नागपूरचया इतिहास 8 जुलै 2026
गोंडवन
चंद्रपूर राज्य
वरदायिनी नदीच्या पुर्वेस नर्मदा नदी आणी अंबा नदी दरम्यान गोंडवंशिय देवगढ राज्य होते आणी देवगढ राज्याच्या दक्षिणेत अंबा नदी पासून गोदावर पावेतो चंद्रपूर राज्य होते.
गोंडवशिय राजा भिम बल्लाल सिंह यांने इ.स. 1240 मध्ये चंद्रपूर राज्य स्थापले. राजा भिम बल्लाल सिंह किंवा भिम बल्लाल शहा याने गोदावरी आणी वरदायिनी-प्राणहिता नदी दरम्यान च्या प्रदेशात राज्य स्थापून वरदायिनी नदीच्या उजव्या काठावर शिरपूर येथे राजधानी केली. पुर्वी या प्रदेशास गंगाधडी म्हणत असत. शिरपूर हे नगर सध्या तेलंगणा राज्यात आहे. राजा केशर बल्लाल शहा आणी नंतर राम बल्लाल शहा -1 यांनी उत्तरेत अंभोरयाच्या अंबा नदी राज्य विस्तार केला.
पूढे राजा खंडकिया बल्लाल शहा यांने चंद्रपूर नगर निमार्ण केले आणी राणीने तेथे अचलेश्वर मंदीर बांधले.
राजा खंडकिया बल्लाल शहा याने इ.स. 1437 ते 1462 राज्य केले. नंतर पुत्र हिर शहा गादीवर बसला. राजा हिर बल्लाल शहाने नगराचे व्दार निर्माण करून राजवाडा बांधला आणी चंद्रपूर येथे राजधानी केली.
राजा बाबाजी बल्लाल शहा इ.स. 1572 ते 1597 याचे समयी चंद्रपूर राज्याचे 10 हजार घोडदळ आणी 40 हजार पायदळ होते!
इ.स. 1731मध्ये सनंद प्राप्त करून रघुजीराजे विर्दभात दाखल झाल्यानंतर त्यानी चंद्रपूरचे राजे रामशहा याचेंशी सौहार्दपूर्ण सबंध प्रस्थापित केले होते. राजे रामशहा यांचे नंतर इ.स. १७३५ मध्ये निळकंठ शहा हा चंद्रपूरचे गादीवर बसला – त्याने सेना साहेबसुभा रघुजीराजांशी सुलूख. पण राजा निलकंठ शहा अत्यंत मनस्वी होता.गादीवर आल्यानतंर त्याने दिवान माधोजी वैद्य यांचा वध केला नंतर काही ना काही सबब करून एकएक करती मानकरयांना बडर्तफ करण्यास सुरवात केली.अखेरीस इ.स. 1749 मध्ये चद्रंपूर दरबारच्या मानकरयांनी महाराज रघुजीराजांची मदत मागितली.मग महाराज रघुजीराजे सैन्यासह चालून गेले व त्यानीं चद्रंपर नगर काबिज केले. तेव्हा माघार घेऊन निळकंठशहाने त्यांचेशी भाईबंधीचा तह केला.या तहात रघुजी महाराजांना चंद्रपूर नगर व चंद्रपूर राज्याचे वार्षिक उत्पन्नाचा ३७ १/२ टक्के भाग प्राप्त झाला.३ महाराज रघुजीराजांचे हिश्यात चंद्रपूर राज्याचे तेरा परगणे तसेच चंद्रपूर नगर व पाच पेठा चा अंर्तभाव होता.
इ.स.1551 मध्ये रघुजीराजांनी राजे निळकंठ शहा यांना बाळापूरचा दुर्ग सोपविला व चंद्रपूर प्रांतावर कृष्णाजी नारायण यास कमाविसदार नेमले. मात्र आज हि राजांची समाधी मंदिरे गोंडवंशिय चंद्रपूर राज्याची साक्षी देत आहेत