Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

लक्ष्मणराव आणि कुटुंब – ०९ ‘सुमनबाईंचे मन परिवर्तन’

वैभव शिरखेडकर जुलै 10, 2026 1 minute read
0
gumohor-water
संजयसाठी  मुलगी बघायला जायचे असल्याने, गुरुवारी सकाळी सर्व जण  आपापले कामे लवकर आटोपण्याच्या तयारीत असतात. म्हणायला जरी शेजारचे शहर असले, तरी साधारणपणे अडीच तासांचा प्रवास असतो. जेवण वगैरे करून ११.३० ला घरून निघायचे असे नियोजन असते.

निघण्याच्या थोडा वेळ अगोदर लक्ष्मणराव सर्वांना काही महत्त्वाच्या सूचना देतात. तिथे गेल्यावर काय बोलू नये हे लक्ष्मणराव सांगत असतात. ते सुमनबाईंचे नाव न घेता बोलतात पण त्याचा रोख हा सुमनबाईंकडेच असतो.

बघा सर्वजण, मुलीला असे काही प्रश्न विचारू नका जे योग्य नाही. जसे गाणे येते का, चालून दाखव वगैरे, आपल्याला गायक नको आहे.  आपण टेलिव्हिजन आणि रेडिओ वर ते ऐकत असतोच. आणि ती मुलगी जे काही आपल्यासाठी खायला प्यायला घेऊन येईल ती चालतच येणार, त्यामुळे वेगळा चालण्याचा कार्यक्रम मला तिथे नकोय. जर असं झालं तर आपल्या संजयचा स्वभाव सर्वांना माहित आहेच, तिला जर चालून दाखव म्हटले तर संजय स्वतः सुद्धा चालून दाखवेल. कारण त्याला हे सर्व आवडत नाही.

लक्षात आलं ना मंडळी माझे बाबा काय म्हणतात ते. थोडा हसून आणि गमतीने संजय म्हणतो.

तेवढ्यात राम्या पाटीलचा आवाज येतो, गुरुजी आलोय की मी!

अरे वाह रामा दादा, एकदम वेळेचा पक्का की तू.  राम्या दिसताच संजय त्याच्याशी बोलून त्याची विचारपूस करतो.

संजय भाऊ तुम्ही पण मला राम्याच म्हणत जा की, सगळेच म्हणतात तसे..

बरं रामा दादा असे म्हणून, संजय आणि बाकी लोकं देवाजवळ नमस्कार करून गाडीत बसायला निघतात.

रस्त्यातच ते कुळकर्णी मास्तर आणि यशोदा यांनाही सोबत घेतात.

गाडीत गप्पा करत करत सर्वजण गांव कधी येईल याची वाट बघत असतात. तेवढ्यात राम्या म्हणतो.

मग काकू दुसरी सुनबाई येणार की लवकरच घरी तुमच्या.

पाहायचे आहे रे राम्या अजून पोरीला, तू पण ना तुझ्या गुरुजींशी आणि संज्याशी मिळालेला दिसतोय.

हे सुमनबाईंनी म्हणताच गाडीतील सर्वजण हसायला लागतात.

अशाच गमती -जमती करत करत शहरात त्यांची गाडी शिरते व नंतर १० मिनटात ते अजय समुद्रपुरकरांकडे पोहचतात.

अजय आणि त्यांची पत्नी विशाखा, त्यांचे जावई व मुलगी सर्वांचे स्वागत करतात. सर्वांना बसवून समुद्रपूरकरांची मोठी मुलगी बाजूच्या कक्षात तिच्या आईला घेऊन जाते व म्हणते,

आई, मुलगा तर खूपच सुंदर आहे दिसायला आणि गोरापान आहे. आपली कात्यायनी तर सावळी आहे. हे लोकं हो म्हणतील का ग? कारण फक्त तिच्या सावळेपणामुळे आतापर्यंत आठ स्थळांनी नकार दिलाय.

विशाखा ह्या त्यांच्या मुलीला सांगतांना म्हणतात,  तशी त्यांना कल्पना दिली होती वैष्णवी आपण. कुळकर्णी काकांच्या माध्यमातून. प्रत्यक्ष मुलीला पाहून काय ते सांगू असा त्यांचा निरोप आलेला होता. आता जी दत्तगुरूंची इच्छा असेल ते होईल.

