नागपूरचा इतिहास १४ जुलै २०२६
नागपूरकर भोसले
महाराज जानोजीराजे भोसले
युवराज जानोजीराजे हे कनिष्ठ राणीसाहेब सुळाबाईंचे पूत्र असले तरी थोरल्या राणीसाहेब बालाबाई यांचा पूत्र मुधोजीराव यांचेपेक्षा वयाने वडील होते कारण त्यांचा जन्म सकाळी तर मुधोजींराव यांचा जन्म त्याच दिवशी पण सायंकाळी झाला होता. म्हणून रघुजी महाराजानंतर जानोजी नागपूर राज्याचे मसनदीवर बसले! नागपूर राज्याचा कारभाराची सुत्रे हाती घेतल्यानंतर महाराज जानोजीराजे यांनी इ.स. १७५७ मध्ये नानासाहेब पेशवे यांनी योजलेल्या सावनुर अभियानात सहाभाग केला . नंतर महाराज जानोजीराजे व मुधोजीराजे पुण्यास गेले.विजयात नागपूरकर भोसले यांचा सिंहाचा वाटा होता.लढाईत मुधोजीराजांनी उत्तम कामगिरी बजावली होती याकरता नानासाहेब पेशवे यांनी मुधोजीराजे यांना सेना धुरंधर हि उपाधि देऊन त्यांचा सम्मान केला.
सिंधखेड येथे २ जानेवरी इ.स. १७५८ रोजी लढाई होऊनमराठयांनी निजाम अलीचा भयंकर पराभव केला. या लढाईत महाराज जानोजीराजांनी उत्तम कामगिरी बजावली. अखेरीस २५ मार्च इ.स. १७५८ रोजी वरदा नदी काठी निजाम अलीने महाराज जानोजीराजे यांची भेट घेऊन तह केला तहातअचलपूर सुभाचे ४५ टक्के उत्पन्न भोसले व ५५ टक्के निजाम अली याने घ्यावे असे ठरले.
नंतर राक्षसभुवन येथे १०आगस्ट इ.स. १७६३ रोजी लढाईहोऊन निजामाअलीचे फौजेचा पराभव झाला निजाम अलीने माघार घेऊन मराठयांशी तह केला
इ.स.१७७२ मध्ये पेशवे माधवराव आजारी झाले महाराज जानोजीराजे व सेना धुरंधर मुधोजीराजे यांनी थेऊर येथे त्यांची भेट घेऊन आस्तेने चैाकशी केली.पण थेऊरहून लवाजम्यासह नागपूरकडे परत येत असताना नळदुर्ग येथेची महाराज जानोजींराजांचे २१ मे इ.स.१७७२ रोजी निधन झाले- महाराणी दर्याबाई व जानोजीराजे यांना अपत्य नसल्याने त्यांनी मुधोजीराजे यांचा पुत्र बापुजीराव यास उत्तराधिकारी नेमले होते.