Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

चूक

हेमंत नाईक जुलै 22, 2026 1 minute read
0
1001108513.jpg
    त्याच त्यागोष्टी ऐकून दोन्ही नातवंड कंटाळले होते हेमंताजोबा काहीतरी नवीन गोष्ट सांगा असा गोड नातवांचा हट्ट पुरवण्यासाठी ऑकलंडला मनाशी रचून सांगेतलेली गोष्ट आज बालसाहित्य या प्रकारात लेख म्हणून प्रकाशित करयला कामी आली .
      चंदू आणि बंडू या कथेचे पात्र आहेत चौथीतील विदयार्थी.. दोघांचे घर शेजारी शेजारी असल्याने एकदम घट्ट मैत्री बर का. दोघेही खूप हुशार पण बंडखोर. अभ्यासापेक्षा खेळातच जास्त लक्ष. वर्गातही खोड्या काढण्यात एक्स्पर्ट कोणच्या डोकयात टपली मार तर कुणाची वेणी ओढ. त्यामुळे गुरुजींचा नेहमी मार बसायचा त्यांना. चूक केली तर शिक्षा भोगण्यास ही ते आनंदाने तयार असायचे. एकदिवस मात्र या दोघांची काहिही चूक नसताना एका मुलाच्या चुगलीमुळे गुरुजींनी त्याच काहिही न ऐकता त्यांना शंभर उठबशा काढायची शिक्षा झाली. इवलेसे जीव ते शेवटी शेवटी उठबैठक करून त्यांचे पाय एकदम भरून आले होते त्यांचे. लहान होते तरी उगाच केलेल्या शिक्षेमुळे दोघाची माथी भडकली.गुरुजींचा खूप भयंकर राग आला होता त्यांना.
      राग अविचारास जन्म देतो. अगदी तसेच झाले..
      चंदू बंडूनी गुरुजींना अद्दल घडवायची योजना आखली. तयारी सुरु झाली,गुरुजीचा जाण्या येण्याचा मार्ग यांचे घरावरून जात होता. रोज संध्याकाळी गुरुजी तेथून जात होते त्याचा नेहमीचाच तो मार्ग होता.घरासमोरच्या लिंबाच्या झाडाच्या रस्त्यावर येणाऱ्या फांदीवर एक डबा टांगला आणि त्याला एका दोरी बांधून ती ओढली तो उलटा होईल अशी रचना करण्यात आली त्यात रंगाचे पाणी टाकून ते गुरुजीचे अंगावर उडवून त्यांचे कपडे खराब करण्याचे भन्नाट प्लॅनींग चंदूला सुचले होते.बंडूची त्यास पूर्ण सहमती होती. गुरुजी बरोबर डब्याखाली आली की बंडुने खुणावताच चंदूकडून दोरी ओढली जाणार होती.
      शाळा सुटली होती आणि गुरुजींची पावले त्या दिशेस वळली. चंदू गच्चीवर आणि बंडू खाली वाड्या मागे दबा धरून बसले होते काहीतरी विपरीत करतोय या भावनेने छातीतली धडधड वाढली होती. बरोब्बर फांदीवर टांगलेल्या डब्या खाली गुरुजी येताच बंडुने खूण केली चंदूने दोरी ओढण्याचा प्रयत्न केला पण नेमकी फांदीच्या बेचक्यात अडकल्याने ती ओढली गेली नाही. परत एकदा दोरी निकराने ओढली खरी पण दोरीच तुटली तो झाडावर टांगलेला डब्बा तसाच निश्चल स्थिर होता. गुरुस शिक्षा देण्याची योजना पूर्णपणे फसली होती. गुरुजी मात्र झाडाखालून स्वच्छ कपडयात निघून गेले.प्लँन फसल्यामुळे चंदू बंडू मात्र नाराज झाले.
गुरूला चुकीची शिक्षा
बंड शिष्याची योजना
सफल ती होण्याची 
नव्हती ईश्वरी इच्छा…
गुरूच असतो ब्रम्हा
आणि तोच रे विष्णू
शिवरुपी ही तोच 
