Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

ती

हेमंत नाईक जुलै 20, 2026 1 minute read
0
1001108320.jpg
     “ती”  मराठी व्याकरणातील स्त्रीलिंगी शब्द  उच्चारला  की डोळयांपुढे गृहिणी उभी राहते. आपली वेगवेगळी नाते जपून सर्वावर प्रेम करून कुटुंब धरून ठेवणारी. खरंतर गृहाची स्वामींनी या अर्थाने घर सांभाळणारी म्हणजे “गृहिणी” असं असल तरी ती काही कमवून आणत नसल्याने तिला गृहीत धरायची वृत्ती बळावते जीला सहज गृहीत धरले म्हणून ती ती गृहिणी..असाही मनात विचार आला.
    *”पहिली बेटी.. धनाची पेटी”*  
      अस पहिली मुलगी झाली म्हणायची  पद्धत आहे . आणि ते खरही आहे. वडिलांसाठी प्रेमाचा अद्भुत खजिना घेऊन ती आली असते. मुलगी ही निसर्गाने दिलेली अनमोल भेट आहे. तिला घरात लक्ष्मीचेच रूप मानतात आणि हे भाग्य भाग्यवंताच्या नशीबी असतें.
     “ती ” कुणाची लाडकी लेक, कुणाची आई कुणाची पत्नी,  कुणाची बहीण, नणंद, वहिनी असतें अशी अनेक नातं निभावता निभावता नकळत केस रुपेरी होतात, आता ती सासू झाली असते.स्वतःची मुलं उत्तम संस्कार देऊन तर तिने मोठी केली असतात,  हल्ली सुना नोकरीस जात असल्याने नातवंडाची  ती प्रेमळ आजी अजून व्यस्त होते.
        सर्वांच्या आवडी निवडी जपता जपता तिची आवड काय हेच ती विसरून गेली असतें.  त्यागाची आणि समर्पणाची ती एक मूर्ती असतें. 
      जर कुटुंबाकडे कुणी वाकड्या नजरेने बघितले, कुटुंबावर संकट आले तर ती दुर्गेचे रूप घेते. 
    तिच्यातील आईवर खूप  लिहिले गेले आहे. लग्न झाल्यावर भार्या म्हणून ती घरात येते, तिचे गृहिणी म्हणून असामान्य कर्तृत्वास मानाचा मुजरा… 
    तिला गृहीत न धरता तिच्या घरातील योगदानाची नेहमी जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. तिच्या  सन्मानासाठी आज  लिहिल्या तिची समर्पणाची गोष्ट सांगणाऱ्या  ओळी.
सांगतो आज गोष्ट तिची रे 
ऐकता नयनी येईल पाणी..
कथा प्रेम अन समर्पणाची 
सर्वांच्या ती आहे घराघरातली..
कथेची मुख्य विशेष पात्र ती 
आधार देते सदैव जीवना ..  
स्वत:पेक्षा फक्त्त दुसऱ्यांसाठी 
जगात अवतरली आहे भार्या ..
अतूट लग्नाचे पवित्र नाते होता 
घर अंगण सखी  गणगोत सुटले 
ओलांडता मापं उंबरठ्यावरचे 
अनेकांशी जुळले तिचे नवे नाते ..
सासरी नावही नविन मिळाले
पत्नी सून वहिनी नाते  कळले..
तिच्यावर नित्य अवलंबुन घरचे सारे 
हाऊसवाइफ  नाव तिज इंग्रजीतले..
नवलाई कौतुक नव्या वधूचे 
नऊ दिवसांचे फक्त्तच होते..
नंतर घरातील साऱ्या कामाशी
प्रत्यक्षात जन्माचे जुळले नाते..
आवड सर्व नात्यांची जाणून 
जेवण नित्य बनवे रुचकर छान ..
घराच्या शुभमंगल सौख्यासाठी 
तिचे मात्र  असे उपवास..
सारे उपवास तिचे फळास आले
घरात हसरे बाळ रांगू लागले..
जन्मभरासाठी आई झाली
पित्याचे प्रमोशन पतीस मिळाले..
वय नकळत तिचे वाढत होते
जबाबदारीचे ओझे अधिक वाढले..
ऑफिसवेळ साधण्या धडपडे
मुलाना संस्कार देण्यात ती रंगे..
सर्व व्हावे अगदी बरोब्बर काही
नको उणीव..न करावयाचे बाकी..
ती हुशार सदैव अष्टावधानी 
गॅसवरचे दुध उतू कधी गेले नाही..
सर्वांच्या इच्छा पूर्ण करता करता
दिवस सरला कळे मावळतांना..
समय चक्र हे वेगाने चालत होते
चंदेरी मधूनच  केश चमकले
पप्पूचा आता प्रकाश झाला
बेबी नकळत सुमन झाली 
प्रेमही कुरकुर करू लागले 
मुलांसह अहोंनाही शाब्दिक चिमटे.
विवाहा वेळी किती अबोल होती
सर्रास आता हुकूम ती राणी देते..
“सरळ घरी वेळेत या लवकरी 
पुरे करा कामाचे खोटे बहाणे!”
लग्नाच्या अनेक वर्षानंतरही
गोड सवय झाली या शब्दाची.
” मीच ती या घरी निभावली
दुसरी कुणी नसती थांबली “
जरी कधी ते भांडण होते
अबोला तो क्षणिक असतो..
ठसका जेव्हा अवचित लागे
जीव तिचा वर खाली होतो..
आजारी ती क्वचितच पडली
कुणा कधी नाही ती कळली..
आजारी जेव्हा घरी कुणी तो
तत्परतेंने सेवेस हजर राहिली..
सर्वांना कौतुक फक्त्त आईचे
ममतेचे प्रेमाचे अन त्यागाचे..
जीवन सफल सुंदर करण्या 
योगदानही खूप प्रिय भार्येचे..
जबाबदारी मागे जेव्हा पडता
देवधर्माशी जुळते नकळत नाते..
आवडती साखर बंद जाहली 
औषधे आता  सखे जाहले..
साखर नाही तरी असतें गोडी
पत्नी सोबत तर पती सुभागी..
साथ सदैव तिची सदा रहावी
चंद्र सूर्य आहेत जोवर गगनी.. 
प्रेमाचा डोळ्यात अथांग सागर
आशा दाखवी प्रत्येक क्षण क्षण..
जेव्हा अडचणीत तिचा प्रियवर
खुशाल त्यागे ती आपुले स्त्रीधन..
सारितेची ती खळखळ धारा
तिच्या सोबतीला पती किनारा..
साथ दोघांची राहो अखेर पावेतो
मिळेपर्यत प्रभूच्या भावसागरा ..
लिहिले खूप महान आईवरती
भाग्यलक्ष्मी भार्याही असते ..
जाणुनी तिची ही अद्भुत महती
शब्द खास, उतरवे हेमंताची लेखणी..
✍️हेमंत नाईक
सोमवार 20.7.26
Yahoo Mail: Search, organise, conquer

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा  असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: गजेन्द्रमोक्ष आख्यान
Next: पालापाचोळा
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.