नागपूरचा इतिहास १२ जुलै २०२६
नागपूरकर भोसले
नागपूर राज्याची स्थापना
सेना साहेब सुभा पुरसोजींराजे यांचेनंतर त्यांचे पुत्र कान्होजीराव यांना इ.स.१७११ मध्ये सनंद व सेनासाहेब सुभाचे मानव़स्त्र प्राप्त झाले पण इ.स.१७३१ मध्ये सेनासाहेब सुभा कान्होजीराजे यांनी देवगढ राज्यावर चढाई केली !तेव्हा छत्रपती शाहु महाराजांची मर्जी खफा होऊन त्यानी कान्होजीराजांना परत बोलावून त्याचें जागी रघुजीराजांची नेमणूक केली. नंतर छत्रपती शाहु महाराजांनी खर्चाकरता कान्होजीराजांना विर्दभ प्रातांचे दर्यापूर व अकोले हे २ परगणे दिले. नंतर छत्रपती शाहु महाराजांचे आज्ञे प्रमाणे सेना साहेब सुभा रघुजीराजे इ.स.१७३१ मध्ये विर्दभ प्रांती रूजु होऊन राजुर येथुन कारभार करू लागले .
देवगढचे राजा चांद सुल्तान यांचा इ.स.१७३५ मध्ये मृत्यूस झाला.नंतर इ.स.१७३८ मध्ये वलीशहाने बंड केले. वलीशहाने चांद सुल्तान यांचे थोरला पुत्र मिर बहादुरशहा याची हत्या करून राणीसाहेब रतनकौर व त्याचें दोघे अल्पवयीन पुत्र बुराहण शहा व अकबर शहा यांना कैद केले.नंतर देवगढची गादी बळकावली. तेव्हा राणीसाहेब रतनकौर यांनी गुप्तखलिता पाठवून सेना साहेब सुभा रघुजीराजांची मदत मागितली
देवगढचे राजमाता राणीसाहेब रतनकौर यांचा गुप्त खलिता प्राप्त झाला असता रघुजीराजे पाच हजार सैन्यासह त्वरेने निघाले. केझरच्या घाटाने पवनी येथे आले व पवनीचा किल्ला घेऊन भंडारा परगण्यात डेरेदाखल झाले. सेना साहेब सुभा रघुजीराजांचे स्वारीची खबर होताच वलीशहाने दिवान रघुनाथ सिहं याचेसह फौज पाठविली. तेव्हा रघुजीराजांनी वलीशहाचे फौजेचा सोनबर्डीचे लढाईत भयंकर पराभव केला. नंतर रघुजीराजांनी वलीशहाचा देवगढ लढाईत भयंकर पराभव केला. राणीसाहेब रतनकौर यांना देवगढचे राज्य सोपविले . तेव्हा देवगढचे राजमाता राणी रतनकौर यांनी मदतिकरता सेना साहेब सुभा रघुजीराजांना देवगढ राज्याच्या पवनी सरकाराचे पांलादूर व अणखि दोन परगणे तसेच मुलतापी चिखली व मारूली हे परगणे व दहा लक्ष लढाईचा खर्च दिला.
पूढे राजमाता राणीसाहेब रतनकौर यांचा थोरला राजपुत्र कुंवर बुराहण शहा हा देवगढचे बसला.पण इ.स.१७४३मध्ये मोगंल सुभेदार निजाम उल् मुल्ख याच्या चिथावणीमूळे अकबरशहाने बंड केले. मग राजमाता रतनकौर यांनी सेना साहेब रघुजींराजांची मदत मागितली होती.रघुजीराजांनी देवगढावर वर्चस्व करून अकबरशहाचे बंड सहजतेने मोडून टाकले. तेव्हा शिक्षेच्या भितीने अकबरशहा निजामाकडे पळून गेला पण अकबर शहा निजामाचा आश्रय घेतला असल्याने देवगढ राज्यावर मोगंल हमल्याचे सावट पसरले तेव्हा राज्य रक्षणाकरता राजमाता रतनकौर यानीं रघुजीराजांना आपला पुत्र मानून त्यांचेकडे देवगढ राज्य सोपविले त्याकरता दरबार भरवून राजा बुराहण शहा यांनी सेनासाहेब सुभा रघुजीराजांचे कपाळी टिळा लावून देवगढा राज्याचा कार्यभार त्यांना सोपविला व देवगढ राज्यावर त्यांचा अधिकार मान्य केला.
नंतर श्रीराम नवमीचे पावन मुर्हूतावर राघुजीराजांनी नागपूर राज्याची विधीवत स्थापना केली. सेना साहेब सुभा रघुजीराजे यांनी देवगढ राज्यावर अधिकार केला असा आक्षेप घेतला जातो. मात्र परिस्थितीवष होऊन राणी रतनकौरला तिचे देवगढाचे समृद्ध राज्य त्यांचे स्वाधीन करावे लागले ही जाणीव रघुजीराजानी आयुष्यभर सतत ठेवली.त्यांचे वंशानेही ती पुढे पिढया दर पिढया जपली. राजा बुराहण शहाला त्यांचे दरबारी मानाचे स्थान प्राप्त होते. संस्थानिक असा त्यास खिताब होता.रमजान ईदेस खुद्द महाराज रघुजीराजे बुराहण शहाचे राजवाड्यावर जाऊन त्यास व कुटुंबास मानाचे अहेर देत असत. राजवटीचे जमाखर्चात सुद्धा गौंडराजांचा हिस्सा म्हणूनच ते उत्पन्न दाखवित!
नागपूरकर भोसले घराण्याचे प्रत्येक राजरोहणाचे समयी गोंडराजाकडून टिका लावून घेतल्यानंतरच सत्ता हस्तांतरांची प्रथा रघूजीराजांचे पिढ्यानी तशीच निभावली. देवगढच्या राजपरिवारांने हि पिढ्या दर पिढ्या त्यांचे राणीचे दिलेले वचन पाळले. देवगढासारखे संपन्न राज्य त्यांना गमवावे लागले तरी ते भोसल्यांशी एकनिष्ठ राहिले त्यांचे सुखदुःखात सामील होत राहिले असल्या अनोख्या मैत्रीचे उदाहरण इतिहासात गवसणे दुर्मिळच!