काही वेळाने कात्यायनी ला घेऊन तिची आई व मोठी बहीण येते.

कात्यायनीच्या चेहऱ्यावरील तेज, सात्विक भाव, स्मित हास्य हे सर्व बघून  सुमनबाईंचे सर्व किंतु परंतु विरून जाऊन  त्यांचे डोळे भरून येतात. त्या  मनातल्या मनात म्हणतात, हे विठ्ला  तू सुद्धा सावळा आहेस रे बाबा, हे मी कशी विसरले होते रे. त्या कुठेतरी स्वतःत हरवून बसतात.
काकू नमस्कार करते! अशी जेव्हा त्यांना कात्यायनी म्हणते. तेव्हा त्या भानावर नसतात.

मनाची अशी अवस्था झालेली असतांना,

सुमनताई, ओ सुमनताई.. कुठे हरवलाय तुम्ही. कात्यायनी तुम्हाला नमस्कार करायला आली आहे. यशोदा त्यांना आवाज देतात.    

हो का? असे सुमनबाई म्हणतात. बाळा कात्यायनी नाव ना तुझं ..

हो काकू, असे कात्यायनी म्हणते.

काकू नाही, आता आईच म्हणायचे.

कात्यायनी तिच्या आईकडे बघत होती.
कात्यायनी आणि तिच्या आईच्या लक्षात येते की, हे लोक सोबत होकार घेऊनच आलेत.

पण कात्यायनी सुमनबाईंना नमस्कार करणार तेवढ्यात, त्या स्वतः कात्यायनीला क्षमा मागतात.

मला क्षमा कर रे बाळा, मी तर इथे येणार नव्हती. आली तरी नकार द्यायचा हे माझे ठरलेले होते. पण तुझ्याकडे बघताच मला असं काय झालं की, एकदम माझ्यात परिवर्तन झालं. मला जणू साक्षात कात्यायनी देवीचं दर्शन झालं.

एकाएकी सुमनबाईंमध्ये असे कसे परिवर्तन झाले असे लक्ष्मणरावांना वाटते. कारण सुमनबाईंचे असे वागणे अचंभित करणारे असते.  ज्या मुलीला बघितलेलं सुद्धा नाही, ती फक्त सावळी आहे म्हणून कशाला बघायला जायचं, नकार कळवायचा असं म्हणणाऱ्या सुमनबाईंनी मुलीला  काही सुद्धा प्रश्न न विचारता फक्त बघूनच होकार दिला. हे सगळं काही क्षणांत घडलेलं बघून लक्ष्मणराव अवाक झाले. आणि कुठेतरी त्यांच्या मनावरचं दडपण सुद्धा दूर झालं.

थोड्यावेळाने ठरल्याप्रमाणे महाराष्ट्रीयन संस्कृतीनुसार चहा पोह्याचा कार्यक्रम होणार होता. त्याआधी कात्यायनीचे वडील अजय आणि त्यांची मोठी मुलगी वैष्णवी ह्यांनी सर्व पाहुण्यांना घर दाखवायला सुरुवात केली.

तसे समुद्रपूरकर कुटुंब हे सर्वसाधारण म्हणजेच लक्ष्मणरावांच्या कुटुंबासारखेच होते. दोन्ही कुटुंबाची परिस्थिती सारखीच. तरी लक्ष्मणरावांच्या मनात एक प्रश्न होता, तो त्यांनी घर बघता बघता समुद्रपूरकरांना बोलुन दाखवला.

अजयराव, लग्न तर आता जमले हे समजूया. पण एक प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही शहरातले  आणि आम्ही ग्रामीण भागातले. तसे आमचे  नगर परिषद आहे पण वातावरण मात्र ग्रामीण भागासारखे आहे. तुम्ही ग्रामीण भागात मुलगी द्यायला कसे तयार झालात. त्यात कात्यायनी पीजी झालेली आहे मराठी आणि इंग्रजी दोन्हीमधे

कसं आहे ना परांजपे  गुरुजी, हा प्रश्न मलाही पडला होता. पण कात्यायनी म्हणाली, जर परांजपेंकडून कडून होकार असला तर छानच आहे. फक्त एकच की, तिला शिकवायला आवडते. जशी ती इथे इंग्रजी च्या ट्युशन्स घेते त्याप्रमाणे तिला आपल्याकडे करता आले तर उत्तम. त्यामुळे सासरच्यांना काही त्रास होणार नाही. याची खात्री मी स्वतः देतो तुम्हाला.

