डोंगर पाहू, दरी ही पाहू,
नदीकाठी बसू,
समुद्रावर जाऊफिरू खेळू,
करूया मस्ती,आहे मोकळा दिवस,
येणारच सुस्ती
श्रीमती दामले यांनी मोकळा /उनाड दिवस दिवस त्यांच्या शब्दांच्या विळख्यात बांधून बघितल्या बघा.
नदीकाठी पासून रेतीत किल्ले बनवताना, मन केव्हा बालपणीच्या आठवणींत रमले कळले सुद्धा नाही. नदीत पोहणे, पाण्यातले दिवस मित्रांबरोबर पाण्यामध्ये सुरकाठी खेळण्याचे ते दिवस, डोळ्यासमोर तरळत आले आणि एक विलक्षण हास्य चेहऱ्यावर उमटले.
बाजूला असलेले डोंगर पूर्वी कसं सहज चढून जायचं. आत्तासुद्धा प्रयत्न करावा म्हणून तिकडे वाळून वर चढण्याचा प्रयत्न करू लागलो. पण काय राव! अर्ध पण अंतर झालेलं नाही, आणि दमछाक झाली. पुढे जाण्याची हिंमतच नव्हती त्यामुळे पुन्हा मोर्चा गावाकडे वळविला. गावातल्या शाळेच्या पटांगणातला तो झुला बघितला अजूनही तो तसाच वाटला हळूहळू मन रमत गेले.
इकडे आलो की लेले काकूंच्या घरी अर्थातच, आता त्या “काकू” नाही राहिल्या, नाही नाही तसा विचार नाही आता त्या “आजी” झाल्या. त्यांच्या हातची कांदिभजी चहा पूर्वीसारखेच तसेच त्याच चवीचे.
एक दिवस असाच मन झाले, पन्हाळगड ते विशालगड पावनखिंडामधून पायी जायचे आज त्यातल्या त्यात बाजीप्रभू देशपांडे यांचा स्मृती दिवस आहे. म्हणून हे प्रकर्षाने आठवले. खूप इतिहास प्रेमी अजूनही त्या रस्त्यातून चालून बाजीप्रभूंना श्रद्धांजली देतात.
कधी कधी तर रात्री मोकळ्या जागी जाऊन लहानपणीचे बुड्डीचे खटले शोधणे. टीम टीमणाऱ्या एखाद्या ताऱ्यामध्ये बघून आपल्या जवळची कोणी व्यक्ती त्या दिसते का? असे म्हणून मन हळवे होते.
तुम्हालाही असाच एखादा उनाड दिवस किंवा मोकळा दिवस आठवत असेल तर नक्की कमेंट करा.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६