साक्षात सर्वं तो देव…
लहानमुलं देवाचे रूप 
निर्मळ  त्यांचे मन 
जसे तुम्ही घडावाल
तसें त्यांचे भविष्य..
शिष्याने गुरुसाठी 
शिक्षेचा केला प्रयत्न
चुकीचाच असे तो
नियती करे विफल..
खोदले कुणी खड्डे
दुसऱ्यास पाडायला
त्यात स्वतःच पडाल
ध्यानी ते नित्य ठेवा..
चंदू बंडू नाराज झाले होते खरे…पण मनात कुठंतरी प्लॅन फसल्याचा आनंद ही होता. रागाच्या भरात अविचारी कृत्य घडणार होते. दोरी तर तुटली होती पण डबा झाडावर  रंगाने भरलेला तसाच टांगलेला  राहिला. दुसऱ्या दिवशी  रविवारी झाडाला खाली दोघे मित्र खेळत असताना जोरदार वारा सुटला आणि तो डब्बा हवेच्या दबावाने उलटा झाला, सर्वं रंग खाली पडला तो नेमका खेळत असणाऱ्या चंदू बंडूवर.
      होळी नसताना  होळी खेळली गेली होती.. दोघांचे नविन कपडे रंगाने रंगले होते.
      दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात स्वतःच पडतो हे चंदू बंडूला कळून चुकले होते..खूप विचार केल्यानंतर त्यांची  गुरूला शिक्षा देण्याचा विचार करण्याची त्यांची खूप मोठी चूक त्यांनाच कळली होती.नशीब बलवत्तर होते म्हणून होणारी चूक चुकली होती…योजना प्रत्यक्षात न आल्याने ते मात्र मनोमनी सुखावले होते.
*”जीवनी कळतं नकळत करतो*
*कर्ता प्रत्यक्ष कर्म आपुले..*
*चुका होता त्या सुधारण्या*
*आत्मविश्लेषण नित्य करावे ..”*
*कथासार :*
      दुसर्यासाठी कधीही खड्डे खोदू नका त्यात स्वतःच पडण्याची शक्यता जास्त असतें. कोणतेही कट कारस्थान न करता स्पष्ट बोलले तरीही समस्येवर मात होऊ शकते. 
    आयुष्यात चुका न केलेला मनुष्य या जगात नाही. स्वतःच्या चुका स्वतःलाच कळणं हे पण गरजेचं असत…बर एक चूक केली तरी त्याप्रकारची परत होऊ नये हे अपेक्षित असत … तरी पण वेगळ्या बाबतीत चूक अजाणता  होतच असतें.
     जीवनात चुका  मनुष्याकडूनच होत असतात त्या अटळ असतात..एकाला बरोबर वाटणारं कृत्य दुसर्याला चुकीचे वाटत असत..बऱ्याच वेळा चुका केल्यावर कळत ही नाही.. आणि दुसर्याने सांगितल्या तर त्याचा राग येतो म्हणून त्या स्वतःलाच कळल्या पाहिजेत.. त्यासाठी आत्मपरीक्षण अर्थात स्वतः पासून दूर होऊन केलेला विचार उपयोगी पडतो.
      तस म्हणा लं तर या कथेत चूक गुरुजनची सुद्धा आहे त्यांनी नेहमी चुका करणारे विद्यार्थी असल्याने त्यांनी त्याचा पुर्व इतिहास बघून निरापराध मुलांना न केलेल्या चुकीची शिक्षा केली.
असो.
*”केलेल्या चुका सुधारण्याचा आणि तशा परत न करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे म्हणजेच यशस्वी जीवन.”

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा  असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: साठी नंतरची नाठी
Next: पराधीन
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.