Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

||नोकरी की व्यवसाय|| भाग सहा राहुल त्याच्या कामाच्या व्यापामध्ये अधिक गुंतत गेला. आणि राधा आली.

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 22, 2026
0
family-portrait-featuring-parents-holding-their-newborn-baby-in-flat-art-vector.jpg

 नुकताच लग्न झालेले असताना त्याने लवकर यावे, अशी अपेक्षा कनिष्काला होती. पण इथे उलटेच व्हायला लागले. कामाचा व्याप आणि त्याची वेळ आता टाळायला लागली. त्याची रोजची वेळ सुद्धा टळून जात होती. लवकर तर सोडाच त्याला वेळ सुद्धा व्हायला लागला कनिष्का तशीच समजूतदार होती. पण आई बाबा पण आपापल्या कामात, आणि हळूहळू कनिष्का एकटी पडल्यासारखी झाली. राहुल तसा तिच्याशी बोलत असे, वेळ घालवत असे. तिला म्हटलं की तू सध्या एकटीच आहेस तोवर तुला व्यवसायाला सुरुवात करता आली तर, तुला आवडते कामही मिळेल, आणि वेळही जाईल. ही कल्पना कनिष्कला आवडली.
हळूहळू तिने व्यवसायाला लागणारी साहित्याची सुद्धा जमवाजमव करणे सुरू केले. दरम्यानच राहुल घरी आल्यानंतर कनिष्काने त्याला एक गोड बातमी दिली. त्यामुळे कनिष्काने केलेली व्यवसायाची तयारी सध्यापुरतं थांबवली. आणि एक छोटीशी, गोडशी, एक पाहुणी त्या घरात आली. राहुल कनिष्का आणि बाकीचे घरची मंडळी एका वेगळ्याच दुनियेत रमायला लागले. तिला गोंडसे नाव देण्यासाठी नामकरण विधी पार करण्यात आला. घरचे नाव राधा याच नावाने सगळे बोलवायचे. चंद्रकला प्रमाणे राधाही वाढत गेली.
पण इकडे राहुलच्या कामाचा व्याप हा वाढतच चालला होता. आणि त्याप्रमाणे त्या व्यापाला सांभाळणारा वेळही वाढत गेला. आता मात्र राहुल कंटाळायला लागला. त्याला त्याच्या कुटुंबीयांना पाहिजे तसा वेळ देता येत नव्हता, त्यामुळे त्याची कधीकधी चिडचिड व्हायची. कनिष्का सुद्धा ही गोष्ट समजून घेत त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असे आणि शांत करत असे. आता या व्यापाच्या ओझ्याखाली त्याच्या मनात पुन्हा पूर्वीचे सुप्त विचार स्फुरण धरायला लागले. आणि पुन्हा तो एकच प्रश्न.
व्यवसाय की नोकरी?
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६

लेखक

  • सुभाषचंद्र टेकडपांडे

Post navigation

Previous: कोटकायन भाग – ०१
Next: आवर्जून वाचावे असे काही… भाग २
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.