कोविड नंतरचा काळ होता. कोटक क्रेडिट कार्ड चे विक्री व्यवस्थापक आमच्या बिजनेस सेंटर ला त्यांच्या डिपार्टमेंट साठी किती जागा उपलब्ध होऊ शकते हे बघायला आले. पुढील एक ते दीड वर्षात त्यांच्या इमारतीचे कार्य पूर्ण होणार असल्याने त्यांना तेवढ्या कालावधी साठी जागा हवी होती. नागपूरमधील ठिकठिकाणच्या कोटक च्या शाखेमध्ये बसणाऱ्या विक्री प्रतिनिधींसाठी कुठेतरी एका ठिकाणी जागा मिळावी म्हणजे टेली calling सुद्धा एका जागेवरून होईल आणि बाहेर जाऊन मार्केटिंग करणाऱ्यांची मिटिंग सुद्धा रोज एकाच जागी घेता येईल, हा त्यांचा उद्देश. त्यात ज्यांनी आमचे बिजनेस सेंटर त्या व्यवस्थापकांना सुचविले होते ते कधीकाळी एस.बी.आय. क्रेडिट कार्ड ला विक्री व्यवस्थापक म्हणून नागपूरला कार्यरत होते. ज्याची शाखा आमच्या बिजनेस सेंटरला होती. त्या व्यवस्थापकांची नंतर विभागीय व्यवस्थापक म्हणून कोटक क्रेडिट कार्ड मधे नियुक्ती झाली. जे पुणे मधून सर्व कार्य बघत आणि वेळ पडल्यास त्यांचे दौरेही असत.
कोटक चे सर्व लोक जेव्हा आमच्याकडे येऊ लागले. तेव्हा आम्हाला याची कल्पना नव्हती की, पुढील एक महिन्यात कोटकलाच पुन्हा फक्त क्रेडिट कार्ड टेलिमार्केटिंगसाठी सुद्धा जागा हवी आहे. ज्याचे व्यवस्थापक हे कुणी वेगळे होते.
जेव्हा ते आणि त्यांचा टीम लीडर जो माझ्या ओळखीचा निघाला. ते जागा बघण्यासाठी आले तेव्हा त्यांनी म्हटले,
जगह तो कम हैं, लेकिन एडजस्ट कर लेंगे।
दोघेही आपसात काहीतरी गुफ्तगू करायला लागले.
सर ये बाजु वाले दो बड़े केबिन्स Telecallers के लिए, आप ये छोटा वाला ले लीजिये। टीम लीडर म्हणत होता.
हां भाई ये अच्छा हैं, चिल्लाने के लिए भी। व्यवस्थापक जेव्हा हे वाक्य बोलले तेव्हा मी सहज त्या दोघांनाही म्हटले,
सर ते चिल्लाने के लिए नेमके काय हो?
वैभव भाई आपको जल्द समझ आ जायेगा। असे म्हणून ते दोघे निघून गेले. पुढे आम्ही एक दिवसात त्यांची बसण्याची व्यवस्था त्यांच्यानुसार करून दिली.
आता पुढे काय होणार याची फारशी जाणीव नसलेला मी मात्र जबाबदारी वाढणार म्हणून त्या दृष्टीने तयारी करून ठेवलेली होती.
३०दिवसात३० प्रयोग२०२६ #जुलै२०२६ #सुरपाखरु
वैभव शिरखेडकर
२१/०७/२०२६