कुठेतरी कात्यायनीने ऍडजस्ट  केलेलं असतं हे लक्ष्मणरावांना  समुद्रपूरकरांच्या बोलण्यातून लक्षात येतं. पण मुलीला फक्त घरच्या कामात आम्ही न गुंतविता समाजासाठी त्या प्रतिभेचा कसा उपयोग होईल हे अवश्य बघू असे आश्वासन लक्ष्मणराव समुद्रपूरकरांना देतात. हे ऐकून अजय समुद्रपूरकर यांना आनंद होतो.

चहा, पोह्याचं झाल्यावर लक्ष्मणराव समुद्रपूरकर कुटुंबाला त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण देतात. शक्य असल्यास येत्या रविवारी किंवा त्यांच्या सोयीनुसार यावे असा ते आग्रह करतात.

अजय समुद्रपूरकरांना काही बोलायचे आहे पण ते संकोच करत आहेत हे कुळकर्णी मास्तरांच्या लक्षात येते. तेव्हा मास्तर म्हणतात,  काय अजय जी काही बोलायचे असल्यास संकोच ठेऊ नका.

हो हो मास्तर, मला हे बोलायचे की, आता पहिल्या भेटीत सर्व सकारात्मक घडून येत आहे.. तर आमच्याकडून काही द्यायचे असल्यास तसे आपण सांगावे. आम्ही लग्न सुद्धा छान करू.

संजय ला हे ठीक वाटत नाही त्याने बोलावे एवढ्यात लक्ष्मणराव त्याला बोलू देत नाही. याचे संजयला वाईट वाटते.

तेव्हा लक्ष्मणराव समुद्रपूरकरांना स्पष्टपणे म्हणतात, हे बघा आपण हे सर्व देण्याघेण्याचे व आम्हाला आपल्याकडून काय हवे ते आम्ही आपण जेव्हा आमच्या घरी याल तेव्हाच सांगू.असे म्हणून लक्ष्मणराव हा विषय थांबवतात.

तर मग आपण म्हणाला तसे या रविवारी येऊ आम्ही. तेव्हाच बोलू मग ह्या विषयावर. असे म्हणून समुद्रपूरकर लक्ष्मणरावांचे धन्यवाद मानतात.

संजयच्या मनात मात्र काही वेगळेच चाललेले असते. बाबांनी काही घेण्याच्या गोष्टीबद्दल असे का बोलले असावे हे त्याला समजत नाही. आणि मास्तरांनाही नवल वाटते. पण मास्तर आणि संजय यावर पुढे परतीच्या प्रवासात काही सुद्धा  बोलत नाहीत.

आता जेव्हा घरी ज्याण्याची वेळ येते तेव्हा वैष्णवी म्हणते, अरे एक राहिलचं की  आई बाबा.. आपली कात्यायनी आणि संजय या दोघांनी आपसात काय ते एकट्यात बोलून घ्यायला हवे होते.

अरे असू दे बेटा आता, ते बोलले कधीचेच.. लक्ष्मणराव म्हणतात.

कधी बोलले काका ते, मला माहीतच नाही..

तेव्हा लक्ष्मणराव म्हणतात, आँखों ही आँखों में इशारा हो गया..

तेव्हा संजय आणि कात्यायनी दोघेही एकमेकांकडे बघून लाजतात.

तेव्हा सुमनबाई म्हणतात, अहो.. राकेश चे बाबा झालं असेल ना. चला आता, तिकडे वेळ होणार नाहीतर तुमच्या गाण्यापायी. असे म्हणून लक्ष्मणराव आणि कुटुंब.. समुद्रपूरकरांचा  निरोप घेतात आणि आपण सर्वांनी नक्की रविवारी या असे पुन्हा सांगतात.

