नंतर नंतर' हे माझ्या जगण्याचं की न जगण्याचं सूत्र बनत चाललंय की काय ?! डोळे खाडकन उघडले. फक्त अंधेरी आलं होतं. ‘ काहीतरी फारच चुकतंय असं वाटायला लागलं.
क्रमशः