रात्री नऊ वाजता लक्ष्मणराव आणि त्यांचे कुटुंब घरी पोहचतात. प्राजक्ता आणि मकरंद यांनी रविवार पर्यंत थांबायचे असे ठरलेले असते. एकीकडे संजयच्या मनात चाललेली घालमेल लक्ष्मणरावांना लक्षात येते तेव्हा संजयने काही विचारण्याच्या आधीच लक्ष्मणराव त्याच्याशी बोलायला सुरुवात करतात.

हे बघ संजय, तुझ्या मनात काय आहे ते मला माहित आहे. पण तुझ्या प्रश्नाचे उत्तर रविवारी मिळेल. तू जास्त चिंता करू नकोस. जे मी करेल ते योग्यच करेल.. माझ्यावर विश्वास ठेव.
हो बाबा तुमच्यावर विश्वास आहे हो, पण तुम्ही जो सस्पेन्स ठेवत असता ना, तर कधी कधी भीती वाटते या सर्व गोष्टींची मला.  असे म्हणून तो झोपायला जातो. तर एकीकडे सुमनबाईंना कात्यायनी सासरी आल्यावर ट्युशन्स घेईल हे लक्षात आलेले असते. त्या स्पष्टपणे लक्ष्मणरावांना याबाबतीत बोलून दाखवतात.

हे बघा राकेश चे बाबा, मला ते भावी सुनबाईंचे ट्युशन्स घेणे पटणार नाही आताच सांगून ठेवते.

सुमनबाई आपण त्यांना स्पष्टपणे फोन करून नकार कळवा आणि तसे खरे कारण सुद्धा सांगून द्या. लक्ष्मणराव सुद्धा तेवढयाच स्पष्टपणे बोलतात.

अहो पण, आपल्या सर्वांना कात्यायनी खूप आवडली आहे.

हो आवडली आहे ना पण तुझा हट्ट आता आड येईल ना, त्यामुळे त्या हुशार मुलीचे नुकसान होईल. आणि हा मुद्दा आता चर्चिण्यासारखा नाहीच. लग्न झाल्यावर ह्या सर्वांचे नियोजन करूया. पण त्या मुलीचे, तिच्यात असलेल्या प्रतिभेचे मला नुकसान होऊ द्यायचे नाही.

लक्ष्मणराव आता ऐकणारे नाहीत हे लक्षात आल्यावर  सुमनबाई तिथून निघायला जातात तोच लक्ष्मणराव त्यांना काही विचारतात.

अहो बायको जरा थांबा की, जरा गमतीने लक्ष्मणराव सुमनबाईंना थांबवतात.

आता काय झालं, सुमनबाई म्हणतात..

झालं असं की, मला एक सांगा एकदम परिवर्तन कसे झाले तुमच्यात.. मुलीला बघून. एकदम हो म्हणालात तुम्ही तर.

सुमनबाई सांगू लागतात, ते असं झालं, जसे मी कात्यायनीला बघितलं.. माझे भानच हरवले. काय ते तिच्या चेहऱ्यावरचे तेज, चेहऱ्यावर असलेले स्मित हास्य, साक्षात कात्यायनी देवीच. तेव्हा मला माझी चूक लक्षात आली.

तर हे कारण आहे… चूक लक्षात आली ना ते महत्त्वाचं. आता उद्यापासून लागा लग्नाच्या तयारीला. आणि रविवारच्या सुद्धा.. असे म्हणत लक्ष्मणराव सुमनबाईंचे धन्यवाद मानतात व पुढे सुद्धा असेच परिवर्तन घडत राहू दे रे विठुराया असे देवाला मनोमन म्हणतात.

क्रमशः

लेखक

  • वैभव शिरखेडकर

    वैभव शिरखेडकर, नागपूर
    नागपूरला खासगी क्षेत्रात नौकरी. विविध विषयांवरचे पुस्तके वाचनाची आणि हिंदी, मराठी कविता लिखाणाची आवड. नागपूर विश्वविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी.

Post navigation

Previous: तूच हवी
Next: ‘तंबोरा’ एक जिवलग……५
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.